1. पशुधन

शेळ्यांच्या नवजात करडांची अशी करा देखभाल

करडांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी दुधाव्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्यक आहे. करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या पचन इंद्रियांची व पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होते.

KJ Staff
KJ Staff


करडांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी दुधाव्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्यक आहे. करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या पचन इंद्रियांची व पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होते.

शेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेळ्या व करडांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. उत्तम आनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. गाभण शेळ्यांची तसेच करडांची योग्य पद्धतीने जोपासना करावी. करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी ठेवावी. करडांना भरपूर मोकळी आणि हवेशीर जागा मिळाली पाहिजे.

शेळी व्यायल्यानंतर ती नवजात करडास स्वतः चाटून स्वच्छ करते. त्यामुळे करडे स्वच्छ होण्याबरोबरच रक्ताभिसरण वाढत असते. शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास करडांचे अंग स्वच्छ जाड्याभरड्या कापडाने स्वच्छ करावे. करडाच्या नाका-तोंडातील चिकट स्राव काढावा जेणेकरून करडांना श्वास घेणे सोपे होईल.

व्याल्यानंतर करडांची नाळ एक ते दीड इंच लांब अंतरावर स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने किवा ब्लेडने कापावी. नाळ कापलेल्या ठिकाणी 'टिंक्चर आयोडीनचा' बोळा ठेवावा म्हणजे नाळेच्या जखमेद्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होत नाही. हळदपुडीचाही वापर यासाठी केला तरी चालतो. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल. जन्मल्यानंतर करडाचे वजन करावे.

करडांना चीक पाजणे

  • करडे जन्मल्यापासून सुरवातीचे तीन-चार दिवस जे दुध असते त्यास चीक असे म्हणतात. जन्मजात करडाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. सुरवातीस काही काळ ती विकसित झालेली नसते. म्हणून निसर्गाने त्यांना रोगप्रतिबंधक शक्ती मिळावी यासाठी मातेमार्फत ती व्यवस्था करून ठेवली आहे.
  • चिकामध्ये 'ग्यामा ग्लोबुलीन्स' म्हणजे रक्षक प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जी करडांना अनेक संसर्गजन्य रोगांपासून वाचवतात. तसेच चिकामध्ये दुधापेक्षा १५ पट जास्त जीवनसत्व 'अ' चे प्रमाण असून तीन ते पाच पट जास्त प्रथिने असतात. याशिवाय त्यात लोह, तांबे, मंगेनीज आणि मग्नेशियम ही खानिजेसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. चिकात सारक गुण असल्याने करडाच्या आतड्यात साठलेल्या मलाचे निस्सारण होण्यास मदत होते.
  • करडे जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आत त्यांना चीक पाजणे आवश्यक असते. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या १० टक्के इतका चीक पाजावा. वार पडण्याची वाट न बघता योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडे तयार होतात.
  • करडांना चीक देत असताना तो एकाच वेळी न देता दिवसातून तीन ते चार वेळेस विभागून द्यावा.

दुध पाजणे

सुरवातीस एक महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या १० टक्के या प्रमाणात दुध पाजावे. त्यानंतर एक ते दोन महिने या काळात १० ते १५ टक्क्यांपर्यंत दुध पाजावे.

इतर नियोजन

  • वयाच्या २ ते २.५ महिन्यात चे दुध हळूहळू कमी करीत पूर्ण बंद करावे आणि करडांना फक्त चारा आणि खाद्यावर वाढवावे. करडांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी दुधाव्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्यक आहे. करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या पचन इंद्रियांची व पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होते.
  • जशीजशी करडे मोठी होतात तसतशी त्यांच्या ओल्या व वाळलेल्या चारयामध्ये वाढ करावी. यामध्ये प्रामुख्याने हिरवा मका, लसून घास, बरसीम, कडवळ, शेवरी, चवळी इत्यादी चारा तसेच बोर, अंजन, चिंच, सुबाभूळ, वड, पिंपळ इत्यादीचा पाला द्यावा. वाळलेल्या वैरणीमध्ये ज्वारीचा कडबा, भुईमूग पाला, हरभरा, तुरीचे काड, भुसा द्यावा.
  • वाढत्या वयातील करडांना चाऱ्याबरोबरच ५० ते १०० ग्रॅम खुराक द्यावा. जेणेकरून त्यांची वाढ झपाट्याने होईल.
  • साधारणपणे २ ते ३ किलो ओली आणि अर्धा ते १ किलो वाळलेली वैरण करडांना द्यावी. तसेच खुराकाचे प्रमाण २५० ते ३०० ग्रॅम पर्यंत वाढवावे. खुराकामध्ये मका, ज्वारी, भुईमुग पेंड, गहू कोंडा, खनिज मिश्रण, मीठ व जीवनसत्वे इत्यादींचा समावेश असावा.
  • करडांना स्वच्छ, मुबलक पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
  • बोकडांचे खच्चीकरण साधारणपणे १ ते २ महिन्यांत करावे.
  • करडांना होणाऱ्या बाह्य परोपजीवीच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी ‘ब्यूटोक्सचे’ द्रावण गोठ्यात फवारावे.
लेखक:
डॉ. सागर जाधव
M.V.Sc (पशु पोषणशास्त्र)
9004361784
डॉ. संजय मल्हारी भालेराव

English Summary: how to care taken of newborn goat Published on: 02 April 2020, 09:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters