भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पर्यंत पशु पालणा मध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतातपशु पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे प्राण्यांचा गर्भपात.या लेखात आपण प्राण्यांचा गर्भपात व त्यांची कारणे जाणून घेऊ.
प्राण्यांची गर्भपात व त्याची कारणे मृत किंवा 24 तासांपेक्षा कमी काळ जिवंत भ्रूणचेगर्भ काळ पूर्ण होण्यापूर्वी गर्भाशयातून बाहेर पडनेह्याला गर्भपात म्हणतात. याची विविध प्रकारची कारणे असतात. गाई पेक्षा म्हशी मध्ये गर्भपात कमी होतो. त्याची काही संक्रामक आणि असंक्रामक घटक असतात.
संसर्गजन्य गर्भपात घटक
गर्भपाताचे संक्रामक घटक फ्लोरोसेंट अंतीबोडीज तंत्राद्वारे सहज शोधता येतात.2.9 टक्के गर्भपात करणारे संसर्गजन्य घटक ब्रुसेलाएबोर्टसनावाच्या बॅक्टेरिया मुळेनिर्माण होतात. गाई आणि म्हशी मध्ये गर्भपात करणारे हे सर्वात प्राणघातक घटक आहेत. या बॅक्टेरियाची लागण म्हशीच्या गुप्तांग आणि दुधाच्या स्त्रावामुळे होते.गर्भ, दूध आणि रक्त इत्यादीचे नमुने घेऊन हे बॅक्टेरिया ओळखले जाऊ शकतात.
व्हायरस गर्भपात संक्रमण
प्राण्यांमध्ये होणाऱ्या गर्भपात होण्याकरिता विविध विषाणूजन्य घटक जबाबदार असतात. त्यापैकी बोवाइन व्हायरल,एपीजुटीकबोवाईन अबोर्शन,बोवाइन व्हायरल डायरिया हे प्रमुख आहेत.ट्रायकोमोनीएसीससारखे प्रोटोजोआ समूह घटकदेखील गर्भपात होण्यामध्ये प्रमुख घटक आहेत. संक्रमित बैलाच्या वीर्यात संक्रमित झाल्यावर हा प्रोटोझोआ पसरतो. उच्च तापामुळे प्राण्यांमध्ये गर्भपात होतो.
असंक्रामक गर्भपात घटक
रासायनिक किंवा विषारी पदार्थ, कुपोषण, अनुवांशिक कारक घटकांवर गर्भपात होतो. याशिवाय जेव्हा शरीरातील विविध हार्मोन्सचे संतुलन बिघडते तेव्हा गर्भपात होतो. असामान्य वातावरण, लांब प्रवास इत्यादी सारखे शारीरिक कारणांमुळे देखील गर्भपात होतो.
बॅक्टेरिया मुळे होणारा गर्भपात
लेप्टोस्पायरा पोमोना नावाचा एक पायरो किट हा देखील गर्भपाताच्या मुख्य जिवाणू पैकी एक आहे. यामध्ये तीव्र ताप झाल्यानंतर गर्भधारणा च्या शेवटच्या तीन महिन्यांमधील गर्भपात होतो. लेप्टोस्पायरा नावाचा रोग ताप नंतर किंवा कोणत्याही लक्षनाशिवाय गर्भपात होतो. हे प्राण्यांमध्ये जास्त आढळते. या रोगाचे निदान गट चाचणी द्वारे केली जाऊ शकते.इतर जीवाणू जसे की विब्रियोसीस,पस्तुरीला मल्टोसिडा, साल्मोनेला पैराटाइफीइत्यादी देखील प्राण्यांमध्ये गर्भपात होण्याचे मुख्य कारण असू शकतात.
पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे गर्भपात
विटामिन एच्या कमतरतेमुळे गर्भपात होऊ शकतो. संतुलित आहार देऊन त्याची कमतरता दूर केली जाऊ शकते.मृत वासराला फास्फोरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचा अभाव असल्याचे आढळले आहे.आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भपात होऊ शकतो
गर्भपात टाळण्यासाठी उपाय
- कृत्रिम गर्भधारणेसाठी निर्जंतुकीकरण साधने वापरली पाहिजेत.
- नव्याने खरेदी केलेल्या प्राण्यांना मूळ प्राण्या मध्ये समाविष्ट होण्यापूर्वी कमीत कमी एकवीस दिवस बाजूला ठेवा आणि पशुवैद्यक तपासल्यानंतर त्यांना मूळ प्राण्यांमध्ये समाविष्ट करा.जेणेकरून रोगाचा प्रसार होण्यापासून रोखता येईल.
- डेरी फार्म मधून प्राणी खरेदी करताना, जे फार्म सर्व प्राण्यांचे रेकॉर्ड ठेवतात त्यांच्याकडून खरेदी करा.
- प्राण्यांमध्ये गर्भधारणा करण्यापूर्वी बैल किंवा वीर्य संक्रमित नसल्याचे सुनिश्चित करा.
- हिरवा चारा देऊन गर्भपात होण्यापासून देखील विटामिन ए ची कमतरता टाळता येते.
- या प्राण्यांमध्ये गर्भपात झाला आहे त्यांना गटातील इतर प्राण्यांपासून विभक्त केले पाहिजे.
- खराब सायलेज चारा म्हणून वापरू नये.
- प्राण्यांच्या आहारात अचानक बदल करू नये.
- ब्रुसोलेसिस रोखण्यासाठी ब्रुसेलाइ बोर्टझस्ट्रेन ही लस करून या जीवाणूंचा गर्भपात होण्यापासून बचाव होऊ शकतो.
- दुग्ध शाळेचे वातावरण स्वच्छ व निर्जंतुकीकरणकेले पाहिजे.
- संक्रमित बैलांचा वापर गर्भधारणे साठी करू नये.
( टीप- कुठलाही उपचार करण्या अगोदर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.)
Share your comments