छत्रपती संभाजीनगर
राज्यात पुन्हा एकदा लम्पी संसर्गाने डोकं वर काढले आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि जालना या चार जिल्ह्यांतील लम्पी बाधित जनावरांची संख्या ५१७ वर पोहचली आहे.
लम्पी बाधित जनावरांची सर्वाधिक २९७ इतकी संख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. परभणी जिल्ह्यात १४४, जालनामध्ये ५८, बीडमध्ये १८ संख्या आहे.
१ एप्रिल ते ९ ऑगस्ट दरम्यान १ हजार २८८ गाई आणि १ हजार ९६३ बैल मिळून ३ हजार २५१ जनावरांना प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते. यातील ४२३ जनावरांना आपला जीव गमवावा लागला. गत ४ महिने ९ दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या ४२३ जनावरांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २३, बीडमधील १६५, परभणीतील १८८ आणि जालन्यातील ४७ जनावरांचा समावेश आहे.
कोल्हापूरमध्ये देखील जनावरांना लम्पीची लागण
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गारगोटी, भुदरगड आणि कागल तालुक्यात लम्पीने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे पशुपालकांची अधिक चिंता वाढली आहे. लम्पीच्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या देखत जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे. यामुळे पशुपालक मोठा आर्थिक फटका बसत आहे.
Share your comments