1. पशुधन

Milk business : दूध पूरक व्यवसाय, जाणून घ्या त्याची सद्यस्थिती

भारताच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत आणि विकासात या दूध व्यवसायाचा मोठा वाटा आहे. दुग्धव्यवसायाने उत्तुंग भरारी मारली असून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला आहे, आज तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरतो आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा किंबहुना बहुमूल्य योगदान भारतीय श्वेभतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्यामुळे झालेला दिसून येत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Milk business news

Milk business news

डॉ. झिने प्रविण लहाणू, डॉ. गजेंद्र कों. लोंढे, प्रा.सचिन ना.वायचाळ

शेती हाच भारतातील प्रमुख व्यवसाय ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, बहुतांशी कुटुंबाकडे मर्यादित शेती असल्याने पूरक व्यवसायाची गरज भासू लागली. यातूनच पशुपालनाच्या व्यवसायाला महत्त्व आले. सुरुवातीच्या काळात शेतीला दुग्धव्यवसाय हा जोडधंदा असेच स्वरूप होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये दुग्धव्यवसाय चांगलाच विस्तारला. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरु झालेला हा व्यवसाय आता खरे तर मुख्य व्यवसाय बनला आहे. खेडोपाडी आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत बनला आहे. स्वातंत्र्यानंतर दुधाचे उत्पन्न अतिशय कमी होते. तुलनात्मक विचार करता एकूण लोकसंखेच्या तुलनेत खूप कमी उत्पादन होते; परंतु धवल क्रांतीच्या अंमलबजावणीमुळे आपण दुग्ध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालो.

भारताच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत आणि विकासात या दूध व्यवसायाचा मोठा वाटा आहे. दुग्धव्यवसायाने उत्तुंग भरारी मारली असून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला आहे, आज तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरतो आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा किंबहुना बहुमूल्य योगदान भारतीय श्वेभतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्यामुळे झालेला दिसून येत आहे.

दुधाची महापूर योजना: १९७० ते १९८५-९६

भारतामध्ये गुजरात राज्यात व्यापारी तत्त्वावर दूध गोळा करण्याचे प्रयत्न १९०६ च्या सुमारास पोलसन कंपनीने केलेले दिसून येतो. या पोलसन डेअरीमार्फत त्या काळात खासगी दूध संकलन व विक्री व्हायची. मुंबईलाही दूधपुरवठा केला जायचा. मात्र, त्याचा उद्देश केवळ स्वत:च्या नफेखोरीचा. शेतकऱ्यांना नडायचा. आर्थिक लूट ठरलेली. शेतकरी, ग्राहकांची लुबाडणूक होऊ नये, म्हणून त्रिभुवनदास पटेल यांनी सहकारी तत्त्वावर दूध संघ निर्मितीची बिजे गुजरातमध्ये रुजवली. सहकारी तत्त्वावर दुग्धोत्पादन व पुरवठा करणारी भारतातील पहिली सहकारी संस्था, खेडा जिल्हा दुग्धोत्पादक संघ, १९४७ मध्ये स्थापन करण्यात आली. या संघाचे मुख्य कार्यालय आणंद येथे आहे. संघाचे कामकाज आदर्शवत समजले गेले जात आहे व त्यामुळेच त्यांचे काम "आनंद पॅटर्न' या नावाने प्रसिद्ध झाले, त्या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन मन उंचावण्यास मदत झाली, पुढे त्यांना साथ मिळाली ती डॉ. वर्गीस कुरियन यांची. या अधिकाऱ्यांनी अखे आयुष्य या क्षेत्रासाठी दिले.

तसेच आणंद पॅटर्न देशभर कसा राबवता येईल या दृष्टीने उपक्रम हाती घेण्यात आला. त्याचाच परिपाक म्हणजे केंद्र शासनाने 'नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना आणंद गुजरात येथे केली. बोर्ड या मंडळाने १९७० मध्ये भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण कार्याकरिता डॉ. वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वात ऑपरेशन फ्लड' नावाचा प्रकल्प हाती घेतला. या माध्यमातून भारतातील दूध उत्पादन, व्यवसायाला चालना मिळाली. दूध संघांना अनुदान, शीतकरणाची उभारणी, दूध डेअरी व पावडर प्लॅटची उभारणी झाली. श्वेनतक्रांतीमुळेचग्रामीण भागातील जीवनाला गती आली. श्वीतक्रांतीच्या परिणामामुळे, सर्वांच्या अथक प्रयत्नामधून भारत उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊन १९९७ पासून दूध उत्पादनामध्ये अग्रेसर आहे.

दुग्धउत्पादनाची सद्यस्थिती:

आजमितीला २२१ दशलक्ष टन ( जगाच्या उत्पादनामध्ये २२ टक्केद वाटा) एवढ्या प्रचंड प्रमाणावर दूध उत्पादन करून भारत जगात अव्वलस्थानी आहे. भारतीय दूध उत्पादनात म्हैस प्रवर्गाचा वाटा ४९%, गाय प्रवर्गाचा वाटा ४८%, शेळी मेंढी आणि इतर प्रवर्गाचा वाटा ३% दिसून येतो. जनावरांच्या संख्येच्या तुलनेत दुधाचे उत्पादन कमी होते हे आपल्याला माहीत आहे. देशी गायीपासून सरासरी दररोज ३ ७३ किलोग्रॅम दूध मिळत आहे तर तुलनेत संकरित गायींपासून दररोज सरासरी ७.६१ किलोग्रॅम दूध मिळते. भारतातील एकूण दूध उत्पादनापैकी १६.३२ % सर्वांत मोठा वाटा उत्तरप्रदेश राज्याचा आहे. त्या खालोखाल राजस्थान (१२.६%), मध्य प्रदेश ( ८.५ % ), आंध्र प्रदेश (८.० %), गुजरात (७.७%) दिसून येतो. भारत दूध उत्पादनात जगातील सर्वांत वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे (१४.५ टके) दुधाची दरडोई उपलब्धता ४०५ ग्रॅम प्रति माण सी प्रति दिवस इतकी असून दुधाच्या उत्पादनाचा विकासदर ६ टक्क्यांपर्यंत आहे. भारताच्या एकूण स्थूल उत्पादनामध्ये दूध व्यवसायाचा वाटा ४.१ टक्के इतका आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये २६ टक्के वाटा दुध प्रक्रिया उद्योगाचा आहे. सन २०१९-२० मध्ये भारताने ५१४२१. ८५ मेट्रिक ज्याचे एकूण मूल्य टन दुग्धजन्य पदार्थांची निर्यात केली व्यवसाय ७० ७६ दशलक्ष ग्रामीण कुटुंबाचे दुय्यम उत्पन्नाचे १३४१.०३ कोटी इतके होते. हा स्रोत म्हणून कार्यरत आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.

भारतात, सहकारी संस्था, खासगी दूध संस्थांट्रारे उत्पादन, खरेदी आणि मूल्यवर्धित उत्पादनांचा कल: भारताततील दूध उत्पादनामध्ये लहान, अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन मजूर यांचा महत्त्वपूर्ण वाटा दिसून येतो. भारतातील एकूण दूध उत्पादनापैकी सुमारे ४८% दूध उत्पादन उत्पादक स्तरावर वापरले जाते किंवा ग्रामीण भागातील गैर उत्पादकांना विकले जाते. उर्वरित ५२% दूध विक्रीयोग्य अधिशेष आहे. शहरी भागातील ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होते. विक्रीयोग्य अधिशेषातून असा अंदाज आहे. विकले जाणारे ४०% दूध संघटित क्षेतराद्वारे हाताळले जाते. मार्च २०१९ मधील आकडेवारीनुसार भारतातील १६.९३ दशलक्ष शेतकरी आहेत. सुमारे १९०५१६ गावस्तरीय दुग्धव्यवसाय संस्थांच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये एकूण दूध उत्पादनाच्या सर्वसाधारण पणे ४६ टक्केत दूध द्रवपदार्थ म्हणून वापरले जाते ५० टक्के दुधाचे विविध पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याकरिता वापरले जाते आणि सुमारे ४ टके दूध पाश्चिचमात्य दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज योगर्ट, आईस्क्रीम, दूध पावडर इत्यादींच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. भारतीय दुग्धजन्य पदार्थांचे प्रमुख निर्यातदार देश UAE (१८%), US (१५.६%), बांगलादेश (१४%) आणि फिलिपाइन्स (८.९%), भूतान, तुर्की, इजिप्त इत्यादी आहेत. दुग्धप्रक्रिया उत्पादनाच्या निर्यातीमध्ये प्रामुख्याने स्किम मिल्कपावडर हे सर्वात महत्त्वाचे निर्यात उत्पादन आहे जे एकूण निर्यातीच्या ४४ टक्केक आहे त्यानंतर तूप आणि लोणी (३५%) आणि संपूर्ण दूध पावडर यांचा क्रमांक लागतो.

पशुधन व दुग्ध व्यवसायामधील उन्नती विकासासाठी (भारत सरकार) केंद्र स्तरावरून राबविण्यात येत असलेल्या काही प्रमुख योजना: राष्ट्रीय पशुधन अभियान राष्ट्रीय गोकुळ मिशन पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण दुग्धव्यवसाय विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम पशुसंवर्धन सांख्यिकी, राष्ट्रीय पशु ग्रेग नियंत्रण कार्यक्रम, डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी, दूध सहकारी आणि शेतकरी उत्पादक संस्थांना सहाय्य करणे

पशुसंगोपन व दुग्धव्यवसाय या विषयांत शैक्षणिक संशोधन करणाऱ्या काही संस्था:

भारतातील कृषि व कृषि पूरक क्षेत्रातील अग्रगण्य असणारी संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद, न्यू दिल्ली त्या अंतर्गत येणारी सर्व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रे, राष्ट्रीय पशुआनुवंशिक संसाधन ब्युरो, भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्था, सर्व पशु व मत्स्य विद्यापीठे, कृषि विद्यापीठे, राष्ट्रीय डेरी विकास बोर्ड, कृषि विज्ञान केंद्रे, तसेच द नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाल हरियाणा, ही दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन व प्रक्रिया या क्षेत्रात संशोधन करणारी देशातील अग्रगण्य पशु व दूध शास्त्र संशोधन संस्था आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठी भारत सरकार अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था काम पाहते, या संस्थेचा उद्देश म्हणजे देशभरामध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करणे.

भारतीय दुग्धव्यवसायाची ठळक वैशिष्ट्ये

भारतातील दुग्धव्यवसाय हा व्यवसायापेक्षा अधिक आहे. त्याला व्यापक सामाजिक आणि आर्थिक पैलू आहेत. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये ३२ % वाटा दुग्धप्रक्रिया उद्योगाचा आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक तसेच मोठाग्राहक ही आहे. जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा 24% आहे. जागतिक गायीच्या पशु गणनेत / संख्येत भारताचा १६ % जागतिक म्हशीच्या पशु गणनेत / संख्येत भारताचा ५७% वाटा भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उत्पादनाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडच्या या प्रगत राष्ट्राचे डेअरी क्षेत्र निर्यातीवर अवलंबून आहेत; परंतु भारतीय दुग्धव्यवसायाची देशांतर्गत बाजारपेठ मोठी आणि वाढणारी आहे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे. दूध हा घराच्या आहारिक अर्थव्यवस्थेचा अत्यावश्यक घटक आहे.

शहरी गृहस्थ तुलनात्मक त्यांच्या एकूण खाद्य पदार्थ खर्चाच्या तुलनेत १६% खर्च दूध आणि दुग्धजन्यपदार्थांवर करतात असे दिसून येते. भारताची लोकसंख्या तिप्पट वाढूनही, प्रति दिवस दुधाची दरडोई उपलब्धता ही ४४४ ग्रॅम आहे जी ते जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. १९५० मध्ये १३० ग्रॅम / दिवस होती. जनावरांचे दुधाचे उत्पादन क्षमता कमी असले तरी ते जाती सुधारणा, उत्तम शेती व्यवस्थापन आणि निवडक यांत्रिकीकरणाद्वारे मोठ्‌या प्रमाणात वाढवू शकतात हे आपल्याला धवल क्रांतीमधून दिसून आलेले आहे, तसेच यामध्ये अजून प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत जनावरांची उत्पादन वाढवण्यासाठी वाव आहे.

भारताच्या कृषि जीडीपीमध्ये डेअरी क्षेत्राचा २७% वाटा दुग्धव्यवसायाचे उत्पन्न लक्षात घेता गहू, तांदूळ, मका, कडधान्य उत्पादनापेक्षा दूध हे भारतातील सर्वात मोठे कृषि पीक आहे असे म्हणता येईल. दुग्धव्यवसाय उत्पादकांना दुधावर खर्च होणाऱ्या ग्राहकांच्या रुपयांपैकी सुमारे दोन तृतीयांश रक्कधम मिळते सुमारे ७० दशलक्ष ग्रामीण कुटुंबे दुग्धव्यवसायात गुंतलेली आहेत, प्रत्येक दोन कुटुंबांपैकी एक कुटुंब या व्यवसायात गुंतलेली दिसून येते. भारताच्या ग्रामीण दुग्धव्यवसाय क्षेत्रात महिलांची ही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दुग्धव्यवसाय पीक उत्पादनाच्या तुलनेत उत्पन्नाचा तुलनेने स्थिर प्रवाह देते.

डॉ. झिने प्रविण लहाणू सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यलय सोनई, मो.न. ८५५०९०२६६०
डॉ. गजेंद्र कों. लोंढे विभाग प्रमुख, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय, वनामकृवी,परभणी मो.न. ९८९०५०५६४९
प्रा. सचिन ना.वायचाळ, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यलय भानाशिवरा, मो.न. ९११२३१२३४७

English Summary: Milk business Milk supplement business know its current status Published on: 09 February 2024, 04:22 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters