1. पशुधन

व्यवसायिक शेळीपालनासाठी उपयुक्त आहे कोकण कन्याळशेळी, जाणून घेऊ या शेळी बद्दल

शेळीपालन व्यवसाय हा कमी खर्चात आणि कमी जागेत करता येण्यासारखे व्यवसाय आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून योग्य व्यवस्थापनाने आणि चांगल्या जातींची निवड केली तर चांगला नफा मिळवता येऊ शकतो. यासाठी किफायतशीर उत्पन्न मिळवून देणाऱ्या शेळ्या पाळल्याशिवाय पर्याय नाही

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kokan kanyaal goat

kokan kanyaal goat

शेळीपालन व्यवसाय हा कमी खर्चात आणि कमी जागेत करता येण्यासारखे व्यवसाय आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून योग्य व्यवस्थापनाने आणि चांगल्या जातींची निवड केली तर चांगला नफा मिळवता येऊ शकतो. यासाठी किफायतशीर उत्पन्न मिळवून देणाऱ्या शेळ्या पाळल्याशिवाय पर्याय नाही

या लेखात आपण व्यावहारिक शेळीपालनासाठी उपयुक्त अशा कोकण कन्याळ शेळी विषयी माहिती घेणार आहोत.

 शेळीपालनातील महत्त्वाची जात कोकण कन्याल शेळी

या जातीची शेळी कोकणातील समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी,दोडामार्ग,कुडाळ भागातील असून विदर्भातही काही प्रमाणात या शेळ्या दिसून येतात. ही जात प्रामुख्याने माणसासाठी उपयुक्त असून  दर दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देते. या जातीच्या शेळी चे प्रथम माजावर येण्याचे वय अकरा महिन्याचे असून वयाच्या 17 व्या महिन्यात पहिल्यांदा विते.

 दोन वेत्यामधील अंतर आठ महिन्याचे असते.आपल्या सरासरी दूध उत्पादन काळात म्हणजे 97 दिवसात60 लिटर दूध देते तर भाकड काळ84 दिवसांचा असतो. कोकण कन्या जातीच्या नराचे जर व्यवस्थित व्यवस्थापन केले तर एका वर्षात त्याचे वजन 25 किलो तर मादीचे वजन 21 किलोपर्यंत भरते. एक ते दीड वर्षाच्या बोकडाचा मटन उतारा 53 टक्के एवढा असतो.पूर्ण वाढ झालेला बोकड 50 किलो पर्यंत तर मादी 32 किलोपर्यंत असते.

 कोकण कन्याळ शेळी चे शारीरिक गुणधर्म..

  • या जातीच्या शेळी चा रंग वरच्या जबड्यावरपांढऱ्या व तांबूस रंगाचे पट्टे असतात.
  • या शेळीचे पाय लांब असतात व पायावर काळा पांढरा रंग असतो.पाय लांब व मजबूत असल्याने या शेळ्या डोंगराळ भागात सहज जुळवून घेतात.
  • या जातीच्या शेळ्यांची कपाळ हे चपटे व रुंद असते. कडा काळ्यारंगाचा असून त्यांच्या कडा पांढऱ्या व तांबूस रंगाच्या दिसून येतात.
  • या जातींच्या शेळ्यांचे शिंगे टोकदार,सरळ व मागे वळलेली असतात.
  • नाकस्वच्छ व रुंद असते.
  • कोकण कन्या कन्या शेळ्यांची कातडी मुलायम व गुळगुळीत असते.
  • या शेळ्या नियमित आणि वर्षभरमाजावर येतात.
  • या शेळ्यांमध्ये जुळ्यांचे प्रमाण 65 टक्‍क्‍यांपर्यंत असून उन्हाळ्यात विनाऱ्या शेळ्यांमध्ये जुळी करडे अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
English Summary: kokan kanyaal goatt is benificial species of goat for goat keeping Published on: 16 December 2021, 06:11 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters