आपल्या देशात गाई आणि म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे. यामुळे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी याची निवड करतात. असे असताना शेळीच्या दुधास येणारा विशिष्ट गंध हा काप्रिक, कापरायिड आम्लामुळे येतो. हा गंध काही प्रमाणात नियंत्रित करता येतो, आपल्या भागात नेहमीच तयार करण्यात येणारे दुग्ध पदार्थ जसे की, चक्क्का, श्रीखंड, लोणी, दही, ताक शेळीच्या दुधापासून तयार करता येऊ शकतात.
हे पदार्थ आरोग्यास हितकारक व पौष्टिक आहे. गाईच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधाचे गुणधर्म भिन्न आहेत. स्निग्ध पदार्थांच्या कणाचा लहान आकार, उच्च तापमानावर कमी स्थिरता, त्यापासून घट्ट व खवलेदार ही तयार न होणे आणि एक विशिष्ट प्रकारचा गंध शेळीच्या दुधास आहे. परंतु नविन प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे शेळीच्या दुधापासून पनीर, चीज, इत्यादी पदार्थ तयार करता येतात.
खवा हा इतर पदार्थांसाठी कच्चा माल असल्यामुळे चांगली मागणी असते. पेढा, बर्फी, गुलाबजाम हे पदार्थ बनविण्यासाठी खव्याचा वापर करतात. दुधाला उष्णता देऊन सतत ढवळणीच्या साह्याने सतत ढवळत राहून बाष्पीभवनाच्या साह्याने त्यातील पाणी कमी करून तयार होणारा घट्ट पदार्थ म्हणजे खवा होय.
अभिमानास्पद ! IFAJ मध्ये भारताचा 61 वा सदस्य देश म्हणून समावेश
अन्न प्रतिबंधक कायद्यानुसार खव्यामध्ये स्निग्धतेचे प्रमाण कमीत कमी २० टक्के असावे. शेळीच्या दुधापासून बनवलेल्या खव्याला एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो. तो घालविण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्याच्यादृष्टीने खवा बनविताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात (खव्याच्या प्रमाणात ०.२%) जायफळ पूड मिसळावी.
शरीराच्या पोषणासाठी लागणारी प्रथिने, दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ, खनिजद्रव्ये, जीवनसत्वे दुधात आवश्यक तेवढ्या प्रमाणात असतात, त्यामुळे गरोदर स्त्री, वृद्ध, तरुण मुले तसेच आजारी माणसे यांचेसाठी दूध हे एक उत्तम अन्न आहे. शेळीच्या दुधापासून पनीर हा एक पौष्टिक पदार्थ सहजरीत्या बनविता येतो. बांदल चीज किंवा सुरती पनीर हा रेनेट आणि विरजण वापरून तयार केलेला मऊ चीझचा प्रकार आहे.
मोठी बातमी! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या..
ताजे दूध, मलई आणि पावडर या घटकांच्यापासून आइस्क्रीम तयार केले जाते. हे तयार करण्याची प्रक्रिया आणि पद्धती ढोबळमानाने नियमित आइस्क्रीम सारखीच आहे. युरोपमध्ये शेळीच्या दुधापासून बनवलेल्या चीजच्या काही प्रकारास अतिशय मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ग्रीस आणि फ्रान्स या देशात मोठ्या प्रमाणावर शेळीच्या दुधापासून चीज निर्मिती होते.
पिझ्झा खाणाऱ्या लोकांच्याकडून मोझरेला चीझची मागणी वाढत आहे. मोझरेला चीज हा पिझ्झाचा अविभाज्य घटक आहे. शेळीच्या दुधापासून मोझरेला चीज हा एक उत्तम पर्याय आहे. शेळीचे दूध आणि म्हशीचे दूध ५० : ५० या प्रमाणात वापरून बनवलेले मोझरेला चीज आर्थिकदृष्टीने फायदेशीर ठरते. यामुळे शेतकऱ्यांना हा देखील एक चांगला पर्याय आहे.
सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करावी जाणून घ्या..
समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
Share your comments