1. पशुधन

शेळ्या-मेंढ्यांमधील मावा आजार, जाणून घ्या ! उपाय

शेळी व मेंढीमधील मावा हा त्वचेचा आजार आहे. सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना हा आजार होऊ शकतो. लहान वयाच्या शेळ्या-मेंढ्यांमध्ये या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

KJ Staff
KJ Staff

 

शेळी व मेंढीमधील मावा हा त्वचेचा आजार आहे. सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना हा आजार होऊ शकतो. लहान वयाच्या शेळ्या-मेंढ्यांमध्ये या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजारांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे शेळ्या-मेंढ्या अशक्त होतात.  अशक्तपणा, पौष्टिक आहाराचा अभाव तसेच लहान करडांना दूध पिताना आल्यामुळे ताण येतो. त्यामुळे भेंड्यांची शेळ्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे जिवाणू व बुरशीजन्य आजारांना बळी पडून मरतात. या आजाराची तीव्रता मेंढ्या पेक्षा शाळांमध्ये अधिक असते. हा रोग कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. नारी संस्थेने सन २००९ ते २०२० या कालावधीत या आजाराचा अभ्यास केला. त्यावेळी हजाराचा जास्त प्रादुर्भाव शेळ्या आणि करडांना झाल्याचे आढळून आले. त्यापैकी उन्हाळ्यात १८ टक्के, पावसाळ्यात ५२ %, हिवाळ्यात ३० % शेळ्या आणि करडे मावा आजाराला बळी पडली होती. मावा आजाराचा जास्त प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो.

 मावा आजाराची कारणे आणि लक्षणे

 हा विषाणूजन्य होणारा संसर्गजन्य आजार आहे. एका शेळी किंवा मेंढीपासून दुसऱ्यांना याचा संसर्ग होतो, तसेच ओठ, नाकपुडीच्या बाजूला आणि तोंडामध्ये सुरुवातीला पुरळ येतात. नंतर जखमा होऊन खपल्या दिसतात. कोणत्याही प्रकारचा ताण, इतर आजार, पुरेसे खाद्य न मिळणे, निकृष्ट दर्जाचा चारा, तोंडाला चढताना लागलेले काटे, व इतर कारणांमुळे झालेल्या आजारामधून विषाणू संसर्ग होतो. आजारी शेळ्या, मेंढ्यांना ओठ व हिरड्यांना झालेल्या त्रासामुळे चारा खाता येत नाही. त्यामुळे त्या कमजोर व अशक्त होतात. या आजारांमध्ये मरतुकीचे प्रमाण असणारा ताण आणि त्यांची प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असतो. बाधित शेळी,  किंवा मेंढी बरी होण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. हा विषाणू थंड व कोरड्या हवामानात जास्त काळ तग धरू शकतो.

 


मात्र अति जास्त व आती कमी तापमानात मरतो.  मावा आजार झालेल्या पिल्लांमध्ये सुरुवातीला हिरड्यांवर पुरळ येतात. नंतर पुरळ तुटून हिरड्या लालसर होतात.  त्या ठिकाणी प्लॉवर सारख्या गाठी सुद्धा येऊ शकतात. तोंडातील व तोंडावरील लक्षणांमुळे पिल्लांना शेळीच्या कासेतील दूध देणे अवघड जाते. रोगग्रस्त करडांमार्फत दूध पिताना शेळीच्या सडाला देखील संसर्ग होऊ शकतो. त्याजागी फुटकुळ्या येऊ शकतात. सडाला बाहेरून रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेळ्या करडांना दूध पिऊ देत नाहीत. काही वेळी शेळ्या-मेंढ्यांना कासदाह सुद्धा होतो. हा आजार प्राण्यांमधून मानवाला होणाऱ्या रोग समूहात येतो. हा आजार प्राणी प्रसारित आहे. सडाला प्रादुर्भाव झालेल्या शेळ्यांचे दूध काढल्यास याच प्रकारचा संसर्ग दूध काढणारे हाताला बोटांना देखील होऊ शकतो.

हेही वाचा : कमी वेळात मालामाल बनवणारी शेळी; जाणून घ्या 'या' जातीविषयी

मावा आजारामुळे होणारे नुकसान

 या आजारांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी शेळ्या-मेंढ्या अशक्त होतात. औषध उपचारवर जास्त खर्च होत असतो. प्राण्यांची उत्पादनक्षमता कमी होते, काहीवेळा कासदाह होऊन दूध कमी होते. त्यामुळे पिल्लांची जोपासना व्यवस्थित होत नाही. पिल्लांचा वाढीचा दर कमी होऊन बाजारात योग्य किंमत मिळत नाही. काही शाळांमध्ये कायमस्वरुपी वंध्यत्व येते.

मावा आजारावरील उपाय

हा आजार विषाणुजन्य आजार असल्यामुळे यावर कोणत्याही प्रतिजैविकांचा वापर होत नाही. यावर सध्या तरी कोणतीही लस उपलब्ध नाही. जखमा सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुऊन साफ कराव्यात. तोंड व ठाणवरील जखमांवर हळद व लोणी किंवा दुधाची साय यासारखे पदार्थ लावावेत. जखमा लवकर बऱ्या होतात. बोरो गिलीसरीन सारखे औषध लावावे. खाद्यामध्ये कोवळा लुसलुशीत चारा, कोथिंबीर, मेथी घास द्यावे. अशक्तपणा दूर करण्यासाठी लापशी, गूळ पाणी यासारखे पौष्टिक पदार्थ द्यावेत.

 माहिती स्त्रोत- स्मार्ट डेरी- डिजिटल मॅक्झिन

English Summary: mava disease in Goat-sheep, know the remedy Published on: 26 October 2020, 10:57 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters