1. पशुधन

शेवगा चार्‍यासाठीचा पर्यायी स्त्रोत

शेवगा हे उपयुक्त झाड म्हणून ओळखले जाते. अगोदर पासूनच शेवग्याचा मानवाच्या आहारात समावेश आहे. शेवग्याची लागवड ही बहुदा शेताच्या बांधावर किंवा परसात केली जाते. शेवग्याच्या औषधी उपयोगामुळे शेवग्याला जादूचे झाड (miracle tree) म्हणून सुद्धा ओळखतात. शेवग्याच्या पानात प्रथिने आणि खनिज यांचे प्रमाण उपयुक्त प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या वाढीसाठी हे उपयुक्त ठरते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शेवगा लागवड ही शेंगाच्या उत्पादनासाठी केली जाते आणि जनावरांच्या आहारातील उपयुक्तता अजूनही अप्रचलित आहे.

KJ Staff
KJ Staff


शेवगा हे उपयुक्त झाड म्हणून ओळखले जाते. अगोदर पासूनच शेवग्याचा मानवाच्या आहारात समावेश आहे. शेवग्याची लागवड ही बहुदा शेताच्या बांधावर किंवा परसात केली जाते. शेवग्याच्या औषधी उपयोगामुळे शेवग्याला जादूचे झाड (miracle tree) म्हणून सुद्धा ओळखतात. शेवग्याच्या पानात प्रथिने आणि खनिज यांचे प्रमाण उपयुक्त प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या वाढीसाठी हे उपयुक्त ठरते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शेवगा लागवड ही शेंगाच्या उत्पादनासाठी केली जाते आणि  जनावरांच्या आहारातील उपयुक्तता अजूनही अप्रचलित आहे.

शेवग्याच्या पानातील पोषण तत्वे

क्रूड प्रथिने- 23-25%, पोटॅशियम- 0.24% कॅल्शियम- 0.8%, फॉस्फरस- 0.30%, मॅग्नेशियम- 0.5%, सोडियम- 0.20%, तांबे- 8.78 पीपीएम, झिंक- 18 पीपीएम, लोह- 470 पीपीएम एवढे प्रमाण आढळते.

लागवड

  • शेवग्याची लागवड पावसाळ्याच्या सुरवातीला करावी. साधारणतः लोम किंवा चिकणमाती आणि 6.8 ते 7 च्या आसपास सामू असलेल्या पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीमध्ये ही झाडे चांगल्या प्रमाणात वाढतात.
  • लागवड ही वाफ्यांवर/सर्‍यांवर असावी जेणे करून पाणी जास्तवेळ साचणार नाही आणि झाडांची मुळे सडणार नाहीत.
  • शेवगा चार्‍यासाठी अनेक वर्ष चालतो त्यामुळे जमिनीला मुबलक पोषकद्रव्य अगोदरच पुरविली जावी जमिनीला चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी खोल नांगरणी करून घ्यावी.
  • लागवडीच्या पंधरा दिवस अगोदर 10 ते 15 दिवस अगोदर 5 टन प्रती एकरी शेणखताची मात्रा द्यावी आणि जमीन व्यवस्थित करून घ्यावी तसेच लागवडीच्या अगोदर सुपर फॉस्फेट एकरी 55 किलो टाकावे.
  • चांगल्या उगवणीसाठी बियाणे रात्रभर कवकनाशक मिसळलेल्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत. 30×30 सेमी अंतरावर बियाणाची लागवड करावी.
  • बियाणे उगवल्यानंतर काही रोगांची लक्षणे दिसली तर कृषीतज्ञाकडून सल्ला घेऊन आवश्यक ती फवारणी करावी.

कापणी

चार्‍यासाठी पहिली कापणी 80 ते 90 दिवसांनी करावी, त्यानंतरच्या कापण्या 40-45 दिवसांनी घेता येतात. वर्षाला साधारणतः 8 ते 9 कापण्या घेता येतात आणि हिरव्या चार्‍याचे वार्षिक उत्पन्न हेक्टरी 90 ते 100 टन च्या आसपास मिळते.

जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत

ज्यावेळी चार्‍याची उपलब्धता कमी असेल अशावेळी कडब्याच्या कुटी सोबत देता येतो. प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेवग्याची वाळवलेली पाने जनावरांच्या खुराकात मिसळून देता येतात त्यामुळे खुराकावर असलेला खर्च कमी होण्यास मदत होते. शेळी आणि मेंढी यांच्याकडून शेवग्याचा हिरवा चारा कमी प्रमाणात खाल्ला जातो त्यामुळे कुट्टी करून चारा उन्हात वाळवून घ्यावा. वाळलेला शेवगा, मक्याचा भरडा आणि मीठ हे घटक 80:19:1 या प्रमाणात मिसळावेत व्यवस्थित मिसळण्यासाठी 4 ते 5 किलो मळी (मोलॅसिस) प्रती 100 किलो मिश्रणात वापरली जाऊ शकते. मळी मुळे आहाराचा गोडवा वाढतो आणि शेळ्या मेंढ्यांकडून चारा जास्त प्रमाणात खाल्ला जातो.

फायदे

  • कमी पाणी असलेल्या ठिकाणी सुद्धा वर्षभर हिरव्या चार्‍याची उपलब्धता.
  • शेवग्याचे झाड चिवट असल्यामुळे मरीचे प्रमाण कमी.
  • मुबलक प्रमाणात चारा उत्पादन.
  • जनावरांची प्रतिकार शक्ती वाढते.
  • शेळ्या मेंढयात वजन वाढीसाठी उपयुक्त.
  • लसूण घासा पेक्षा एकरी जास्त उत्पादन.

चार्‍यासाठी वापरण्यात येणार्‍या प्रजाती: PKM-1 आणि PKM-2

लेखक:
डॉ. सागर जाधव
M.V.Sc (पशु पोषणशास्त्र)
9004361784
डॉ. शीतल वानखेडे

English Summary: Moringa drumstick leaves alternative source for fodder Published on: 06 April 2020, 08:26 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters