पशुपालनामध्ये वासरांचे संगोपन आणि त्यांची विशेष काळजी याला फार महत्त्व आहे. वासरांचे संगोपन हे गाय माजावर येऊन लागवड होते, तेव्हा पासून चालू होत. गर्भधारणा झाल्यानंतर संतुलित आहार, शुद्ध व स्वच्छ पाणी, अभिषेक निवारा आवश्यक लसीकरण या बाबीकडे लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते.
कारण यामध्ये महत्वाचे गमक असे कि, यावरच पुढील पिढी हे अवलंबून असते. वासराची काळजी व त्यांचे व्यवस्थापन व संगोपन कसे करावे याविषयी या लेखात माहिती देऊ. यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा.
-
वासरांचा जन्म होत असताना घ्यावयाची काळजी- वासरू हे योनी बाहेर आल्यानंतर त्यास हलकेसे आधार देऊन ओढावे व पोते किंवा कोणी वर ठेवावे. त्याच्या नाकातोंडात मधील चिकट पदार्थ काढून टाकावा व त्याच बैठे स्थितीमध्ये गाई समोर ठेवावे. गाय नव्याने जन्मलेल्या वासराला चाटू स्वच्छ व कोरडे करत असते. त्यामुळे वासराच्या अंगावरील चिकट पदार्थ निघून जातो व त्वचा कोरडी होते तसेच वासराचे रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. जर कुठे अंगावर चिकट पदार्थ शिल्लक राहिला तर त्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. त्याची नाळ ही शरीरापासून तीन ते पाच सेंटीमीटर वर बांधावी. लिके च खाल्ली साधारण एक ते दीड सेंटीमीटर अंतरावर नाळ कापून त्याठिकाणी टिंचर आयोडीन, जंतुनाशक द्रावण लावावे व वासराचे प्रथम वजन नोंदवावे.
नवजात वासरांना चिक/ दूध पाजणे-
-
वासरू जन्मल्यानंतर पहिल्या एक ते दोन तासात त्याला चीक युक्त दूध पाजणे आवश्यक असते. त्यासाठी प्रथम वासराच्या तोंडात बोट घालून जिभेची हालचाल करावी. जिभेची हालचाल जाणवल्यानंतर वासराच्या तोंडात गाईचे सड ठेवावे. तसेच वासरास दूध पिण्याची माहिती नसते तेव्हा सडा मधूनदोन ते तीन स्ट्रीप खाली जमिनीवर टाकून घ्याव्यातव नंतर सर्व वासराच्या तोंडात द्यावे व चीक पिळावा. वासरू चाटू लागल्यास त्यास चिक युक्त दूध पिण्यास मदत करावी. गाय व्याल्यानंतर पहिले चिकयुक्त दूध निघते. यामध्ये भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते. त्यामध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे व क्षार असतात. चिक युक्त दूध पाजले यामुळे वासराची पचनक्रिया कार्यरत होते,पचलेल्या अन्नघटकांचे शोषण होते व न पचलेले अन्न व अनावश्यक घटक बाहेर फेकली जातात. वासरांचे दूध पिणे, पचन होणे, मूत्रविसर्जन व विष्टा बाहेर टाकण्याच्या कडे प्रामुख्याने लक्ष ठेवावे लागते. जन्मल्यापासून पहिल्या आठ दिवस हे चिक युक्त दूध वासरास पाजावे. तसेच चीक युक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये कारण त्यामुळे कधीकधी अतिसार होण्याचा धोका संभवतो या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती असते. त्यामुळे वासरांना जंतुसंसर्ग होत नाही व शरीराचे योग्य प्रकारे पोषण होण्यास मदत होते.
वासरांचे खाद्य-
-
वासरे हे साधारणतः तीन महिन्यानंतर खाद्य खाऊ लागतात. परंतु या वयामध्ये वासरांना पूरक आहाराची गरज असते आपण जे परंपरागत पद्धतीने गवत व कडबा देतो त्यामुळे वासरांना पुरेसे अन्न घटक त्यातून प्राप्त होत नाहीत. त्यासाठी हळूहळू संतुलित आहार किंवा काफ स्टार्टरचा खाद्यामध्ये समावेश करा. जेणेकरून वासरांना शरीराच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्य मिळतील. मका, ओट्स, ज्वारी, बाजरी यासारखे धान्य भरडून त्यामध्ये 10% मोलॅसिस टाकूनखाद्य देता येते. काफ स्टार्टर मध्ये 22 टक्के सी पी व 80 टक्के टीडीएन असते. साधारणतः आठ ते दहा आठवड्यानंतर वासरांना दूध देणे कमी करून का स्टार्टर व सुकलेला किंवा कोरडा चाऱ्यावर वाढवली जाऊ शकते.
हेही वाचा : तुमच्याकडे जनावरे आहेत का? मग उन्हाळ्यात घ्या विशेष काळजी
नवजात वासरांची वाढ-
-
जन्म झाल्यानंतर वासराचे वजन 20 ते 25 किलो ग्रॅम पर्यंत असते. पहिल्या दिवसापासून दरमहा वासराचे वजनाची नोंद ठेवावी. वासराची वाढ योग्य पद्धतीने होते किंवा कसे याकडे बारकाईने लक्ष ठेवावे. दूध पाजणे हळूहळू बंद केल्यानंतर वासरांना काफ स्टार्टर व चारा द्यावा. हा कालावधी वासरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो कारण पहिल्या तीन-चार महिन्यांत वासरांना पुरेसे दूध व संतुलित आहार न मिळाल्यास ते कुपोषित होतात व इतर संसर्गजन्य रोगाला बळी पडतात.
जंतनाशके व लसीकरण-
-
तीन महिन्यानंतर वासरांना जंतनाशके द्यावी. त्यानंतर लाळ खुरकत लस तसेच फऱ्या, घटसर्प ऋतुमानाप्रमाणे निमित्ताने करावे. औषध उपचार व प्रतिबंधात्मक लसीकरण हे नियमितपणे नोंदणीकृत व तज्ञ पशुवैद्यकाकडून च करावे.
गोठ्याचे बांधकाम-
-
गोठ्याचे बांधकाम करताना ते पूर्व-पश्चिम असावी म्हणजे सकाळचे कोवळे ऊन मिळू शकेल. गाय व वासरासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. व्यालेल्या अनेक गाई वासरे एकत्रित ठेवल्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची दाट शक्यता असते. गोठ्यामध्ये पुरेसे वायुवीजन असावे. उन, पाऊस व थंडी यापासून संरक्षण द्यावे.
निकोप वाढीसाठी वासरे निरोगी ठेवणे-
-
वासरांना जन्मल्यापासून पहिले तीन महिने पुरेसे दूध व संतुलित आहार द्यावा कारण याकाळात वासरांची जोमाने वाढ होत असते. जंतनाशक औषधे व विविध रोगांची लसीकरण शेडूल प्रमाणे करावे. योग्य प्रमाणात हिरवा चारा, वाळलेला चारा व पूरक आहार द्यावा. यामुळे वासरांना आजार होणार नाहीत व त्यांची निकोप वाढ होऊन ते उत्पादनक्षम होऊ शकतात. कारण आजची वासरे पुढील उत्पादन देणाऱ्या गाई बैल होऊ शकतात. उत्पादनक्षम सुदृढ गाई व बैल हे देशाच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावू शकतात. तसेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करू शकतात. म्हणून वासरांचे संगोपन शास्त्रीय दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे.
Share your comments