पशुपालनामध्ये बरेच शेतकरी म्हैसपालन करतात. कारण वाढीव दूध उत्पादनासाठी म्हशी या महत्त्वपूर्ण असतात. जर आपण म्हशीच्या अनेक प्रजातींचा विचार केला तर भारतामध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रजाती आहेत. त्यापैकी महत्त्वाची प्रजात म्हणजे पश्चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हैस होय.
नक्की वाचा:Business Idea: डेअरी फार्म सुरु करा आणि कमवा लाखोंचा नफा; सरकार देतंय २५ टक्के सबसिडी
या म्हशीला नुकत्याच भारतीय कृषी संशोधन केंद्र अंतर्गत राष्ट्रीय पशु आनुवंशिकी संसाधन ब्युरो,कर्नाल यांच्या वतीने नुकत्याच भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली व त्यामध्ये या म्हशीला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे.
जर आपण पूर्णाथडी म्हशीचा विचार केला तर हे पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळते व फिकट राखाडी रंगाच्या या म्हशीला राजाश्रय मिळावा तसेच तिचे स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिकी संसाधन विभागाकडे त्यासंबंधीचा प्रस्ताव दाखल केला गेला होता व तो आता मार्गी लागला आहे.
पूर्णाथडी म्हशीचे वैशिष्ट्ये
हि म्हैस महाराष्ट्रातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदी काठच्या भागांमध्ये आढळते. या म्हशीला स्थानिक पातळीवर विविध नावे असून त्यामध्ये गावळी,भुरी तसेच राखी या नावानेदेखील ओळखले जाते.
ही आकाराने लहान तसेच पूर्णाथडी म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते तसेच प्रजनन क्षमता देखील उत्तम असून पालणाचा खर्च कमी लागतो. तसेच या म्हशीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उष्ण हवामानात देखील ती चांगल्या प्रकारे तग धरते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ
या म्हशीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असल्यामुळे ती छोट्या आणि मध्यम म्हैस पालकांमध्ये प्रसिद्ध आहे. जर या म्हशीच्या दूध देण्याच्या प्रमाणाचा विचार केला तर दिवसा साधारणतः चार ते पाच लिटर दूध देते. जर संपूर्ण एका वेताचा विचार केला तर सरासरी 250 दिवस दूध देते व एक हजार किलोग्राम पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे.
या म्हशीचे पहिल्यांदा विण्याचे वय हे पाच वर्षे पर्यंत आढळते. तसेच या म्हशीच्या दुधातील फॅटचे प्रमाण सरासरी साडेआठ टक्के आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर म्हशीच्या जाती मध्ये मराठवाडी, नागपुरी आणि पंढरपूरी या प्रमुख जातींचा समावेश होतो परंतु आता या यादीत पूर्णाथडी म्हशीची जात देखील समाविष्ट झाली आहे.
Share your comments