1. पशुधन

पशु आहारात खनिज मिश्रण आहेत महत्वाची, जाणून घ्या कमतरतेमुळे काय होतो तोटा

जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य यासोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरिरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. जनावरांना त्या-त्या प्रदेशात किंवा गावात आढळणारा विविध प्रकारचा चारा, हिरवे गवत, कडबा हंगामानुसार ऊस, उसाचे वाडे तसेच इतर संकरित चारा पिकांचा समावेश होतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य यासोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरिरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. जनावरांना त्या-त्या प्रदेशात किंवा गावात आढळणारा विविध प्रकारचा चारा, हिरवे गवत, कडबा हंगामानुसार ऊस, उसाचे वाडे तसेच इतर संकरित चारा पिकांचा समावेश होतो. संकरित पिके जेवढे जास्त उत्पादन देतात. तेवढे जास्त अन्नद्रवे जमिनीतून शोषून घेतात. तसेच शेतात सारखी तीच ती पिके घेतल्याने आणि माती परीक्षणानुसार जमिनीत अन्नघटकांच्या कमतरता वेळेवर पूर्ण न केल्याने पिकांची वाढ खुंटते, उत्पादन घटते, चाऱ्याची प्रत खालावते जमिनीत खनिज मिश्रणाचे अतिरिक्त प्रमाण नसल्याने ते चाऱ्यामध्ये येत नाहीत. असा निकृष्ट प्रतीचा चारा जनावरांनी खाल्ल्यास जनावरे कुपोषित होतात. चाऱ्यांमध्ये जीवनसत्वे नसल्याने जनावरे अशक्त होत असतात.

 

पशुपालकांनी बारकाईने लक्ष न दिल्याने असे असंतुलित खाद्य जनावरे खात असतात. यामुळे दूध उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. अशावेळी पशुपालक जनावरांना प्रमाणापेक्षा जास्त खाद्य पुरवितात त्यावेळी दुधाच्या प्रमाणात खर्चात खूप वाढ होते. जे पशुपालक नेहमी हिरवा चारा दुसरीकडून खरेदी करतात तेव्हा त्यांना सकस चाऱ्याची हमी नसते. त्यांनी जर त्या शेतकऱ्याकडे माती परीक्षणानुसार उत्पादित केलेला चारा आम्ही जास्त किमतीला घेऊ, अशी मागणी केली तर चाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात खनिजांची कमतरता भासणार नाही. त्यामुळे खनिज मिश्रणावरचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते.

खनिज मिश्रणे कोणती असतात ?
दुभत्या जनावरांच्या शरिरामध्ये खनिज मिश्रणाचे प्रमाण खूप असते. वेगवेगळ्या शरिरक्रियेसाठी बऱ्याच खनिज मिश्रणाचा पुरवठा आहारात असणे आवश्यक असते. उदा. (मुख्य खनिजे) कॅल्शियम, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, सल्फर, सोडियम, पोटँशिअम, क्लोरीन (सुक्ष्म खनिजे) लोह, कॉपर, कोबाल्ट, आयोडीन, मॅगनीज, झिंक आणि सेलेनियम यासारखी खनिजे अत्यल्प प्रमाणात द्यावी लागतात.
कोणत्या क्रियांसाठी खनिज मिश्रणाची अत्यंत आवश्यकता असते ?
गर्भावस्थेत गर्भाची पूर्ण वाढ होण्यासाठी
शरीर पोषणासाठी तसेच वासराच्या जलद वाढीसाठी.
प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादन वाढीसाठी.
जनावरांच्या सर्व शारीरिक जडणघडणीसाठी.
जास्त दुधारु पशूंमध्ये दुधाद्वारे कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जाते, ती कमतरता भरून काढण्यासाठी.

दुधाळ जनावरातील खनिजांच्या कमतरतेची प्रमुख कारणे?
सतत जमिनीमध्ये घेण्यात येणारे एकच पीक उत्पादनामुळे जमिनीतील खनिज मिश्रणे हळूहळू नाहीशी होतात.
चारा पिकांच्या तसेच माती परीक्षण अहवालाच्या आवश्यकतेनुसार जमिनीत अन्नद्रव्याचा पुरेशा प्रमाणात वापर न करणे.
सुधारित पिकांच्या जातींमध्ये अधिक पीक उत्पादन मिळते. त्यावेळी भरपूर अन्नांश जमिनीतून शोषला जातो त्यावेळी दुसरे पीक चांगले येत नाही.
सतत जनावरांना हत्ती गवत, ऊस, ऊसाचे वाडे, कडवळ खाऊ घातल्याने खनिज मिश्रणे उपलब्ध होत नाहीत तर ती शेणाद्वारे बाहेर पडतात.


बार्लीचा चारा म्हणून जास्त वापर केल्यास जनावरांना खनिज मिश्रणाची मोठ्या प्रमाणात गरज भासते.
इथेनॉल, बियर, अल्कोहोल, स्टार्च, इत्यादी निर्मितीमध्ये सातु, मका, ज्वारी यासारख्या अन्नधान्याचा वापर होतो. निर्मिती दरम्यान मिळणाऱ्या चोथ्याचा वापर जनावरांचा चारा म्हणून केल्यास खनिजांची कमतरता भासते.
जनावरांना पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी, चारा खाद्यामध्ये एखाद्या खनिजाचे प्रमाण कमी-अधिक असल्यास व त्या खनिजांमुळे इतर काही खनिजांचे जनावरांच्या शरीरात योग्य प्रमाणात शोषण होत नाही त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या खनिजांचा समतोल बिघडत जातो.
जनावरांच्या आजारपणात त्यांची भूक मंदावते या काळात पहिल्या आहारापेक्षा कमी अधिक अन्नग्रहण केले जाते त्यावेळी गरज असूनही खनिज मिश्रणे शरीरात पोहचत नाहीत.
बऱ्याचवेळा पशुपालक दूध उत्पादन चांगले मिळायला लागले कि जनावरांच्या ग्रहण क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात हिरवा चारा खाद्य देतात. त्यावेळी जनावरांमध्ये खनिज मिश्रणाची कमतरता जाणवते.
एक गोचीड दर दिवसाला साधारण अर्धा मि.ली रक्त शोषतात तसेच जंत, कृमी, परजीवी किटकांचा योग्यवेळी बंदोबस्त केला नाहीतर पचन व शोषण झालेल्या खनिज मिश्रणाचा नाश होऊन कमतरता भासते.


खनिज मिश्रणाच्या कमतरतेमुळे आढळणारी लक्षणे-
वासरांची जलद गतीने वाढ होत नाही.
शरीरावरील केस उभे राहतात, तेज दिसत नाही, त्वचा खडबडीत होते, तसेच त्वचेचे आजार वाढतात.
जनावरे पान्हा चोरते, दूध देत नाही, तसेच लवकर आटते
जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तसेच डोळ्यातून पाणी गळते.
गाई-म्हशी लहान वासरे यामध्ये अंधत्व येते.
भाकड कालावधी वाढतो. वर्षाला एक वेत मिळत नाही तसेच जनावरांच्या शरीरावर मांस दिसत नाही.
गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते तसेच तात्पुरते किंवा कायमचे वांझपण येते
जनावर माज वेळेवर दाखवत नाही, माजाचा काळ कमी जास्त होतो तसेच माजाचा स्त्राव घट्ट किंवा पातळ शेंबडासारखा पडतो.
गाई-म्हशींच्या सडांची तोंड लवकर बंद न झाल्याने काससुजी तसेच गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर सडातून दूध सतत टिपकत असते.


दुधातील फॅट कमी होऊन दुधाची प्रत कमी होते.
सडावर चिरा पडतात जखमा लवकर बऱ्या होत नाहीत तसेच धार काढताना जनावर लाथ मारते, हलते.
जनावर व्यायल्यानंतर कॅल्शिअम कमी होते त्याची वेळीच पूर्तता झाली नाही तर मिल्क फिव्हर होतो. तसेच वेळेत उपचार न केल्यास जनावर दगावते.
मायांग बाहेर पडते तसेच उपचार न झाल्यास जनावर दगावते.
गाई-म्हशी विताना वासरू अडकण्याचा संभव असतो तसेच व्यायल्यानंतर वार लवकर पडत नाही अडकून राहतो.
नवजात वासराचे वजन कमी भरते तसेच अपूर्ण दिवसाचे वासरू जन्माला येते.
जनावरांच्या पायाची हाडे,खुरे,शिंगे, अपघात प्रसंगी किंवा जोरात धडक दिल्यास मोडतात.
जनावराला खनिज मिश्रणे आहारातून न मिळाल्यास ते मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जनावर चप्पल, पिशव्या, रबर, माती, अशा अखाद्य वस्तू खाते त्यामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊन जनावर फुगते.

प्रतिबंधात्मक उपाय -
दूध उत्पादन व प्रजनन यशस्वीरीत्या चालू ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाची खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात आहारात असणे गरजेचे आहे.
खनिज मिश्रणाचा नियमित वापर करावा.
नवीन जातीच्या सकस वैरणी तयार कराव्यात.
आपल्या भागातील जमिनीतील खनिजांची कमतरता ओळखून परिपूर्ण घटक असणारे खनिज मिश्रणे खरेदी करावीत.

वापरण्याचे प्रमाण-(प्रतिदिन)
लहान वासरांसाठी- २०-२५ ग्रॅम
मोठ्या कालवडीसाठी -५० ग्रॅम
दुभत्या जनावरांसाठी ५०-१०० ग्रॅम

लेखक -
प्रा. नितीन रा. पिसाळ
डेअरी प्रशिक्षक,स्किल इंडिया प्रोजेक्ट,
विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.
मो.नं- 8007313597; ई-मेल-nitinpisal2312@gmail.com

English Summary: Mineral mixtures in animal diets are important, know what causes deficiency loss 19 oct Published on: 19 October 2020, 01:41 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters