1. पशुधन

कडकनाथ कोंबडी पासुन होईल बक्कळ कमाई मोठया प्रमाणात वाढतेय मागणी

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kadaknaath hen

kadaknaath hen

कडकनाथ कोंबडी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड समवेत देशातील बर्‍याच राज्यात पाळली जात आहे.  पिलांच्या संगोपनासाठी मागणी इतकी जास्त आहे की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) वेळेवर पिल्ले देण्यास असमर्थ आहेत.

 

कडकनाथ कोंबडा हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा अभिमान आहे.  मांस, हाडे आणि कडकनाथ कोंबडीचे रक्तही काळे असते. याच कारणास्तव लोक कडकनाथला काळा कोंबडा म्हणूनही संबोधतात.  आदिवासी भागात कडकनाथ कोंबड्याला कालीमासी म्हणून ओळखतात. औषधी व पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने कडकनाथची मागणी सतत वाढत आहे .आता त्याचे पालन मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सोबतच देशातील बर्‍याच राज्यांत होत आहे.  पिलांच्या संगोपनासाठी मागणी इतकी जास्त आहे की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) वेळेवर पिल्ले देण्यास असमर्थ आहेत.  ते सेवन केल्याने शरीराला भरपूर पोषकद्रव्ये मिळतात. यात चरबी किंवा फॅट फारच कमी असते, तर प्रथिनेंचे प्रमाण जास्त असते.

कडकनाथ कोंबड्यांचे वैशिष्ट्ये

 • कडकनाथ त्याच्या अनुकूलतेसाठी आणि राखाडी-काळे मांस यासाठी प्रसिद्ध आहे,कडकनाथचा रंग मेलेनिनमुळे काळा होतो. कडकनाथ जातीची उत्पत्ती मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील काठीवार अलिराजपूर जंगलातून झाली आहे.
 • एक दिवसाच्या पिलांचा रंग निळसर ते काळा असतो आणि पाठीवर अनियमित गडद पट्टे असतात.
 • या जातीचे मांस काळे असले आणि पाहायला अयोग्य वाटले तरी ते चविष्ट त्याचबरोबर औषधी असल्याचे मानले जाते.
 • आदिवासी लोक कडकनाथचे रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांसाठी वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.
 • मांस आणि अंडी प्रथिने (मांसामध्ये 25.47 टक्के) आणि लोह यांनी समृद्ध असल्याचे मानले जाते.
 • कडकनाथ कोंबड्यांचे 20 आठवड्यांनी शरीराचं वजन 920 ग्रॅमपर्यंत असते.
 • कडकनाथ कोंबडी 180 दिवसात लैंगिकदृष्ट्या पक्व होतात.
 • कडकनाथ कोंबडीचे वार्षिक अंडीचे उत्पादन 105 nos पर्यंत येऊ शकते.
 • 40 आठवड्यांनी अंड्याचे वजन 49 ग्रॅमपर्यंत बनते.
 • कडकनाथ कोंबड्यामध्ये गर्भधारणक्षमता 55% असते.
 • कडकनाथ कोंबड्याची उबवणक्षमता FES 52% असते.
 • कोंबड्यांचे वजन 1.8-2 किलोपर्यंत (4.0–4.4 पौंड) असते.आणि कोंबडीचे वजन 1.2-1.5 किलो (2.6–3.3 पौंड) पर्यंत असते.कडकनाथ कोंबड्यांची अंडी तपकिरी व किंचित गुलाबी रंगाचे असतात.कडकनाथचे अंड्याचे सरासरी वजन 30 ते 35 ग्रॅम (1.1-1.2 औंस) असू शकते.

कडकनाथांचा कोंबड्यांचा वाढता व्यवसाय

 कडकनाथ कोंबडीमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळतात.  कडकनाथ कोंबडीची मागणी केवळ देशातच नाही तर परदेशातही वाढत आहे.  आखाती देशांतही याला खूप पसंती दिली जात आहे.  कमाईचे एक चांगले साधन असल्याने कडकनाथचा व्यवसाय वाढत आहे. कडकनाथ कोंबडीच्या संगोपनाला चालना देण्यासाठीही सरकार प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी सरकारकडूनही मदत देण्यात येत आहे.  जर आपल्याला कडकनाथ कोंबडीपालन करायची असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्रातून पिल्ले घेऊ शकता.

 

काही शेतकरी 15 दिवसांची पिल्ले घेतात तर काही लोक एक दिवसाची पिल्ले घेतात. कडकनाथ कोंबडी साडेतीन ते चार महिन्यांत विक्रीसाठी तयार होते.

90 च्या दशकात, कडकनाथ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती.  नंतर, शास्त्रज्ञांच्या मदतीने या प्रजातीला नवीन जीवन प्राप्त झाले.  परिस्थिती अशी आहे की कडकनाथच्या पिलांची मागणी वेळेत पूर्ण होत नाही. त्याची लोकप्रियता देशभरात वाढली आहे आणि सर्व ठिकाणाहून कडकनाथच्या संगोपनासाठी पिल्लांची मागणी वाढत आहे.

English Summary: kadaknaath komnbdi is important for poultry farming Published on: 13 September 2021, 11:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters