आपल्या सर्वांना कुक्कुटपालन माहिती, पोल्ट्री माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे गिनी फाऊलचे पालन माहिती आहे. कोंबड्याप्रमाणेच गिनी फाऊल हे मांस आणि अंड्यासाठी उपयोगी आहे. देशातील बऱ्याच भागात गिनी फाऊल पालन केले जाते. विशेष म्हणजे यासाठी खर्च फार कमी लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन कमी आहे, त्यांच्यासाठी गिनी फाऊल हे खूप फायदेशीर आहे. यामुळे याला लो इन्वेस्टमेंट बर्ड म्हटले जाते. यासाठी कोणताच खर्च येत नाही किंवा औषधांवर इतर अतिरिक्त खर्च होत नाही.
गिनी फाऊलच्या निवारासाठी मोठं शेड बनविण्याची गरज नसते. इतकेच काय या पक्ष्यांवर कोणत्या हवामानाचा परिमाण होत नाही. निवारा नसला तरी या पक्ष्यांवर काही परिमाण होत नाही. पोल्ट्रीचा व्यवसाय करताना आपल्याला पक्ष्यांच्या खाद्यावरती खूप खर्च करावा लागतो. पण गिनी फाऊलसाठी फक्त ६० ते ७० टक्के खर्च येत असतो. दरम्यान कोंबड्याच्या औषधांसाठी आणि लसीकरणासाठी खूप खर्च येत असतो. पण गिनी फाऊलसाठी कोणत्याच प्रकारची लस द्यावी लागत नाही किंवा औषधाची गरज राहत नाही. यामुळे ग्रामीण भागात याचे पानल केले करणे परवडते, याविषयीची माहिती बरेलीतील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेच्या , मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सिम्मी तोमर यांनी दिली आहे.
काय आहेत गिनी फाऊलचे वैशिष्ट्ये -
गिनी फाऊलचे अंडे कोंबड्यांच्या अंड्यापेक्षा कठिण असतात. लवकर फुटत नाहीत. दरम्यान हे अंडे टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे. कोंबडीचे अंडे हे फ्रिजमध्ये न ठेवता सात दिवसात खराब होतात. पण गिनीचे अंडे १५ ते २० दिवसापर्यंत टिकून राहतात. बिहारमधील अनेक शेतकरी गिनी फाऊलचे पालन करत अधिक नफा कमावत आहेत. दरम्यान या पक्ष्यांची लोकांना अधिक माहिती नसल्याने याचा व्यवसाय कमी आहे. परंतु मोठ्या शहरात मात्र याची मागणी अधिक आहे. हे पक्षी आफ्रिकामधील गिनिया द्वीपवर आढळतात. यावरुन या पक्ष्यांचे नाव गिनी पडले आहे.
पण या पक्ष्यांचे शास्त्रीय नाव हे हेल्मेटेड गिनी फाऊल असते. जर कोणी शेतकरी व्यवसायिक पद्धतीने याची सुरुवात करत असेल तर ५० किंवा १० पक्षी पुरेसे असतात. याची किंमत ही १७ ते १८ रुपये असते. आपण जर या पक्ष्यांसाठी सेड केले तर त्याचा अतिरिक्त खर्च होत असतो. पण हे पक्षी बाहेर चरु शकतात यामुळे खाद्याचा पैसा वाचतो. गिनी फाऊल हे मांस आणि अंड्यासाठी पाळले जातात. या पक्ष्यांचे वजन १२ आठवड्यात दीड किलो होत असते. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान यांचे प्रोडक्शन होत असते. या काळात हे पक्षी ९० ते १०० अंडे देत असतात.
दरम्यान हे पक्षी दिवस मोठा असेल आणि रात्री तापमान अधिक असेल तेव्हाच हे पक्षी अंडे देत असतात. परंतु केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थेने एक नवा शोध केला आहे, यात असे सिद्ध झाले आहे की, हिवाळ्यातही हे पक्षी अंडे देतात. जर आपल्याला गिनी फाऊलचे पालन करायचे असेल तर बरेली येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेला संपर्क करावा लागेल.
Share your comments