भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.भारतातील शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, कुकुट पालन,शेळीपालन,वराह पालन इत्यादी व्यवसाय करतात.
पशुपालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यासोबतच आता बरेच शेतकरी शेळीपालन आकडे मोठ्या प्रमाणातवळताना दिसत आहेत.शेळी पालन हा कमी जागेत आणि कमी खर्चात करता येणारे व्यवसाय असल्यामुळे आणित्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल शेळीपालनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे.पशु पालन आणि शेळीपालन यासारख्या व्यवसायांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. शेळीपालना मुळे शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक हीतहवे त्या प्रमाणात अजूनही साध्यकरता आलेले नाही त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेळी क्लस्टर योजनेला मंजुरी दिली आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेळीपालन प्रशिक्षणापासून शेळीचे दूध,मांस विक्रीपर्यंत अनेक पदार्थ एकाच ठिकाणी तयार केले जाणारी अशी ही गोठ क्लस्टर योजना आहे. ही योजना अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास नक्षत्रात ही योजना राबविण्यात येणार असून या योजनेसाठी सात कोटी 81 लाख यांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर अमरावती जिल्ह्यामधील पोहरा येथे पन्नास एकर जागेवर राबवली जात आहे.
असे आहे या योजनेचे स्वरूप
गोट क्लस्टर मध्ये प्रशिक्षण केंद्र व शेतकरी निवास स्थान तसेच 500 शेळ्या व 25 बोकडांचे मॉडेल शेळी फार्म, दीड एकर जागेवर शेळ्या करिता शेड शेळीच्या दुधापासून पदार्थ प्रक्रिया केंद्र,शेळ्यांचे मांस प्रक्रिया केंद्र त्यासोबतच विक्री केंद्र 15 एकर क्षेत्रावर वैरण लागवड प्रकल्प देखील असणार आहे.
समूह शेळी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी किंवा फेडरेशन स्थापन करून त्यांना शेळी पालन प्रशिक्षण, शेळीपालन व्यवसाय करिता लागणाऱ्या सुविधा देणे, अद्ययावत तंत्रज्ञान व निर्यात सुविधा देखील दिल्या जाणार आहे.
Share your comments