सध्या पशुधनावर एक अनिष्ट संकट कोसळले असून संपूर्ण देशामध्ये लंम्पिस्किन डिसीज या रोगाने हाहाकार माजवला आहे. या संसर्गजन्य असलेल्या आजाराने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्य आपल्या कवेत घेतले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, संपूर्ण देशामध्ये या रोगाने 49 हजार पेक्षा जास्त गायीचा बळी घेतला आहे तर महाराष्ट्रात 11 गाई या आजाराने दगावल्या आहेत.
त्यामुळे पशुसंवर्धन विभागापुढे एक आव्हान उभे ठाकले आहे.'गाईंचे लसीकरण वाढवा,गाई वाचवा' नावाचे मिशन वैद्यकीय यंत्रणेने हाती घेतले असून हा रोग लवकर आटोक्यात नाही आला तर देशावर दुधाचे संकट वाढण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:पशुधनामधील वळूच्या खच्चीकरणाचे (कॅस्ट्रेशन) महत्व
काय आहे महाराष्ट्रातील परिस्थिती?
जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मधील पुणे,जळगाव,अहमदनगर आणि अकोला या चार जिल्ह्यांमध्ये लंम्पि आजाराचा प्रादुर्भाव असून या चार जिल्ह्यात आतापर्यंत 36 हजार गाईंना लसीकरण करण्यात आली आहे. ही लसीकरणाची मोहीम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण नऊ राज्यांमध्ये हाती घेण्यात आली असून राजस्थान, पंजाब आणि हरियाणा सारख्या इतर राज्यांमध्ये देखील लसीकरण सुरू आहे.
नक्की वाचा:सावधान! महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये लंपी रोगाचा फैलाव, 11 लाखांहून अधिक जनावरे बाधित
या आजाराची पार्श्वभूमी
या आजाराने 2019 मध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली होती. जर आपण भारताचा विचार केला तर पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये या आजाराच्या काही गाई आढळल्या होत्या. परंतु कोरोनाने याच कालावधीत थैमान घातल्यामुळे हा आजार तेवढा नजरेत आला नाही. परंतु मागच्या उन्हाळ्यापासून पुन्हा या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली असून काही दिवसातच पश्चिम आणि उत्तर भारतातील आणि महाराष्ट्रापासून राज्यापर्यंत अनेक राज्यांमध्ये हा आजार पसरला.
या आजाराने प्रादुर्भाव झालेल्या गाईंचे वजन घटायला लागते आणि दूध देण्याचे प्रमाण देखील कमी होते. तसेच या आजाराने प्रादुर्भाव झालेल्या गाई गर्भधारणा करू शकत नसल्यामुळे व गर्भपाताच्या प्रमाणात देखील वाढ होते.जनावराला ताप येणे,भूक मंदावणे तसेच लाळेचे प्रमाण वाढणे, नाकातून स्राव येण्याचे प्रमाण देखील वाढते व वागणे देखील विचित्र पद्धतीने बदलते. गाईच्या त्वचेला मोठा फोड यावा असे गळू दिसू लागतात.
नक्की वाचा:दूध उत्पादनासाठी म्हशींच्या 'या' 4 जातीं ठरत आहेत फायदेशीर
Share your comments