1. पशुसंवर्धन

जनावरातील लाळ्या- खुरकत आजार; जाणून घ्या! कारणे अन् नियंत्रण

KJ Staff
KJ Staff

सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, दूध दरामुळे अडचणीत आलेला दूध व्यवसाय, तसेच वाढते पशुखाद्याचे दर आणि दुधाला भाव कमी मिळत असल्याने सध्या तरी पशुपालकाला खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. परंतु ऋतुमानानुसार नविन रोगाची साथ येत असल्याने दूध उत्पादनात घट होत असते. यामुळे पशुपालकांना या आव्हानाला नेहमी सामोरे जावे लागते. या आजारांमुळे गुरांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी खबरदारी घेणे महत्वाचे असते. सध्या परतीचा मान्सून सुरु असल्याने तापमानातील चढ-उतार त्यामुळे जनावरांमधील होणारे कायिक बदलांना समजून घेणे पशुपालकांना अवघड जाते. या काळात लाळ्या-खुरकत सारख्या भयंकर आजाराची उत्पत्ती होऊन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  हा आजार संसंर्गजन्य असून यामुळे दूध उत्पदनात घट होत असते. 

१) तोंडखुरी  (तोंडाचा आजार):-

रोग पसरण्याची प्रमुख कारणे :-

 1. बैलगाडी, ट्रॅक्टर टायर.
 2. कातडी चप्पल, बूट.
 3. पशुवैधक तसेच त्यांची मोटारसायकल.
 4. व्यापाऱ्यांमार्फत तसेच वाहतुकीमार्फत.
 5. वातावरणातील दूषित हवा, पाणी.
 6. दूषित कपडे.
 7. दुधाच्या बादल्या, भांडी, मिल्किंग मशीन
 8. रानटी कुत्री इत्यादी.

 

तोंडखुरी लक्षणे :-

 • जनावर रवंथ करत नाही.
 • तोंडातून लाळ तसेच पांढरा फेस गळतो.
 • तोंडाची आग होते.
 • जनावराला चारा चावता येत नाही, धाप भरते.
 • चौवीस तासात तोंडातील फोड फुटतात व तोंडात अल्सरसारखे दिसते.
 • चारा-पाणी न खाल्याने जनावरे अशक्त बनतात तसेच डिहायड्रेशनमध्ये जातात.
 • शरीराचे तापमान १०४- १०६ अंशापर्यंत जाते, तसेच जनावरांच्या डोळ्यातून सतत पाणी येते.
 • जनावराच्या अंगात ७-८ दिवस ताप मुरल्यास गाभण जनावराचा गर्भपात होतो.

 तातडीच्या उपाययोजना :-

 1. जनावराचे तोंडातील जखमा जंतुनाशकाने किंवा तुरटीच्या पाण्याने धुवाव्यात. प्रमाण (५ ग्रॅम तुरटी १ लिटर पाणी)
 2. फोडावर जंतुनाशक मलम लावावा.
 3. जिभेवर ग्लिसरीन किंवा कोरफडीचा गर तोंडावर लावावा.
 4. हळद व तूप एकत्र करून जिभेवर चोळावे.
 5. आजारी जनावरांना द्रवरूप किंव्हा मऊ व सकस आहार द्यावा.

 ) पायखुरी लक्षणे :-

हा आजार प्रामुख्याने खुराच्या मध्यभागी  होतो.

 1. जनावरे अशक्त दिसतात.
 2. जनावर लंघडते तसेच बसून असते.
 3. जनावराला स्वतःचे वजन पेलता येत नसल्याने तोल जाऊन ते पडू शकतात.
 4. आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्यास खूर निकामी होऊन अपंगत्व येऊ शकते.
 5. अशक्त जनावरांमध्ये आजाराची त्रीव्रता जास्त असेल तर जनावरांचा मृत्यूही संभवतो.

 


तातडीच्या उपाययोजना
:-

 1. पायातील जखमा १% पोटॅशियम परमॅग्नेट किंव्हा 0.५% लिक्विड डेटॉलने धुवाव्यात किंवा दगडीपाला, टणटणी वनस्पतीचा रस जखमेवर लावावा.
 2. पायातील आळ्या चिमट्याच्या साहाय्याने काढून घ्याव्यात किंवा जखमेच्या ठिकाणी टर्पेन्टाईनचा बोळा लावावा. त्यामुळे आळ्या आपोआप बाहेर येतील.
 3. बाजारात अनेक जंतुनाशक स्प्रे आले आहेत, परंतु काही स्प्रे जखमेवरुन वगळून जातात. त्यासाठी चांगल्या प्रतीचे स्प्रे खरेदी करावेत जेणेकरून जखम लवकर बरी होण्यास मदत होईल.
 4. आजाराचे संक्रमण होण्यासाठी आद्रता अनुकूल असते, त्यामुळे गोठ्यात २५-३० C तापमान नियंत्रित राहण्यासाठी ईलेक्ट्रिक बल्बचा वापर करावा.
 5. गोठ्यामध्ये मुतारीच्या बाजूला सारखा ओलावा असतो. त्याठिकाणी निर्जतुकीसाठी चुन्याची पावडर टाकावी.
 6. जनावर एकदा तरी पोटॅशियम परमॅग्नेट किंवा कॉस्टिक सोड्याच्या द्रावणातून गेलेच पाहिजे तशी रचना करावी म्हणजे हा आजार होणारच नाही.
 7. जनावरे शक्यतो बाजारातून खरेदी करणे टाळावे.
 8. खरेदी केलेले जनावर ३ आठवडे निरीक्षणाखाली वेगळे ठेवावे. जेणेकरून आजारांपासून बचाव करता येईल.

लसीकरण केव्हा करावे :-

 1. दर सहा महिन्यांनी न चुकता लसीकरण करावे. प्हिले लसीकरण एप्रिल-मे व दुसरे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये करून घ्यावे.
 2. वासरांना प्रथम लसीकरण ४ महिने वयाची झाल्यावर करावे तसेच ४ महिन्यावरील सर्व जनावरांना लसीकरण करावे.
 3. एफ.एम.डी लस ५ मि.ली व रक्षा एफ.एम.डी ३ मि.ली मानेच्या मध्यभागी पशुवैधकाच्या सल्ल्याने घ्यावी.
 4. स्ट्रेप्टोमायसिन,पेनिसिलीन,टेऱ्यामायसिन इत्यादी तसेच बी कॉम्प्लेक्सचे इंजेकशन घ्यावे.
 5. या आजारावर प्रभावी औषध उपलब्ध नाही लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.

 

लेखक -

नितीन रा. पिसाळ, M.Sc.Agriculture (AHDS)

डेअरी प्रशिक्षक,स्किल इंडिया प्रोजेक्ट,

विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.

ई-मेल-nitinpisal2312@gmail.com

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters