Milk Rate: राज्यात दुधाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज पुण्यातील कात्रज येथे राज्यातील विविध दूध संघांची बैठक होत आहे. सध्या अनेक दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून जास्त दराने दूध खरेदी करतात, त्याचा परिणाम दरवाढीवर होण्याची शक्यता आहे. बैठकीला उपस्थित सदस्यांनी दूध खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत.
लम्पी रोगामुळे पशुधनाचे नुकसान होत असल्याने आता दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: कापसाच्या दरात मोठी घसरण; जाऊन घ्या आजचा दर
पुण्यातील कात्रज येथील दूध डेअरीमध्ये सरकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांची बैठक होत आहे. अमूलसारख्या कंपन्या जादा दराने दूध खरेदी करत असल्याने भविष्यात आम्हालाही दूध खरेदीचे दर वाढवावे लागणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली.
हेही वाचा: साखरेवरील निर्यातबंदी वाढवली; केंद्र सरकारने 'या' कारणांसाठी घेतला निर्णय
त्यामुळे भविष्यात दूध दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनेही दूध उत्पादक कंपन्यांना मदत करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
हेही वाचा: मुसळधार पाऊसानंतर राज्यात किती असणार थंडी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Share your comments