1. पशुधन

बैलाला शेतीकामाचे प्रशिक्षण कसं आणि कशाप्रकारे द्यावे, जाणून घ्या सविस्तर

शेती पद्धती मध्ये किती ही मोठा बदल घडून असला तरी अजून सुद्धा खेडोपाडी शेती ही बैलांच्या मदतीने आणि साह्याने केली जात आहे. बैलांचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जात आहे त्यामध्ये मालवाहतूक, शेतीची विविध कामे त्यामध्ये नांगरणी, पेरणी यामध्ये बैलांचा वापर केला जातो शिवाय काही प्रगतशील शेगकरी सुद्धा शेतीकामासाठी बैलांचंच वापर करत आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
bull

bull

शेती(farming) पद्धती मध्ये किती ही मोठा बदल घडून असला तरी अजून सुद्धा खेडोपाडी शेती ही बैलांच्या मदतीने आणि साह्याने केली जात आहे. बैलांचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जात आहे त्यामध्ये मालवाहतूक, शेतीची विविध कामे त्यामध्ये नांगरणी, पेरणी यामध्ये बैलांचा वापर केला जातो शिवाय काही प्रगतशील शेगकरी(farmer) सुद्धा शेतीकामासाठी बैलांचंच वापर करत आहेत.

ट्रॅक्टरने योग्य पध्दतीने शेतीची मशागत होत नाही:

शेतीची विविध कामे करण्यासाठी बैलांना किंवा खोंडांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे खूप गरजेचे आहे कारण खोंडांना शिकवण्यासाठी खरिपाचा हंगाम हा अत्यंत उपयुक्त असतो. शेतजमिनी मोकळ्या असतात त्यामुळे शिकवणे सुद्धा सोपे जात असते.आजसुद्धा बरेच शेतकरी ट्रॅक्टरने योग्य पध्दतीने शेतीची मशागत होत नसल्यामुळे बैलांचा वापर शेती  मशागतीसाठी  करतात शिवाय ट्रॅक्टर ने रान मोठ्या प्रमाणात तुडवले जाते आणि रानात पीक उगवण्याची क्षमता कमी होत असल्याने बरेच शेतकरी आज सुद्धा बैलांचा वापर शेतीकामासाठी करतात.

हेही वाचा:केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवर 1 जून पासून बंदी


खोंडांचे प्रशिक्षण:-

शेतीची कामे शिकवण्याच्या आधी खोंडांच्या नाकात व्यसन घालावी जेणेकरून खोंड आपल्या नियंत्रणात राहील. त्याचबरोबर शेतीची कामे शिकवताना खोंडांला मायेने आणि प्रेमाने वागवावे यामुळे प्रशिक्षण देणे अत्यंत सोपे आणि सोयीस्कर होते. तसेच खोंडाला शिवळ घ्यायला शिकवावे. असे करत असताना नेहमी, उजव्या बाजूचा खोंड उजव्या बाजूस तर डाव्या बाजूचा खोंड डाव्या बाजूस जुंपावा. एकदा खोंड शिवळ घ्यायला शिकला की त्याला ७५ किलो वजनाचा लाकडी ओंडका कसाऱ्याच्या साहाय्याने मध्यभागी बांधून ओढायला शिकवावे. जेणेकरून पुढे जाऊन, बैलगाडी, नांगर, तिफन ओढण्यास मदत होईल आणि शिकवण्यास सुद्धा सोपे होईल.

हेही वाचा:टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ शेतकरी मालामाल ,काय आहे टोमॅटो दरवाढी मागे कारण, जाणून घ्या

खोंडाचे खच्चीकरण:-

शेतीकामासाठी वापरायच्या बैलाचे खच्चीकरण करणे खूप महत्वाचे असते. खोंडांचे खच्चीकरण हे एक ते दिड वर्षाच्या कालावधी मध्ये करून. खोंडा चे योग्य वयात खच्चीकरण केल्याने खोडांचा स्वभाव हा अत्यंत शांत होऊन तो सशक्त होतो. शरीरातील उर्जेच योग्य व्यवस्थापन केल्याने भविष्यात चांगल्या प्रतीचा बैल निर्माण होण्यास मदत होते. खच्चीकरण केल्यानंतर लगेचचं खोंडाला शेतीकामासाठी लगेच नेऊ नये खच्चीकरण केल्यानंतर सर्वसाधारणपणे १५ दिवसांनी खोंडाला शेतीच्या कामासाठी वापरण्यास सुरुवात करावी.

English Summary: Learn in detail how and when to train oxen in agriculture Published on: 01 June 2022, 11:02 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters