जेव्हा जगात शेती करण्यास सुरुवात झाली, अगदी तेव्हापासूनच शेतकरी बांधव पशुपालन करत आला आहे. देशात तसेच राज्यातही अनेक शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. गेल्या एका दशकापासून पशुपालनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे, आता मोठ्या स्तरावर पशुपालन केले जाऊ लागले आहे. पशुपालनातून पशुपालक शेतकरी चांगली मोठी कमाई देखील करीत आहेत.
देशात तसेच राज्यात गाईचे पालन मोठ्या प्रमाणात होते. गाई पालन हे इतर पशुपालनाच्या तुलनेने सोपे असल्याने अनेक शेतकरी गाई पालनास पसंती दर्शवतात. शेतकरी मित्रांनो भारतात जवळपास 26 गाईंच्या जातींचे पालन केले जाते, आज आपण यातील काही प्रमुख गाईच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत. पशुपालन व्यवसायात आणि दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पशूची योग्य जात निवडणे महत्वाचे ठरते. पशुपालन जर केवळ दुग्धोत्पादनासाठी केले जात असेल तर दुग्ध क्षमता उत्तम असलेल्या पशूंच्या पालन केले जाते. देशात गाय पालन अनेक शेतकरी दुग्धोत्पादनासाठी करतात. आज आपण दुग्धोत्पादनासाठी उत्तम असलेल्या गाईंची देखील माहिती जाणून घेऊया.
भारतात पाळल्या जाणाऱ्या गाईची jati
देवणी: देऊनी गाय महाराष्ट्रातील एक गावरान गाय आहे, या गाईचे पालन सर्वात जास्त मराठवाड्यात केले जाते. अलीकडे राज्यातील इतर भागात देखील या गाईचे पालन मोठ्या प्रमाणात होत आहे. मराठवाड्यातील लातूर नांदेड बीड परभणी तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात देवणी गाय प्रकर्षाने दिसून येते. या गाईला स्थानिक शेतकरी मराठवाड्याची कामधेनु असे देखील सांगतात. देवणी गाय एका दिवसाला सात लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. ही गाय एका वेतात जवळपास बाराशे लिटर दूध देण्यास सक्षम असते.
खिल्लार: राज्यातील पश्चिम भागात या गाईचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत ही गाय प्रामुख्याने आढळते. खिल्लार गाय एका वेतात सुमारे 1000 लिटर दूध देण्यात सक्षम असल्याचे कृषी वैज्ञानिक नमूद करतात.
गौळावू: ठीक आहे महाराष्ट्रातील विदर्भ विभागात आढळते, विदर्भातील नागपूर व वर्धा या दोन जिल्ह्यात ही गाय मोठ्या प्रमाणात आढळत असते. गवळाऊ गाय एका वेतात 800 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते.
राठी: दूध उत्पादन साठी या गाईचे पालन करण्याची शिफारस केली जाते. राठी गाय एका वेतात जवळपास अकराशे ते बाराशे लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते.
साहिवाल: देशातील सर्व सर्वोत्कृष्ट गायीच्या जातींत साहिवाल ही गाय मुडते. या गाईचे सरासरी दूध उत्पादन चौदाशे ते पंचवीसशे लिटर प्रति वेत असते. यामुळे निम्नलिखित गाईंचे पालन करून पशुपालक शेतकरी चांगली मोठी कमाई करू शकतात.
Share your comments