
now possible to born calf by test tube baby technology
आता प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येत आहे. शेती क्षेत्रात देखील खूप अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले आहे. याला पशुपालन क्षेत्र देखील अपवाद नाही. पशुपालना मध्ये देखील खूप वेगवेगळ्या प्रकारचे फायदेशीर तंत्रज्ञान आले आहे.
या तंत्रज्ञानाची मदत ही पशुपालन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जात असून त्या माध्यमातून पशुपालकांची आर्थिक उत्पादनक्षमता वाढायला मदत होत आहे. असेच एक वाखाणण्याजोगे तंत्रज्ञानाने पशुपालना मध्ये प्रवेश केला आहे. ते म्हणजे आता टेस्ट ट्यूब बेबी द्वारे कालवडींचा जन्म शक्य होणार आहे. या संशोधनाबद्दल या लेखात माहिती घेऊ.
आत्ता टेस्ट ट्यूब बेबी द्वारे होईल कालवडींचा जन्म
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान अर्थात टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाच्या आधारे आता नैसर्गिक रित्या कालवडींना जन्म देणे सहज शक्य होणार आहे. याबाबतचे संशोधन नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील डॉ. एस.के.सहातपुरे यांनी केले आहे.
या नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आतापर्यंत जवळजवळ साठ गाईंच्या गर्भामध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्यात आले असून आतापर्यंत 15 गाईंना टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या आधारे गर्भधारणा झाली आहे.
त्यापैकी दोन गाईनि कालवाडीना जन्म दिल्याची माहिती डॉ. सहातपुरे यांनी दीली. यापैकी 2 कालवडींचा जन्म जानेवारी महिन्यामध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात नैसर्गिक रित्या झाला असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. जैव तंत्रज्ञानात उच्च दुग्ध उत्पादनाची क्षमता असणाऱ्या वर्गीकृत देशी गाय म्हणजेच दाता गाईच्या गर्भाशयाच्या बीजांडवरील बिजा कोषातून स्त्री बीज अल्ट्रा सोनोग्राफी च्या मदतीने एका नलिकेत शोषून घेतले जाते व भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत या स्त्री बीजाचे नि:खलन आणि पुरुष बीजाशी फलितीकरण प्रक्रिया करून निर्माण झालेला भ्रूण 8 दिवस प्रयोगशाळेत एका विशिष्ट वातावरणात वाढवून आठ दिवसांचा भ्रूण प्रत्यारोपणासाठी तयार करण्यात येतो.
नक्की वाचा:शेतकरी भावांनो! कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय ठरू शकतो एक टर्निंग पॉइंट, वाचा नियम व अटी
हा तयार करण्यात आलेला भ्रूण कमी दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या अवर्गीकृत गाईच्या गर्भाशयात शस्त्रक्रिया न करता प्रत्यारोपित करण्यात येतो.
यामध्ये गर्भधारणेचा निश्चित कालावधी पूर्ण झाल्यानंतर कमी उत्पादन क्षमता असलेली अवर्गीकृत गाय उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या वर्गीकृत जातीच्या गायीच्या वासराला नैसर्गिकरित्या जन्म देते. व असे जन्मलेले वासरू वयात येऊन नैसर्गिक गर्भधारणेनंतर 20 ते 25 लिटर दूध उत्पादन देऊ शकते.
नक्की वाचा:डोकेदुखीने त्रस्त आहात? तर या उपायांनी चुटकीसरशी पळेल डोकेदुखी, वाचा सविस्तर माहिती
Share your comments