शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व कुकुट पालन करत असतात.त्यामुळे त्यांच्या आर्थिक सुबत्ता वाढवण्यास मदत होते.अनेक जण त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध छोट्या जागेमध्ये कोंबड्या पाळत असतात.
यामध्ये गिरीराज,वनराज, सुवर्णधारा आणि कॅरी या प्रकारच्या जाती आपणास पाहायला मिळतात.या जातीमध्ये ग्रामीण भागामध्येग्रामप्रिया या नावाची जात प्रसिद्ध आहे. ही जात प्रामुख्याने अंडी उत्पादन करता वरदान ठरत आहे. या लेखात आपण कोंबडीच्या ग्रामप्रिया या जाती बद्दल सविस्तर माहिती घेऊ.
ग्रामप्रिया कोंबडी
या जातीची कोंबडी मध्यम वजनाच्या असून लांब सडक व मजबूत पाय असतात. अंड्याच्या उत्पादनासाठी ही जात फायदेशीर ठरते. कोंबडीच्या अंड्याचा रंग हा गुलाबी व तपकिरी असतो. लहानपणी या कोंबड्यांची भरपूर काळजी घ्यावी लागते.या कोंबड्या लहान असताना जर वातावरण थंड असेल तर बल्ब लावून उष्णता निर्माण करावे लागते.
ग्रामप्रिया कोंबडी ला लागणारे खाद्य
सुरुवातीला दोन दिवस मका भरडून द्यावी लागते. त्याचबरोबर या जातीच्या कोंबडीला ज्वारी, बाजरी, तांदळाचा चुरा,सूर्यफूल शेंगदाण्याची पेंडइत्यादी प्रकारचे खाद्य आपण देऊ शकतो. तसेच कोंबड्यांच्या आहारामध्ये खनिज, फास्फोरस आणि जीवनसत्त्वे हे घटक आले पाहिजे याची दक्षता घ्यावी. कोंबड्यांसाठी शुद्ध पाण्याचे व्यवस्थापन करावे. एक महिन्याच्या नंतर पक्ष्यांना लसूणघास, शेवग्याचा पत्ता आणि पालक थोड्या प्रमाणात दिली तर पंखांना चकाकी येते.
ग्रामप्रिया कोंबडी चे वैशिष्ट्य
1-वजन सहा आठवड्यात 400 ते 500 ग्राम होते.
2- तसेच ते वाढत जाऊन सहा ते सात महिन्यात 1600 ते 1800 ग्राम होते.
3- या कोंबडी ची पहिली अंडी देण्याचा कालावधी हा 160 ते 165 दिवस असतो.
दीड वर्षाला अंडी उत्पादन 200 ते 230 असते.
5- हे कांद्याचे सरासरी वजन हे 52 ते 58 ग्रॅम असते.
ग्रामप्रिया कोंबडीचेरोग व्यवस्थापन
या कोंबडी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात असते तरी देखील मर व इतर प्रकारच्या रोगांपासून सुरक्षा व्हावी म्हणून लसीकरण करणे आवश्यक आहे. तीन दिवसानंतर राणीखेत नावाची लस लासोटा प्रकार एक थेंब डोळ्यात द्यावी. त्यानंतर देवी नावाची फाऊल पॉक्स 0.20 एम एल मांसात किंवा कातडीत द्यावी.लसीकरण करताना शक्यतो सकाळी नऊच्या आधी करावे व संध्याकाळी सहानंतर करावे.
Share your comments