संकरित गाईच्या दुधाची क्षमता जास्त प्रमाणात असते, जास्त दूध देणाऱ्या गाईचा मागचा भाग मोठा असतो तसेच त्या गाईचे चारही सड सेम आकाराचे असतात त्यांचे सड लांब आकाराचे असतात. आपल्याला कासेच्या शिरा मोठ्या व लांब दिसतात.
गोठा नियोजन -
गोठा हा नेहमी उंचावर असावा म्हणजे त्यामध्ये उजेड येईल तसेच गोठ्यामध्ये खेळती हवा राहील. तसेच छप्पर ची उंची १५ फिट असावी, जनावरांच्या मागच्या बाजूस गोठा उतरता असावा व त्यामध्ये जनावरांना मूत्रवाहक नळी सुद्धा करावी. प्रत्येक जनावरांसाठी मोकळी जागा असावी तसेच जर गोठा धुतला तर त्यांचे पाणी शेतीला जावे असे व्यवस्थापन करावे.
दूध काढताना घ्यावयाची काळजी -
दूध काढण्याआधी गोठा स्वच धुवावा त्यानंतर त्याची शेपटी व कास स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे स्वच्छ फडके घेऊन ती कास कोरडी करावी. दूध काढणाऱ्या माणसाने आपले हात स्वच्छ धुवावे तसेच त्याची नखे काढली असावी. दूध टाइम ते टाईम काढावे. दूध ज्या भांड्यामध्ये काढायचे आहे ती भांडे स्वच्छ असावीत.
हेही वाचा:जाणून घ्या जनावरांमध्ये असलेला मुतखडा व त्यावरील उपाय
दुभत्या गाईचे संगोपन -
दुभत्या गाईला रोज कमीत कमी १५ ते २० किलो हिरवा चारा व ५ ते ८ किलो कोरडा चारा द्यावा तसेच शरीराचे पोषण व्हावे म्हणून दीड ते दोन किलो खुराक सुद्धा द्यावा. तुम्ही गाईला सारखे बांधून न ठेवता रोज २ ते ३ तास फिरायला मोकळे सोडा म्हणजे गाईचा व्यायाम होईल.
माजावर आलेल्या गाईचे व्यवस्थापन -
गाई २१ दिवसाच्या अंतरावर माजावर येते, माजाची लक्षणे दिसल्यापासून १० ये १८ तासानंतर माज दाखवत नाही किंवा काही गाई अशा आहेत ज्या दोन ते तीन महिन्यानंतर माजावर येतात त्यांची तपासणी तुम्ही करून घ्यावी.
खाद्य व्यवस्थापन -
ज्या ठिकाणी हिरवा चारा आहे त्या ठिकाणी गाभण गाईला फिरायला सोडावे म्हणजे त्यांच्या ते फायद्याचे ठरते जे की त्यांना ताजी वैरण भेटते तसेच त्यांचा व्यायामही होतो व मुबलक प्रमाणात मोकळी हवा व सूर्यप्रकाश भेटतो. जर तुमच्या तिथे हिरवा चारा नसेल तर कुठून तरी नियोजन करून गोठ्यामध्ये च हिरवा चारा आणून त्यांना खायला घालावा. गाभण गाईच्या शेवटच्या दोन महिन्यात गर्भाची वाढ वेगाने होते त्यामुळे चाऱ्यामध्ये वाढ करावी तसेच त्यांच्या शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो पशुखाद्य द्यावे. जर तुम्ही खाद्य चांगल्या प्रकारे दिले तर गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते.
अश्या प्रकारे लहान वासराचे व्यवस्थापन करावे आणि ही काळजी घ्यावी:
जेव्हा वासरू जन्माला येते त्यावेळी त्याच्या नाका तोंडाची चिकट द्रव्य दूर केला पाहिजे, तसे पाहायला गेले तर गाई आपल्या वासराला चाटून पूर्णपणे साफ करते त्यामुळे त्याची कातडी कोरडी पडते व त्याचे श्वास व रक्ताभिसरण व्यवस्थित होते.जर गाईने वासराला चाटले नाही तर आपण स्वच्छ कापड घेऊन वासराला स्वच्छ करावे व त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. वासराच्या शरीरापासून दोन ते पाच सेमी अंतरावर नाळ बांधा तसेच लिगॅचरच्या खाली १ सेमी वर तोडा. त्या ठिकाणी अँटिबायोटिक चे औषध लावा. नंतर गोठ्यातील सर्व ओली कपडे काढून टाकावी तसेच ती स्वच्छ आणि कोरडा गोठा करा.
Share your comments