Milk Rate: देशात दुग्धव्यवसाय (Dairying) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तसेच पशुपालकांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून दुधाला चांगला दर (Good price for milk) मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (farmers) आनंदाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी दूध दरामध्ये (Increase in milk price) अमूल, मदर डेअरीने २ रुपयांची वाढ केली होती.
अमूल, मदर आणि चितळे यासारख्या अनेक व्यवसायिकांनी दुधाचे दर २ रुपयांनी वाढवले. यामुळे राज्यातील दूध व्यावसायिक संघटनांनी गायी आणि म्हशीच्या दुधात २ रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. मदर डेअरी ने एक निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की दुधाच्या किमतीमध्ये २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इनपुट खर्चात गेल्या पाच महिन्यांपासून वाढ झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
दुग्धउत्पादनात होणार भरघोस वाढ! या हिरव्या चाऱ्याने जनावरांच्या दुधात होतेय वाढ; जाणून घ्या...
गेल्या काही दिवसांपासून कच्चा दुधाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांना दर वाढवणे भाग पडले असे निवेदनात सांगणायत आले आहे. राज्य दूध उत्पादक व प्रक्रियाकारक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, ''महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दूध व्यावसायिकांची बुधवारी (दि. १७) सायंकाळी झूम मिटिंग पार पडली.
यात डिझेल, पॅकिंग मटेरियल आणि विजेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील विविध ब्रँडचे दर वेगवेगळे आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या आताच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे.''
किसान क्रेडिट कार्डचा रेकॉर्डब्रेक शेतकऱ्यांनी घेतला लाभ; आहेत फायदेच फायदे...
दूध उत्पादनात घट
इंदापूर डेअरी अँड डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेडचे अध्यक्ष दशरथ माने म्हणाले की, देशभरातील दुग्धशाळांचे दूध संकलन 8 ते 10 टक्क्यांनी कमी झाले आहे. पुण्यातील डेअरीने नुकतीच शेतकऱ्यांना द्यावी लागणारी किंमत वाढवली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. माने यांची कंपनी सोनई या ब्रँड नावाने दुधाची विक्री करते.
माने म्हणाले, “आमची डेअरी आता दररोज 20 लाख लिटर दुधाचे संकलन करत आहे, जे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 23 लाख लिटर होते. दुधाचे उत्पादन घटल्यानेच आम्हाला दुधाचे भाव वाढवावे लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Today Gold Price: सोन्याचे भाव वधारले! तरीही फक्त 30467 रुपयांना 10 ग्रॅम सोने खरेदी करा..
IMD Alert: 'या' जिल्ह्यांना 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
Share your comments