पशुसंवर्धनाच्या एकूण खर्चापैकी 60 टक्के खर्च पशुखाद्यावर केला जातो. .म्हणून पशुपालन व्यवसायाचे यश प्रामुख्याने पशुखाद्यच्या खर्चावर अवलंबून असते. जनावरांच्या खाद्यपदार्थात स्थानिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या हिरवा चारा यांचा वापर करून पशुखाद्याची किंमत कमी करता येईल.
पशुसंवर्धन व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल.शारीरिक विकास, प्रजननं आणि दुधाच्या उत्पादनासाठी आवश्यक प्पोषक आहार योग्य प्रमाणात पशुला देणे खूप गरजेचे आहे.
भारतातील प्राण्यांचे पोषण प्रामुख्याने शेती उत्पादनावर आणि पिकांच्या चक्रांवर अवलंबून असते. हिरवा चारा हा पशु आहाराचा अविभाज्य भाग आहे. हिरवा चारा हे प्राण्यांसाठी स्वस्त प्रथिने आणि उर्जेचा मुख्य स्रोत आहे. दुभत्या जनावरांना कमी किंमतीत पौष्टिक घटक प्रदान करण्यासाठी, जनावरांना हिरवा चारा असणे आवश्यक ठरते.जर शेतकऱ्यांना त्यांची जनावरे निरोगी असावीत आणि त्यांच्याकडून अधिक दूध व मांस उत्पादन मिळावे, अशी इच्छा असेल तर वर्षभर हिरव्या चाराचा समावेश त्यांच्या आहारात असणे फार महत्वाचे असते. तसेच हिरवा चारा मऊ आणि चवदार असण्याव्यतिरिक्त, पचण्याला सोपे देखील आहे. या व्यतिरिक्त, चाऱ्यात विविध पौष्टिक घटकांचा पुरेसा प्रमाणात समावेश असतो.
हिरवा चारा कसा असायला हवा?
चारा स्वादिष्ट, निरोगी, रसदार, पचण्यास सोपा, दुर्गंधी रहित असायला हवा जेणेकरून पशु त्याला चवीने खातील. चाऱ्याच पीक हे कमी कालावधीत काढण्यायोगे येणार असावे. जास्तीचे उत्पादन देणारे, आणि पीक जास्त वेळा घेता येईल असे असावे. चारा हा लवकर फुटणारा आणि जहरिले पदार्थ विरहित पाहिजे. हिरव्या चाऱ्यांच्या पिकांची वाण कमी पर्जन्य क्षेत्रात पण येणारी हवी.
हिरव्या चारांसाठी सुधारित वाण
दुग्ध व्यवसायासाठी वर्षभर दुभत्या जनावरांना हिरवा चारा पुरविणे अत्यंत आवश्यक आहे.यामुळे प्राण्यांच्या जीवनसत्त्वे इत्यादींची आवश्यकता सर्वकाळ पूर्ण होत असते. हिरव्या चाराच्या बरीच वाणी उपलब्ध आहेत पण शेतकरी फक्त ज्वारी, बरसीम या पिकांवर अवलंबून आहे. सुधारित चारा वाणांची निवड करून, शेतकऱ्यांनी वर्षभर हिरवा चारा ठेवावा.
️सुधारित वाण
ज्वारी - पीसी -6, 9, 23,; एम.पी. चारी, पुसा चारी, हरियाणा चारी
मका: - गंगा सफेद 2,3,5; जवाहर, अंबर, शेतकरी, सोना, मांजरी, मोती
बाजरी: - जायंट हायब्रेब्यू, के -674, 677, एल-72, 74, टी -55, डी-1941, 2291
ओट्स: - एचएफओ -14, ओएस -6 आणि 7, व्हीपीओ -94ओट्स: - एचएफओ -14, ओएस -6 आणि 7, व्हीपीओ -94
गवार - दुर्गापुरा सफेद, आयजीएफआरआय -212
बरसीम: - मस्कावी, बरदान, बुंदेला, यू.पी.
संकर नेपियर: - पुसा जायंट नेपियर, एनबी -21, ईबी -4, गजराज, कोयंबटूर
सुदान घास: - एसएस-59-3, जी -287, पाइपर, जे-69.
दीनानाथ घास: - प्रकार -3, 10,15 आयजीएफआरआय-एस 3808, जी -73-1, टी -12
अंजन गवत: - पूसा जायंट अंजन, आयजीएफआरआय-एस 3108, 3133, सी -357, 358
मोहरी - जपानी रेप, ए एम -98, 100, लाही -100, चीनी कॅबेज एफ 2-902, 916.
Share your comments