शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिक रित्या दुग्ध व्यवसाय आपण करत आलेलो आहोत. दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. परंतु यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो? हा एक मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण अजून बरेच मागे आहोत. या लेखात आपण दुग्ध व्यवसायातील चार सूत्रांचा विचार करणार आहोत. याचा परिणाम दुग्ध व्यवसाय होतो. कोणत्या त्या चतुसूत्री ते पाहू.
- जातिवंत गाई: भरपूर दुधाचे उत्पन्न घेऊन भरपूर नफा कमवायचा तर भरपूर दूध देणारी निरोगी काय आपल्याकडे असणे फार महत्त्वाचे आहे. अशाप्रकारची जातिवंत भरपूर दूध देणारी, निरोगी गाय कोणीही विकत नाही. लाखो रुपये मोजून सुद्धा अशी गाय मिळणे फार अवघड असते. अशी जातिवंत गाय आपल्याला आपल्या गोठ्यातच तयार करावी लागेल. गोठ्यात जातिवंत गाय तयार करण्यासाठी आपल्यालाआपल्या गोठ्यातील सर्व गाईंची व कालवडीची वंशावळ लिहून ठेवणे गरजेचे असते.म्हणून नोंदवही चे महत्व आहे.आपल्याकडील सर्व गाई-म्हशींना वेगवेगळ्या क्रमांकाचा बिल्ला लावला गेला पाहिजे. बिल्ला गळ्यात किंवा कानावर लावता येतो शक्यतो कानावर लावावा. त्यानंतर गाईंची ओळख त्यांच्या कानावरील बिल्ला नेच झाली पाहिजे. जातिवंत गाई तयार करण्यासाठी आपल्या गायला लावण करताना उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करावे. त्यामुळे आपला गोठ्यातच जातिवंत गाई निर्माण होतील.
- मुक्त संचार : मुक्त गोठा म्हणजे एका विशिष्ट सीमेच्या आत मोकळे सोडलेले पशुधन. मुक्त गोठा करताना एका गाईला 200 वर्ग फूट जागा, भोवताली जाळीचे कुंपण, ऊन पावसापासून बचावासाठी झाडांची, शेडची, शेडनेटची सावली, गाईला खरारा करण्यासाठी काथ्या बांधलेला खांब, पाणी पिणे आणि वैरणीसाठी 2 गव्हाणी एवढेच फक्त गरजेचे आहे. मुक्त गोटा चा फायदा असा होतो की जनावर तणावमुक्त राहते. व्यायाम होऊन स्वास्थ्य चांगले राहते. शेन वारंवार साफ करावे लागत नाही. मातीच्या, मुरमाच्या तसेच शेन वाळून नरम झालेल्या जमिनीवर फिरणे तसेच बसल्यामुळे गाईंच्या पायांवर ताण येतं नाही. जनावरांना तहान लागल्यानंतर पाणी प्यायला मिळते. खरारा करण्यास मिळाल्यामुळे चामडी चकचकीत तसेच घाण मुक्त राहते. त्यामुळे मुक्त गोटा फार महत्त्वाचा आहे.
- मुरघास : आपल्या गोठ्यातील जातिवंत गाई नेहमी स्वस्थ राहून जास्तीत जास्त दूध देण्यासाठी तिच्या आहाराचे, पोषणतत्वांची आपण काळजी घेतली पाहिजे. हिरवा चारा हा दुभत्या जनावरांसाठी अतिशय पोषक आणि आवश्यक खाद्य आहे. आपण पावसाळा हिवाळा मध्ये हिरव्या चाऱ्याची तजवीज करतो. जनावर भरपूर दूध देते पण उन्हाळा आला की चारा सुकतो आणि मग कडबा, उसाचे वाडे किंवा चारा छावणी अशी परिस्थिती उद्भवते. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी पोषक वातावरण असताना चारा पीकवून पुढच्या बारा महिन्यासाठी साठवून ठेवावा. याच प्रक्रियेला मुरघास असे म्हणतात. बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकामात मुरघास बनवता येतो. विशिष्ट वास आणि चव असणारा, पिवळ्या रंगाचा मुरघास जनावरे आवडीने खातात. चाऱ्या साठी वन वन फिरायला न लागल्यामुळे कष्ट आणि खर्चात बचत होऊन धंद्याची नियोजन करणे सोपे जाते.
- आरोग्य काळजी आणि नियमित आरोग्य तपासणी – दूध देणारी गाय, दुभते जनावर म्हणजे व्यायलेली गाय होय. गाभण आणि दुभत्या गाईचे काळजी घेणे फार महत्वाचे आहे. विशेषतः दुग्धव्यवसायातील नफ्याच्या समीकरण साठी तुमच्या गाई आजारी न पडणे किंवा स्वस्त निरोगी राहणे अतिशय महत्वाचे असते. गाईंना सर्वात जास्त धोका जिवाणू संसर्गाचा असतो. गोठ्यात वेगवेगळ्या प्रकारे जिवाणूंची वाढ होऊन गाय आजारी पडू शकते.
- यासाठी तज्ज्ञांकडून वेळोवेळी गाईंची तसेच गोठ्याची तपासणी करून घ्यावी. गाईंना वेळापत्रकानुसार जंताचे औषध पाजावे. दुभत्या गाईंना तसेच कालवडींना मिनरल मीक्चर द्यावे. गोचीड होऊ नयेत म्हणून आणि झाल्यातर गोचीड निर्मूलनासाठी काळजी घ्यावी. अँटिबायोटिक औषधांमधील अंश दुधामध्ये उतरून दुधाची प्रत खराब होते. दुधाला कमी दर मिळतो म्हणून अँटिबायोटिक औषधे शक्यतो टाळावेत. हे तेव्हाच शक्य होते तेव्हा तुमची गाय आजारी पडत नाही. शक्य असेल तर गाभण गाईंचा कालवडींचा वेगळा कप्पा करावा. गोठ्यात गोठ्यानी तर आजारी गाई, गाभण, आटवलेल्या , दुधाच्या गाई आणि कालवडी हे सर्व कप्पे वेगळे करावेत. गोठ्यातील तापमानावर खास करून उन्हाळ्यात नजर ठेवावी. संकरित गाईंना कमी तापमानाचे सवय असते. त्यासाठी उंच छत, पत्र्या वर पांढरा रंग, झाडांची सावली, गोठ्याच्या भोवताली उंच वाढणारे गवत, पंखे, फोगर्स इत्यादी उपायांनी उन्हापासून घ्यायची काळजी घ्यावी.
संदर्भ – होय आम्ही शेतकरी
Share your comments