1. पशुधन

पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! जनावरांच्या चाऱ्यासाठी लागवड करा ओटसची, जाणून घ्या याविषयी

ओटसची शेती ही साधारणतः रब्बी हंगामात केली जाते. हे एक प्रमुख तृनधान्य पीक आहे, हे पीक युरोप खंडातील आहे. याचा चारा हा पशुसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आम्ही आपणांस सांगू इच्छितो कि, याच्या मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ओट्स मध्ये मानवी शरीरासाठी उपयुक्त फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात. फायबर आणि प्रोटीन मुख्यता वजन कमी करण्यास मदत करतात, ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतात, तसेच रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी देखील आवश्यक असतात. ओट्स हे ज्या प्रकारे मानवी आरोग्यासाठी उपयोगी आहे त्याप्रमाणे ते पशुच्या आहारासाठी देखील फायदेशीर आहे ओट्सच्या या गुणांमुळे यांची शेती एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया ओट्सच्या शेतीविषयी.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
oat farming

ओट्स लागवड कशी करणार-ओट्स लागवडीसाठी उपयुक्त हवामान- ओट्स लागवडीसाठी थंडे आणि कोरडे हवामान उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. याच्या लागवडीसाठी 15 ते 25 सेंटीग्रेड तापमान उत्तम असल्याचे कृषी वैज्ञानिक सांगतात. याची पेरणी ही वीस ते पंचवीस तापमानाच्या दरम्यान करण्यात यावी. तसेच त्याचे काढणीच्या वेळी 30 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान चांगले असते 

ओट्स लागवडीसाठी आवश्यक जमीन-ओट्सचे उत्पादन सर्व प्रकारच्या जमिनीत  घेतले जाऊ शकते. परंतु याची लागवड ही सुपीक असलेला चिकन मातीत यशस्वी असल्याचे सांगितले जाते. जमिनीचा पीएच अर्थात सामू हा 5.5 ते 6 च्या दरम्यान असायला पाहिजे.

शेतीची तयारी/ पूर्वमशागत

ओट्स पिकातून चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतीची पूर्व मशागत करणे महत्त्वाचे ठरते. जर शेतीची पूर्वमशागत व्यवस्थितरित्या झाली तर, ओट्स पिकाचे अंकुरण हे चांगले होते, परिणामी यातून चांगले उत्पादन मिळते. पूर्व मशागतीसाठी देसी नांगरणे शेत चांगले नांगरून घ्यावे, किंवा ट्रॅक्टरने जमीन चांगली नांगरून घ्यावी. नंतर फळी मारून शेत समतल करून घ्यावे. पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात योग्य ती व्यवस्था करावी.

ओट्स लागवडीचा योग्य कालावधी

ओट्सची लागवड डिसेंबर महिन्यात करण्यात यावी. डिसेंबर महिन्यात याची लागवड केल्यास उत्पादन अधिक मिळते. बेल्यामधील अंतर हे 25 ते 30 सेंटिमीटर असावे. पशु साठी ओट्स एक चांगला चारा समजला जातो, म्हणून चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार याची लागवड डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.

English Summary: it is important for animal grower farmers this fodder crop nis good for animals Published on: 17 December 2021, 11:54 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters