थंडीच्या दिवसात जनावरांना लाळ खुरकूत या रोगाची लागण होण्यास सुरुवात होते.हा संसर्गजन्य रोग असल्याने अल्पावधीतच याचा प्रादुर्भाव वाढतो.सध्या पश्चिम महाराष्ट्रात या रोगाची लागण जनावरांना झालेले आहे.
लागण झालेल्या जनावरांवर उपचार सुरू आहेत तर जिल्हाभर लसीकरणाला ही सुरुवात झाली आहे. हिवाळ्यामध्ये हा आजार अधिक फैलावतो. या लेखामध्ये आपण लाळ्या खुरकूत या आजाराचे लक्षणे व उपाय याबद्दल माहिती घेणार आहोत.
लाळ्या खुरकूत आजाराची लक्षणे
- या आजाराची लागण झाली की जनावर हे शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. तसेच पाणी पिणे बंद करते.
- दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते.
- तसेच या आजारात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जिभेवर फोड येतात.
- जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायाच्या मध्यभागी फोड येतात.
- गाभण जनावरांच्या मागच्या पायात हे फोड आले तर अपंगत्व सुद्धा येऊ शकते.
लाळ्या खुरकूत आजारावर प्रतिबंधात्मक उपाय
- या आजाराची साथ सुरू असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. किंवा जनावराला आजार झाला आहे त्याच्या शेजारी निरोगी जनावरे बांधू नये. तसेच त्याचा चारा ही दुसऱ्या जनावरांना देऊ नये. कारण लाळ्या खुरकूत आजार हा लाळेपासून पसरतो.
- लाळ्या खुरकूत झालेल्या जनावरांपासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्यांचे स्वतंत्र सोय करावी.
- या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात. ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी.
- जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याचा सोड्यानेव गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोग प्रसार टळेल.
- लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही.
- लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणासाठी लसीकरण आणि सप्टेंबर आणि मार्च मध्ये करा.
Share your comments