आज-काल ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरी एक तरी देशी गाई आपणास पाहावयास मिळते. देशी गाई पासून मिळणारे दूध उत्पन्न जरी कमी असले तरी तिचे शेण व गोमूत्र खूप फायदेशीर असते. देशी गाई ही आपणाला तिच्या संपूर्ण आयुष्यात भरपूर फायदा करून देते जसे की जिवंत असताना शेण, गोमूत्र, दूध, तर देतेच परंतु मृत पावल्यानंतर देखील तिचे अनेक उपयोग शेतीसाठी आहेत.
यामध्ये गाईची खूरे, हाडे, शिंगे ही उत्कृष्ट पद्धतीचे खत निर्मितीसाठी वापरली जातात मृत पावलेली गाई आपण ज्या ठिकाणी पुरतो त्या ठिकाणी पुढील काही वर्ष उत्कृष्ट दर्जाचे पीक उत्पादन येते अश्या पद्धतीने आपणास 'जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी' गाई मदतच मदत करते. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांना छेडू नका प्राणी मात्रावर दया करा.
मानवी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत देशी गायीचे शेण, दूध व गोमूत्राचे खूप महत्त्व वेदांमध्ये सांगितले तर आहेच. देशी गाईपासून मिळणारा कोणताच पदार्थ वाया जात नाही आपणास गाईचे शेण हा पदार्थ जरी टाकाऊ वाटत असला तरी त्यापासून ३३ प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे उपयुक्त जिवाणू शेण व गोमूत्राच्या माध्यमातून जमिनीला मिळत असतात तसेच शेणापासून शेतीसाठी कंपोस्ट खत, गांडूळखत, गोबर गॅस आपण तयार करू शकतो. एवढेच नव्हे तर आपण शेणापासून पर्यावरण पूरक विविध पदार्थ बनवून चांगले अर्थार्जन देखील करू शकतो.
यामध्ये धूपकांडी, मच्छर अगरबत्ती, गोवऱ्या, भांडी घासण्याची पावडर, चपला, कुंड्या इत्यादी. याच अनुषंगाने धेनू टेक सोलुशन्स प्रा.लि या नामांकित कंपनीने मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणाऱ्या व घरोघरी लागणाऱ्या ईकोदीप (पणती) निर्मिती या सूक्ष्म व्यवसायाचे एक यशस्वी मॉडेल तयार केले आहे.
दिपकार मशीनची खास वैशिष्ट्ये-
आकाराने लहान व वजनाने हलकी.
वापरण्यास अगदी सुलभ व सोपी.
सहज हातातून नेता येण्याजोगी.
विजेची गरज भासत नाही.
कमीत कमी देखभाल खर्च.
साच्या बदलण्यासाठी सोयीस्कर.
दिपकार मशीनची उत्पादकता-
एका वेळी २ पणत्या सहज बनवता येतात.
एका तासामध्ये १०० ते १२० पणत्या बनतात.
एक किलो शेण पावडर पासून १८० ते २०० पणत्या बनतात.
ग्रामीण भागातील महिला व शेतकऱ्यांना ग्रामीण सूक्ष्म उद्योजकता उपक्रमाद्वारे शेणापासून इको फ्रेंडली दिप म्हणजेच ईकोदीप (पणती) बनवणे या उपक्रमांमध्ये शेतकरी, गृहीनी व बचत गटांच्या महिलांना सहभागी होता येणार आहे. यासाठी लागणारी मशीनरी, प्रशिक्षण, कच्चा माल, पॅकेजिंग मटेरियल, डिझाईनिंग व मार्केटिंग सपोर्ट धेनू कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील गरजू व होतकरू महिलांच्या हाताला काम तर मिळेलच परंतु स्वतःचा कमी खर्चात, कमी जागेत, कमी भांडवलात सूक्ष्म उधोग सुरु करता येईल हे नक्कीच.
या उपक्रमाबद्दल सांगायचे झाले तर ग्रामीण महिला ईकोदीप बनवतात तर शहरी महिला ईकोदीपची चांगल्या किंमतीला आपल्या सोसायटीमध्ये तसेच डिजिटल पद्धतीने विक्री करतात हा उपक्रम सध्या पुणे, कोल्हापूर, रायगड, अहमदनगर, पंढरपूर, उस्मानाबाद, या ठिकाणी यशस्वीरीत्या सुरू आहे. यामुळे अनेकांनी यामध्ये चांगले पैसे कमवले आहेत.
पर्यावरण पूरक ईकोदीपचे फायदे-
१) ईकोदीप हा वजनाने हलका असल्याने पाण्यावरही तरंगतो.
२) ईकोदीप हा मजबूत व टिकावू आहे.
३) ईकोदीप हा पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित उत्पादन आहे.
४) ईकोदीपचा वापर दिवाळी, दसरा, होळी, गुडीपाडवा वाढदिवस, व लग्न समारंभासाठी करता येतो.
५) ईकोदीपचा वापर झाल्यानंतर तुळशीला किंवा कुंड्यांना खत म्हणूनही वापर करता येतो.
६) ईकोदीप जाळल्याने कीटक व डासांचा नायनाट होतो.
७) ईकोदीपच्या पॅकिंगचा वापर मंदिरात नैवेद्य ठेवण्यासाठी करता येतो.
पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा.
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX
लेखक-
नितीन रा.पिसाळ,
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा-9766678285;9130233557 ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
आता गाव तिथे किसान मोर्चा, शेतकऱ्यांच्या समस्यांवर उठवणार आवाज...
अजब राज्याचे गजब सरकार! फक्त बळीराजाचे राज्य म्हणून जमणार नाही साहेब, विजेचे वास्तव एकदा वाचाच
शेतकऱ्याच्या अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा! पीक संरक्षणासाठी बनवले अनोखे जुगाड..
Share your comments