
Major causes of fungal forage in animal feed (image google)
पशुखाद्द्य तसेच भरड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली असल्यास.
पावसात भिजलेला खुराक किंव्हा सरकी पेंढ काही दिवसानंतर जनावरांना खाऊ घातल्यास.
• पशुखाद्य किंवा पेंढ यांचा पाण्याशी संपर्क आल्यास किंवा खाद्य पावसात भिजल्यास.
• पशुखाद्द्य किंवा धान्याची साठवणूक अति दमट ठिकाणी अधिक काळ केल्यास.
चारा पूर्णपणे वाळलेला नसताना रचून ठेवल्यास किंवा वाळलेला चारा पावसात भिजल्यास.
• वाळलेला चारा उदा.ज्वारीचा, बाजरीचा कडबा, मका, कडवळ, गहू, तूर, हरभरा, सोयाबीनचा भुसा पावसात किंवा पाण्याने भिजल्यास.
• कोरडा चारा म्हूणन गहू, तूर, हरभऱ्याच्या भुसावर प्रक्रिया करताना कल्चरचे प्रमाण कमी-जास्त स्वरूपात झाल्यास.
• हिरव्या चाऱ्यामध्ये रसशोषक कीटकांचा तसेच अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ते जनावरांच्या खाण्यात आल्यास.
• मुरघास तयार करताना पाण्याचे प्रमाण लक्षात न घेतल्यास.
• मुरघासाच्या बंकरला पायथ्याला १ फुटाचा उतार न दिल्यास. चाऱ्यातील पाणी खाली साचून राहते त्यामुळे तळपायातील मुरघास काळा पडतो.
मका लागवड, संपूर्ण माहिती जाणून घ्या
मुरघासामध्ये टाकण्यात येणाऱ्या कल्चरचे प्रमाण कमी जास्त झाल्यास तसेच बंकरमध्ये मुरघास तयार करतांना पूर्णपणे हवा बंद न झाल्यास.
• बॅगेतील मुरघास केल्यानंतर ५ दिवसांनी त्या बॅगेमधील हवा बाहेर न काढल्यास.
• मुरघासाच्या पिशवीत, खड्डयात, किंवा बंकरमध्ये पावसाचे पाणी किंवा हवा शिरल्यास.
• मुरघास तयार झाल्यानंतर जनावरांना खायला दिल्यानंतर बॅग चांगली बंद न केल्यास.
• मुरघास तयार करतांना रोगयुक्त किंवा बुरशी लागलेली चारा पिके वापरल्यास.
• हॉटेलमधील किंवा समारंभातील उरलेले तसेच बुरशी लागलेले अन्न खाऊ घातल्यास.
• कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ उदा. मोलासेस, बार्ली इत्यादी जनावरांना खाऊ घातल्याने.
• टीप- जनावरांना दररोज सकस स्वच्छ, रोगजंतूविरहित चारा द्यावा. जेणेकरून विषमुक्त व सकस दूध तयार होईल.
लेखक
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..
मत्स्य उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक
"FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली"
Share your comments