देशभरात जनावरांमध्ये लम्पी (Lumpy) त्वचा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालकांची (Cattle breeder) चिंता वाढली आहे. मात्र महाराष्ट्रात (Maharashtra) प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन लम्पी त्वचा रोगाला आला घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bomb) यांनी स्वतःच्या खर्चातून जनावरांचे लसीकरण करण्याचे उपक्रम हाती घेतले आहे. आमदार बंब यांनी स्वतःच्या खर्चातून 80 हजार खाजगी लसी विकत घेतल्या आहे.
गंगापूर (Gangapur) तालुक्यातील 68 हजार जनावरांचं लसीकरण केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी 40 शासकीय आणि खाजगी डॉक्टरांची फौज उभा करण्यात आली होती. एकूण पाच दिवसांत संपूर्ण तालुक्यातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
यासाठी आमदार बंब यांना 12 लाख रुपायांचा खर्च आला आहे. संपूर्ण लसीकरण झालेला गंगापूर तालुका राज्यातील पहिला तालुका ठरला आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकार देणार 78 दिवसांचा बोनस, जाणून घ्या कोणाला होणार सर्वाधिक फायदा
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, गेल्या १५ ते २० दिवसांच्या तुलनेत लम्पी चर्मरोगाच्या जनावरांमध्ये घट झाली आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण केले आहे. राज्यात 72 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! बाळासाहेबांच्या नावे राज्यात 700 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करणार
महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत पाटील म्हणाले की, पूर्वीचे सरकार असते तर आजपर्यंत राज्यात लाखो गुरांना या आजाराने आपला जीव गमवावा लागला असता. पाटील हे सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यासोबतच लम्पी रोगाची लागण झालेल्या जनावरांची तपासणी करण्यात येत आहे. राज्यात लवकरच 100 टक्के लसीकरणाचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Share your comments