भारतात शेतीला अर्थव्यवस्थेचा कणा म्हंटले जाते. पण शेती करूनही शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर आहे. त्यामुळे शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात.
सरकार नेहमी पशुपालक शेतकऱ्यांचे (farmer) उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी तसेच त्यांना पशुपालन व्यवसायात मदत करण्यासाठी सरकार (Government) अनेक योजना राबवत असते. जर तुम्हाला देखील डेअरी (Milk Dairy) उघडून स्वतःचा रोजगार करायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे
सरकारने पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक योजना आमलात आणली आहे. ज्यामध्ये 10 म्हशींची डेअरी उघडण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. यामुळे जर तुम्हाला डेअरी उघडायची असेल तर तुम्ही या कर्जाचा लाभ घेऊन डेअरी व्यवसाय सुरू करू शकता.
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करा; आयुष्यभर खात्यात 50,000 रुपये येतील
सरकार दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी 'डेअरी उद्योजक विकास योजना' यासारख्या वेगेवगळ्या योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत पशुपालकांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो.
त्यामुळे तुम्हाला स्वतःची डेअरी चालू करायची असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत बँकेकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.
पशुपालकांसाठी दिलासा देणारी बातमी; सरकार 2 लाख रुपयांपर्यंत करणार मदत
या योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे?
या योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी, तुम्हाला राज्य सहकारी बँका, व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका त्याचबरोबर नाबार्डच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागेल. जर तुम्ही कर्ज एक लाखापेक्षा जास्त घेणार असाल तर कर्ज घेणाऱ्या कर्जदाराला त्याच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे गहाण ठेवावी लागतील.
महत्वाच्या बातम्या
घरबसल्या करा गुंतवणूक; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दरमहा मिळतील 5000 रुपये
शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर केला 'हा' मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांसाठी 'हे' खत ठरतंय वरदान; मिळतोय भरपूर नफा
Share your comments