राज्यात तसेच देशात म्हशीचे पालन मोठया प्रमाणात होत आहे, अनेक भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी जोडव्यवसाय म्हणुन म्हशीच्या पालणाकडे बघत आहेत. त्यामुळे अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी आज कृषी जागरण एका विशेष म्हशीची माहिती घेऊन आले आहे
मित्रांनो आज आपण एका देशी जातीविषयी म्हणजे नागपुरी म्हशीविषयी जाणुन घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया या म्हशीची विशेषता
कसे मिळाले नाव
मित्रांनो असे सांगितले जाते की ह्या म्हशीचा उगम अथवा मुख्य स्थान हे महाराष्ट्र प्रांतातील विदर्भ विशेषता नागपूर आहे. हि म्हैस नागपूर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाळली जात असल्याने या म्हशीला नागपुरी म्हणुन संबोधले जात असावे. या म्हशीची किमत हि जवळपास 90 हजारपर्यंत असते. किंमत हि कमी जास्त असू शकते.
नागपुरी म्हैस दिसते कशी आणि किती देते दुध
»नागपुरी म्हशीचे शरीर उत्तर भारतात आढळणाऱ्या इतर म्हशींच्या तुलनेत लहान आणि वजनाने हलके असते.
»नागपुरी म्हशीच्या शरीराचा रंग सामान्यतः काळा असतो, परंतु या म्हशीच्या चेहऱ्यावर, पायांवर आणि शेपटीच्या टोकावर पांढरे डाग असतात.
»नागपूरी म्हशीचे शिंगे लांब असतात, तसेच शिंगे सपाट, वाकलेले असतात आणि दोन्ही शिंगे मानेच्या बाजूला जवळजवळ खांद्यापर्यंत निमुळती असतात, मुख्यतः वरच्या दिशेने.
»नागपुरी म्हशीचा चेहरा सरळ आणि पातळ असतो. या म्हशीची मान लांब असते.
»या म्हशीची शेपटी हि आखूड असते.
»नागपुरी रेड्याची उंची हि सरासरी 145 सेमी असते तर नागपुरी म्हशीची सरासरी उंची 135 सेमी असते.
»नागपुरी म्हैस एका वेतामध्ये जवळपास अकराशे लिटर पर्यंत दुध देण्याची क्षमता ठेवते.
»म्हशीची हि देशी जात चांगली दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या जातीत गणली जाते.
Share your comments