आपल्या देशातील शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेती नव्याने बहरून येण्यासाठी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्या पूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.
दुग्ध व्यवसायातून अधिक नफा कमावण्यासाठी वयातून मोडकळीस आलेला शेती व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नवीन कामधेनु संकरित गाई बाळगायला हवी. आता तुमच्याकडे असलेली स्थानिक जातीची गाईयासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ही स्थानिक जातीची गाई माजावर आली की तिला पशुवैद्यकीय केंद्रावर नेऊन जर्सी होस्टेईनसारख्या वाळूच्या बिजने भरून आणले म्हणजे या कार्यास प्रारंभ झाला. या पद्धतीमुळे नवीनजन्माला आलेली कालवड स्थानिक जातीच्या वासरा पेक्षा अधिक गुण संपन्न असते. ते आपल्याला खाली नमूद केलेल्या तुलनेवरून लक्षात येईल
योग्य संगोपन केल्यास संकरित वासराची वाढ स्थानिक वासरा पेक्षा अधिक वेगाने होते. वाढलं लवकर झाल्यामुळे ती कालवड लवकरात लवकर ( साधारणत: नऊ महिने)माजावर येते आणि अडीच वर्षापर्यंतविते. स्थानिक गाईचे जेव्हा पहिले वेत मिळते. तेव्हा संकरित गाईचे दुसरे-तिसरे वेत सुरू असते.
संकरित गाई फक्त लवकरच माजावर येत नाही तर त्या स्थानिक आई पेक्षा चार-पाच पटीने जास्त दूध देतात. त्याच प्रमाणे त्यांचा भाकड काळही 60 ते 90 दिवसाचा असल्यामुळे दोन वेता मधील कालावधी हा स्थानिक गाई पेक्षा कमी असतो. तसेच संकरित गाई विल्यानंतर साधारणपणे60-70 दिवसात माजावर येते. आणि पुन्हा गाभण राहू शकते. यावरून असे लक्षात येते की संकरीत गाईची प्रजनन शक्ती ही स्थानिक गाई पेक्षाचांगल्यादर्जाचे असते. शिवाय गाभण राहिल्यावर 8 व्या महिन्यापर्यंत दूध देऊ शकते ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. या गाई शांत स्वभावाचा असल्यामुळे त्यांचे मुक्त गोठ्यात संगोपन सहज करू शकतो. या बाईंना गोठ्यात बांधण्यासाठी स्थानिक गाई एवढीच जागा लागते.या गायींची देखबाल गोठ्यात बांधूनच होत असेल तर गोठा साफ ठेवला म्हणजे झालं. कारण त्या रोगाला लवकर बळी पडतात. बंदिस्त-मुक्तजिठ्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवणे सहजशक्य होते. तसेच ठराविक कालावधीमध्ये लाळ्या, खुरकुत, फेऱ्या,घटसर्प, फाशी,बुळकांडी यासारख्या रोगांच्या प्रतिबंधात्मक लसी टोचून घेतल्यास त्या सहजपणे रोगाला बळी पडत नाहीत.
ठाणे जनावरांप्रमाणे गवत पेंढा इ. वैरण या गायींना चालते.मात्र ती चांगल्या प्रतीची असावी. सडलेली अथवा कुजलेली नसावी. संकरित गाईंना स्थानिक गाई पेक्षा अधिक खुराक लागतो.परंतु त्याच प्रमाणे त्या स्थानिक गाई पेक्षा जास्त दूध उत्पन्न देतात.
स्वच्छ आणि मुबलक पाणी त्यांना वेळेवर देणे गरजेचे असते. संकरित गाईंना स्थानिक गाई पेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते.
- गाभण गाईंची अशी घ्या काळजी:-
संकरित गाई पासून अधिक दूध उत्पादन करून आर्थिक फायदा करून घेणे शक्य आहे. हे आता सर्वांच्याच लक्षात आले असेल. त्यासाठी गाभण गाईची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ती कशी घ्यावी हेही समजून घेणे आवश्यक आहे.
जवळ असलेल्या गाईची जात, वजन, वय, आकारमान लक्षात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने गाई कोणत्या प्रकारच्या वाळूच्या वीर्याने भरून घ्यायची ते ठरवावे. शक्यतो कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करावा. गाई माजावर आल्यावर 48 तासांच्या आत भरून घेणे गरजेचे असते. अन्यथा दिरंगाई केल्यास माजजातो. आणि पुन्हा 20-22 दिवस थांबावे लागते. हे सर्व करत असतांना त्या गाई बद्दलची सविस्तर नोंद नोंदवहीत करणे फायद्याचे ठरते.
गाई गाभण राहिल्यानंतर तिच्या खाद्याची, खुराकाची,पाण्याची बसणे उठण्या च्या जागेची रोगांची इत्यादी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास गर्भशयात वाढणाऱ्या वासराची काळजी घेतली जाते. यासाठी गाई गाभण राहिल्या पासून दररोज दोन किलो खुराक द्यायलाच हवा. सातव्या महिन्यापासून दररोज तो चार किलो असा द्यायला हवा. त्याचबरोबर उत्तम प्रतीची पोटभर वैरण, भरपूर आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता असलीचपाहिजे. तसेच तिचा मर्यादित व्यायाम होण्यासाठी तिला ठराविक काळासाठी इतर जनावरांपासून वेगळी बांधावी. यामुळे तिला इतर जनावरांपासूनकोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही. काल वाढीच्या बाबतीत गाभण काळात विशेष लक्ष द्यावे लागते. कारण तिच्या शरीराचीही वाढ चालू असते. आणि वासराच्या ही वाढीचा ताण असतो. यामुळे तिच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.
संकरित गाईच्या गाभण काळातील शेवटचे काही दिवस विशेष लक्ष पुरवावे लागते. कारण यांचा भाकड काळ अगदी कमी असतो. त्या व्हायला झाल्या तरीही दुध देत असतात. त्यामुळे दूध उत्पादन आणि गर्भशयात वासराचे संगोपन या दोन्हीही गोष्टीचा ताण तिच्या शरीरावर पडत असतो.जन्माला येणारे वासरू चांगलेनिपजण्यासाठी व पुढील काळात योग्य दूध उत्पादन मिळवण्यासाठी भाकड काळ कमीत कमी 60 दिवसाचा आवश्यक असतो. त्यामुळे त्यापूर्वीच योग्य नियोजन करून ठेवावे.
गाई भाकड करताना ती हळूहळू आठ दहा दिवसात करावे. त्यासाठी खुराकाची मात्रा कमी कमीकरावी. दूध बंद करत असताना गाईला त्रास होत नाही ना याची काळजी घ्यावी.गाई भाकड झाल्यानंतर तिच्या संडा मध्ये पेनिसिलीन सारखे अँटिबायोटिक औषध करावे. त्यामुळे व्याल्यानंतर त्या गाईला स्तनदाह होण्याची शक्यता कमी असते.
गाभण काळातील सातव्या महिन्यापासून गाईची हालचाल मर्यादित ठेवावी. कळपात अथवा डोंगर कपारी वर त्यांना चारण्यासाठी सोडू नये.वितेवेळी तिला खास देखरेख खाली ठेवावी.तिच्याकडे विशेष लक्ष द्यावे. वेळ पडल्यास वितेवेळी मदतही करावी.अथवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.
Share your comments