दुधाळ जनावरातील कासदाह आजार व त्याची लक्षणे

24 August 2020 12:09 PM


दुधाळ जनावरांनामध्ये कासदाह हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कासदाह झाल्यानंतर जनावरांचे दूध उत्पादन क्षमता यावर परिणाम होतो.  या आजारांमध्ये विशेषता संकरित गाई कडे जास्त लक्ष द्यावे लागते.  कारण संक्रीत गाई या  रोगप्रतिकारक शक्तीच्या बाबतीत मजबूत नसतात म्हणजे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते.  म्हणून संकरित गाईनकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज भासते.  होलस्टीन फ्रिजीयन आणि जर्सी गाईंचे योग्य आहार व्यवस्थापन नसेल तर त्या गाई लवकर या आजाराला बळी पडतात.  हा आजार प्रामुख्याने जीवाणूंमुळे होतो,  या जीवाणूंच्या विविध प्रकारच्या जाती असतात. या जीवाणूंचा प्रादुर्भाव एका सडामध्ये झाला की लगेच दुसऱ्या सडामध्ये प्रादुर्भाव होतो.

  कासदाह आजाराची लक्षणे

 • या आजारामुळे जनावरांमध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी होते तसेच त्यांचे दूध देण्याची क्षमता तुलनेने कमी होते.
 • या आजारामुळे दुधाचा रंगात बदल होतो तसेच त्यामध्ये गुठळ्या दिसतात.
 • दुधामध्ये रक्त व पू येण्यास सुरुवात होते.
 • या आजारामुळे दुधाळ जनावरांची कास सुजलेली दिसते व आपण कासेला हात लावला तर ती गार लागते.
 • दूध काढताना कास दुखते व तिचा आकार एकदम लहान प्रमाणात होतो.
 • कासदाह आजारामुळे दुधाचे प्रमाण जवळजवळ पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत कमी होते.
 • कासदाह आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला तर कासेला कडकपणा येतो व तिचा मुलायमपणा कमी होतो.

 


घ्यावयाची काळजी

 • सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोठा स्वच्छ ठेवावा गोटात ओलसरपणा कमी असावा कारण ओलसरपणामुळे जीवाणूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे गोठा शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात कोरड्या ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 • गोठ्याची रचना करताना ते अशी करावी की सूर्यकिरण गोठ्यामध्ये आतापर्यंत येतील. गोठ्यात नेहमी हवा खेळती असावी लागते.
 • शक्यतो दूध काढणीच्या वेळेस कासेला पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ करावे.
 • दूध काढणाऱ्या माणसाने त्याच्या हात स्वच्छ साबणाने धुवावेत.
 • दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर कास आणि सड स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत.
 • दूध काढणी यंत्र दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर स्वच्छ करून घ्यावे.
 • दूध काढल्यानंतर गाय किंवा म्हशीला लगेच खाली बसू देऊ नये. त्यांना हिरवा चारा खाण्यास द्यावा.
 • जर वासरू दूध पीत असेल तर कासेला किंवा सडाला जखम नाही ना याची काळजी घ्या.
 • गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर लगेच चिक काढून घ्यावा.
 • दुधाळ गाईच्या धारा काढण्याचे रोजचे वेळापत्रक तंतोतंत पाळावे.
 • काशीमध्ये किंवा सडामध्ये दूध शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी.
 • कासदाह झालेल्या जनावरांचे दूध शेवटी काढावे.

स्त्रोत- ॲग्रोवन

Kasdah animal disases symptoms disease symptoms animals दुधाळ जनावरे जनावरातील कासदाह कासदाह आजार कासदाहाचे लक्षणे
English Summary: Kasdah disease and symptoms in animals 24 august

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.