शेळीपालन एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय

08 April 2020 07:44 AM


खेडोपाडी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे शेतमजूर, कष्टकरी शेळीपालनातून आर्थिक फायदा मिळवतात.साधारणतः १० ते १२ शेळ्यांचा कळप सांभाळणाऱ्या गरिबास शेळीकडून मिळणारे उत्पन्न आपले ५ ते ७ माणसांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास अत्यंत उपयोगी पडते. भारतात शेळ्यांची संख्या अंदाजे १५ कोटी आहे. जगातील एक पंचमांश शेळ्या भारतात असून, त्या जगातील इतर देशांच्या मानाने सर्वाधिक आहेत.

शेळीची निवड: उत्तम उत्पादनक्षमता असलेला कळप तयार करण्यासाठी शेळ्यांच्या निवडीकडे लक्ष देणे आवश्यक असते.

 • शेळीच्या नाकपुड्या मोठ्या असाव्यात. डोळे पाणीदार असावेत.
 • शेळी वयाप्रमाणे पूर्ण वाढ झालेली असावी. शक्यतो एक वेत झालेली शेळी विकत घ्यावी.
 • एका वर्षात शेळीचे वजन ३० किलोपेक्षा कमी नसावे.
 • कास मोठी व मऊ असावी. सड सारख्या लांबीचे असावेत. सड सुके नसावेत.
 • खांद्यापासून पुठ्यापर्यंतचा भाग सरळ असावा.
 • छाती भरदार,पोट मोठे व डेरेदार असावे. केस व त्वचा तुकतुकीत असावी.
 • शेळीचे चारही पाय मजबूत व सरळ असावेत.
 • शेळी नियमित प्रमाणे माजावर येणारी व न उलटणारी असावी.
 • शेळी जुळे करडे देणारी असावी.
 • शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्वाचे लक्षण आहे.

महाराष्ट्रातील शेळ्यांच्या जाती

 • उस्मानाबादी शेळी
 • संगमनेरी शेळी
 • सुरती (खानदेशी/निवाणी)
 • कोकण कन्याळ
 • बेरारी शेळी

 शेळ्यांचा गोठा

 • गोठ्यासाठी जागा निवडताना ती हवेशीर असावी, आजूबाजूला पाणथळ जमीन नसावी.
 • गोठ्याची जागा शक्यतो उंचावरची, उतार असलेली व पाण्याचा निचरा होणारी असावी.
 • गोठा बांधताना प्रथम किती जागा लागेल याचा विचार करावा. शेळीसाठी १० चौ.फूट, पैदाशीच्या बोकाडासाठी २५ चौ.फूट व लहान करडासाठी ७ चौ.फूट एवढी जागा लागते.
 • गोठ्यात शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असावी. एका शेळीला दररोज किमान ७ लीटर पाण्याची आवशक्यता असते.
 • गोठा बांधताना गोठ्यात पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील हे पाहावे.
 • शेळ्यांसाठी फार खर्चीक गोठ्याची आवश्यकता नसते, शेतातील उपलब्ध साहित्य वापरून गोठे बांधता येतात.
 • गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी.
 • गोठा २ प्रकारचा असू शकतो बंदिस्त गोठा आणि मुक्त गोठा.

शेळ्यांच्या आहारविषयक सवयी

 • हलता वरचा ओठ आणि जिभेच्या साह्याने, शेळ्या खूप लहान गवत खाऊ शकतात आणि थोड्या उंचीवरील (झुडपे, लहान झाडे) पाल्यावर चरू शकतात.
 • शेळ्या खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असतात.
 • शेळ्या विविध प्रकारचा पाला आणि वनस्पती खाऊ शकतात.
 • शेळ्या वेगवेगळ्या प्रकारची चव ओळखू शकतात (कडू, गोड, आंबट, खारट).
 • जिथे वनस्पतींचा पुरवठा तुरळक असतो तिथे शेळ्या औषधी वनस्पती आवडीने खातात आणि त्यामुळे त्या वाळवंटात सुद्धा राहू शकतात.
 • शेळ्यांमध्ये खनिज मिश्रणाची गरज जास्त असते.
 • काष्ठतंतूचा वापर करण्याची शेळ्यांमध्ये अद्भुत क्षमता असते.
 • पायाभूत चयापचय दर आणि थायरोक्झीन चे प्रमाण शेळ्यांमध्ये जास्त असल्यामुळे शेळ्यांना जास्त खाद्य लागते.
 • द्विदल जातीचा चारा शेळ्या आवडीने खातात.
 • मांसल शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.
 • दुध देणाऱ्या शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ५ ते ७ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.

शेळीची पचनसंस्था

 • मुखगुहा
 • अन्ननलिका
 • पोटाचे ४ भाग असतात
  १) कोटी पोट: चारा साठवला जातो, चाऱ्यावर जीवाणू व विकराद्वारे रासायनिक अभिक्रिया होण्यास सुरुवात होते.
  २) जाळी पोट: अशुद्धता वेगळी केली जाते.
  ३) ओमेझम/पडदा पोट: ओमेझम मध्ये अंकुरासारखा मांसल थर असतो. यामध्ये शिल्लक राहिलेले अन्न भरडले जाऊन अत्यंत पातळ होते.
  ४) छोटे पोट/खरे पोट: लहान करडांमध्ये सक्रीय असते. पचनक्रिया होते.
 • लहान आतडे
 • मोठे आतडे
 • गुदाशय         

शेळ्यांच्या नवजात करडांची देखभाल कशी करावी.

शेळीपालन व्यवसायात सर्वात जास्त खर्च हा शेळ्यांच्या खाद्यावर होत असतो. शेळ्यांच्या उत्तम वाढीसाठी,चांगल्या आरोग्यासाठी, उत्तम प्रजनन व दुध उत्पादनासाठी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, पाणी यासारख्या पोषक घटकांची संतुलित प्रमाणात आवश्यकता असते. शेळ्याच्या विशिष्ट पचन संस्थेमुळे त्यांना चाऱ्याची गरज मुख्यतः ३ स्वरुपात लागते-हिरवा चारा, वाळलेली वैरण, पशुखाद्य व पूरकखाद्य (खनिजे, जीवनसत्वे) इ.

चाऱ्याचे प्रमाण खालीलप्रमाणे असावे

 • हिरवा चारा: ३ ते ४ किलो.   
 • वाळलेला चारा: ०.५०० ते १ किलो.
 • पशुखाद्य: २५० ते ३०० ग्रॅम.      

शेळ्यांचे खाद्यामध्ये क्षार व जीवनसत्वांचा अपुरा पुरवठा असल्यास क्षारविटा गोठ्यात उपलब्ध कराव्यात.

लसीकरण वेळापत्रक

आजार

वय

प्रमाण

वेळ

पी.पी.आर

३ महिने

दर ३ वर्षाला

ऑक्टोबर

लाळया खुरकत

३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत

दर ६ महिन्याच्या अंतराने

नोव्हेंबर

देवी

३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत

रोग प्रादुर्भाव असल्यास दरवर्षी

जानेवारी

आंत्रविषार

३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत

वर्षातून एकदा

जुलै

घटसर्प

३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत

वर्षातून एकदा

जून


करडे, शेळ्या बाहेर चरावयास जात असल्याने मोठ्या प्रमाणात जंताचा प्रादुर्भाव त्यांना होत असतो. त्यामुळे जंतामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खालील जंतनाशकांचा वापर करावा.

जंताचा प्रकार

जंतनाशकाचे नाव

महिना

टेपवर्म (फितीसारखे)

आक्सिक्लोझानाईट व लिव्हामिसाल

जानेवारी व जुन

स्ट्रगाईल (गोलकृमी)

फेनबेंडाझोल

मार्च व जुलै

लिव्हर फ्लूक (चपटे कृमी)

फेनबेंडाझोल

मे व ऑक्टोबर

 
शेळीपालनाचे फायदे:

 • कमी चाऱ्याच्या व पाण्याच्या प्रदेशात झाडपाल्यावर उपजीविका करत शेळी तग धरू शकते.
 • शेळ्यांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या संख्येने वाढ होते कारण शेळ्या एका वेतात २ ते ३ करडे देतात.
 • कमी खाद्य, टाकावू अन्न, भाजीपाला, झाडाची पाने यावर शेळी उपजीविका करू शकते.
 • शेळीपालनाचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक सोपा आहे कारण त्यास जागा व भांडवल कमी लागते.घरातील मुले स्त्रिया हा व्यवसाय सांभाळू शकतात.
 • शेळ्यांची उत्पादनक्षमता चांगली आहे. शेळ्या २ वर्षात ३ वेते देतात.
 • शेळ्यांमध्ये रोगराईचे प्रमाण कमी आहे.
 • शेळ्याकडून कुटुंबासाठी दुध मिळवता येते, ते पचायला हलके असते.

लेखक:
डॉ. सागर जाधव
M.V.Sc (पशु पोषणशास्त्र)
9004361784
डॉ. संजय मल्हारी भालेराव
डॉ. विनायक गुलाबराव पाटील

goat goat farming शेळीपालन शेळी उस्मानाबादी कोकण कन्याळ संगमनेरी सुरती बेरारी berari surati sangamneri kokan kanyal osmanabadi
English Summary: Goat farming is a profitable agriculture allied business

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.