कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर तसेच कोंबड्यांना शुद्ध हवेची कमतरता, समतोल आहाराची कमतरता इत्यादीमुळे कोंबड्यांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
या रोगांवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मरतूक होऊन नुकसान सोसावे लागते. या लेखात आपण कोंबड्या वरील काही प्रमुख आजारांची माहिती व लक्षणे तसेच करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय योजना जाणून घेऊ.
- कोंबड्यान वरील विविध आजार :
1) रानिखेत :- राणीखेत हा कोंबड्यांवर प्रमुख आजार आहे. राणीखेत रोगाचा प्रभाव कोंबड्यांवर झाला तर मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची मर होऊ शकते. जवळजवळ 100 टक्के कोंबड्या मरतात.
नक्की वाचा:खरं काय! कमी पैशात सुरु करता येतो 'हा' व्यवसाय आणि कमाई होते छप्पडफाड…..
2) राणीखेत ची लक्षणे :
लहान कोंबड्यांमध्ये घरघर लागते, कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे, वेड्यावाकड्या हालचाली इत्यादी लक्षणे दिसतात. तसेच मोठ्या कोंबड्यांमध्ये अवघड श्वासोश्वास, भूक मंदावते, ताप येतो, पांढरी पातळ हगवण, मान वाकडी होते, अंडी उत्पादनात घट तसेच पातळ कवचाचे व निकृष्ट दर्जाचे अंडी इत्यादी लक्षणे दिसतात.
3) रानिखेत आजारावर उपचार:
या आजारावर उपचार नाहीत. परंतु हा रोग होऊ नये यासाठी पिल्ले पाच ते सहा दिवसाचे असताना लासोटा हीलस नाकात किंवा डोळ्यात एक थेंब या प्रमाणात द्यावी. तसेच आठवी आठवड्यात व अठराव्या आठवड्यात आजार 2 बो (0.5मिलि) कातडीखाली द्यावी.
4) रक्ती हगवण:- हा रोग कॉक्सिडीया या रक्तातील पर जीवा पासून होतो. विष्ठेमध्ये रक्त दिसते. विस्टा लालसर पातळ असते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्यांचा तुरा कोमजतो, कोंबड्या पेंगतात, खाणे कमी होते, अंडी उत्पादन हे कमी होते, अशक्तपणा आढळतो तसेच कोंबड्यांची मर ही मोठ्या प्रमाणात आढळते. हा रोग पूर्णपणे नियंत्रित करता येतो.
5) देवी :- हा रोग विषाणू पासून होतो. या रोगाची लागण झाल्यास कोंबड्यांचा तुरा व डोळे मलूल होतात. पायावर पिसे नसलेल्या भागावर पिवळे फोड येतात. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी फोडावर खपली धरते व ती पडते. या खपलीतून विषाणूंचा प्रसार होतो. या रोगाची लागण झाल्यावर भूक मंदावते, नाकातून द्रवपदार्थ वाहतो, तोंडात चिकट पदार्थ तयार होतो. त्यामुळे कोंबड्यांना खाद्य खाता येत नाही व कोंबड्या भुकेने मरतात.
या रोगाची लागण होऊ नये म्हणून सहाव्या व 16 व्या आठवड्यात देवी रोग प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. रोग झाल्यास फोड आलेली जागा पोटॅशियम परमॅग्नेट चे द्रावणाने धुऊन घ्यावी.
नक्की वाचा:हरभऱ्याचे बाजारभाव गडगडले! शेतकऱ्यांचा मोर्चा आता हमीभाव खरेदी केंद्राकडे
6) मरेक्स :- हा रोग ही विषाणूमुळे होतो. कोंबड्यांचे पाय लुळे पडतात. खाद्य खाऊ न शकल्याने कोंबडी मरतात.हा रोग बहुतांशी लहान पिल्लांना होतो.
त्यामुळे सात ते दहा आठवडे वयोगटातील पिल्ले मरतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग पाचव्या ते सहाव्या महिन्यात आढळून येतो. या रोगामुळे कोंबड्यांचे पाय, पंख, मान लुळी पडते,वजन,श्वास घेण्यास त्रास होतो, विष्ठा पातळ पडते, व पिसांच्या मुळाशी सूज दिसून येते. या रोगावर उपाय नाही. प्रतिबंधक उपाय म्हणून पिल्ले एक दिवसाची असताना मरेक्स ही लस द्यावी.
7) गंबोरो :- हा रोग विषाणूमुळे होतो. कोंबड्या पेंगतात, अडखळत चालतात,पांढरी हगवण होते. वग गुद्दार जवळची पिसे विष्टेमुळे घाण होतात.
Share your comments