सध्या पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्यासहीत जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. आता दुधाच्या किमतीमध्ये सुद्धा 7 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना (milk producers) दिलासा तर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
दुधाची दरवाढ मुंबई मध्ये होणार असल्याने मुबईकरांना आता सुट्या दुधासाठी (milk) ७ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. ही दूध दरवाढ एक सप्टेंबर पासून लागू होणार असून मुंबईत 1 सप्टेंबर पासून सुटे दूध ७ रुपयांनी महाग होणार आहे.
दिलासादायक! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार रुपयांची मदत
त्यामुळे आता ग्राहकांना एक लिटर दुधासाठी (A liter of milk) 80 रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील. आपण पाहिले तर मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्याच्या इतर भागातून विशेषतः ग्रामीण भागातून दुधाचा पुरवठा केला जातो.
जनावरांचा चाऱ्याचा खर्च, हरभऱ्यासारख्या चाराचे दर सुद्धा वाढले आहेत त्यामुळरे परिणामी याचा फटका आता दूध उत्पादकांना बसताना दिसतोय. त्यामुळे दूध उत्पादकांनी सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Goat Farming: शेळीच्या 'या' 4 जाती शेतकऱ्यांना मिळवून देतील चांगला नफा
या कारणाने दूध उत्पादकांना (Milk producer) दिलासा मिळणार आहेत तर ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच अमूल आणि मदर डेरी च्या दुधात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
शेतकरी लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात; दर मिळतोय 500 रुपये किलो रुपये
दिलासादायक! पालेभाज्यांच्या दरात घट; जाणून घ्या आजचे बाजारभाव
शेतकऱ्यांनो तुमच्या शेतातून विजवाहिनी गेल्यास किंवा टॉवर उभा केल्यास मिळतो मोबदला; वाचा 'या' कायद्याविषयी
Share your comments