1. पशुधन

जनावरांना खाऊ घाला चॉकलेट; वाढेल दुधाची उत्पादकता

आपल्या सर्वांना चॉकलेट आवडते. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट आवडते. पण आता पशुंनाही चॉकलेट आवडू लागणार आहे. अधिक चॉकलेट खाल्ल्याने आपल्याला दातांचा त्रास होत असतो. परंतु दुभत्या जनावरांसाठी चॉकलेट फार फायदेशीर ठरणार आहे, कारण चॉकलेट खाण्याने दुधाची उत्पादकता वाढणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


आपल्या सर्वांना चॉकलेट आवडते असते,  लहान मुलांपासून  ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट आवडते. पण आता पशुंनाही चॉकलेट आवडू लागणार आहे.  अधिक चॉकलेट खाल्ल्याने आपल्याला दातांचा त्रास होत असतो. परंतु  दुभत्या जनावरांसाठी  चॉकलेट  फार फायदेशीर ठरणार आहे, कारण चॉकलेट खाण्याने दुधाची उत्पादकता वाढणार आहे.  हो, जनावरांसाठी एक चॉकलेट बनविण्यात आले असून यामुळे जनावरांना लागणारे खनिज  आणइ पोषण तत्ते या चॉकलेटमधून मिळणार आहेत. इतकेच नाही तर गुरांची प्रजनन क्षमताही या चॉकलेट खाण्याने वाढणार आहे. 

लखनौमधील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ डॉ. दया शंकर श्रीवस्तव पशु चॉकलेटविषयी सांगतात की, हे एक पशु चॉकलेट असून यात जनावरांसाठी लागणारे खनिज, प्रथिने आणि युरियाचा खूप मोठा स्रोत आहे.  पौष्टीक आहार नसला तर जनावरांची गर्भधारणाची समस्या येत असते  किंवा जनावरांमध्ये दूध उत्पादनाची समस्या येते. या  चॉकलेटला अशा प्रकारे बनिवण्यात आले आहे की, चॉकलेटच्या सेवनाने पशुंमध्ये प्रथिने आणि खनिजांची मात्रात वाढवते.  दरम्यान या चॉकलेटची परिक्षण ही करण्यात आले आहे, या चॉकलेटमुळे  जनावरांमध्ये १० ते १८ प्रतिशत दुधाची उत्पादकता वाढवते. यात प्रथिने अधिक असल्याने, जनावरांसाठी खूप फायदेकारक असून यामुळे जनावरांची गाभण राहण्यास समस्या येत असेल तर ती समस्या दुर होत जाते. विशेष म्हणजे पशुपालक हे चॉकलेट आपल्या घरी बनवू शकतात.  या चॉकलेटला गोशाळेत एका ठिकाणी टांगले जाते. त्यामुळे जनावरांना जेव्हा इच्छा झाली तेव्हा ते ती चॉकलेट चघळू शकतात.


दरम्यान हे चॉकलेट बनविण्यासाठी कृषी केंद्राकडून एक मशीन एक यंत्र  बनविण्यात आले आहे. या यंत्राच्या साहाय्याने एका दिवसात १५० चॉकलेट बनवता येतात. आयवीआरआयमध्ये चॉकलेट बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.  याचे प्रशिक्षण घेऊन आपण रोजगारही मिळवू शकतात.  जर आपल्याला चॉकलेट बनवायचे शिकायचे असेल तर तुम्ही सीतापूर जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्र-२ येथे संपर्क करु शकतात. पशु चॉकलेट बनवणारे यंत्राच्या साहाय्याने  एका दिवसात प्रत्येक व्यक्ती १०० ते २०० चॉकलेट बनवता येते. विशेष म्हणजे हे यंत्राला कोणतेच इंधन लागत नसून हे यंत्र हाताने चालविले जाते.  दोन किलोमध्ये ५० ब्लॉक बनविण्यासाठी ४० टक्के शीरा, ४० टक्के चोकर, १० टक्के युरिया, दोन  टक्के खनिज लवंग, एक टक्के मीठ, सात टक्के सिमेंटचे मिश्रणाने चॉकलेट बनवले जाते.

English Summary: Now feed the animals chocolate; Increases milk productivity Published on: 21 July 2020, 11:19 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters