गोचीड ताप हा प्रमुख्याने गाई आणि म्हशी मध्ये होतो.हा आजार प्रामुख्याने गोचिडाच्या माध्यमातून पसरतो. या आजारांमध्ये प्रामुख्याने जनावरांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.हा आजार प्रामुख्याने संकरित गाईंमध्ये जास्त आढळतो. तसेच या आजारात तांबड्या रक्तपेशी देखील नाश पावतात.या रोगाचे जंतू जनावरांच्या शरीरामधील लिन्फग्रंथीमध्ये वाढतात.त्यामुळे या ग्रंथीचा आकार मोठा होतो.
या रोगाच्या प्रसाराची कारणे
- जुलै ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत जनावरांच्या शरीरावर गोचीड खूप प्रमाणात आढळतात.
- तसेच वातावरणातील उष्ण व दमट हवामान,तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव देखील या रोग निर्मितीस कारणीभूत होण्यास मदत करतात.
- देशी गाई, बैल रोग वाहक म्हणून कार्यरत असतात आणि या जनावरांमध्ये क्वचितच लक्षणीय स्वरूपात रोग आढळून येत असतो.
- तुलनात्मकदृष्ट्या विदेशी जनावरे जास्त प्रमाणात बळी पडतात. गाईंच्या तुलनेमध्ये या आजारास म्हशी प्रतिरोधक असतात. परंतु तर गोचडी च्या माध्यमातून झालेल्या रोगाची तीव्रता प्रखर असते.
- संकरित वासरांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे प्रादुर्भाव झालेली जनावरे या रोगाला जास्त बळी पडतात.
- या आजाराची बाह्य लक्षणे हे तीव्र स्वरूपातील रोगा समानच असतात.परंतु प्रखरता कमी असते.म्हशीमध्येसहसावरीललक्षणेकमीअधिकप्रमाणातदिसूनयेतात. त्यामुळे म्हशीमध्ये या रोगाचे निदान करण्यात चूक होऊ शकते.
- या आजाराचा पूर्वकालदहा ते पंधरा दिवसांचा असून स्थानिक क्षेत्रात रोगक्षमवासरेरोगास बळी पडतात किंवा देशी जनावरास समान प्रतिरोधक असतात.
या आजाराचे लक्षणे
1-या आजारात जनावरांच्या शरीराचे तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत वाढते.
2-नाका मधून तसेच डोळ्यातून पाणी वाहते, हृदयाचे स्पंदन जलद गतीने होते तसेच लसिका ग्रंथी आकारमानाने वाढतात.
3-भूक कमी लागणे,रवंथ करणे बंद होते, रक्तमिश्रित विष्टा,नाडीचे ठोके जलद होतात.जनावरे कृश होत जातात आणि अर्ध शयन स्थिती ग्रहण करते.
4- श्वसनाला त्रास होतो आणि श्वसनाचा वेग जलद असतो.शेवटच्या काळात नाकावाटे फेसाळ विसर्ग वाहतो.
प्रतिबंधात्मक उपाय
1-गोचिडांची निर्मूलन करण्यासाठी गोचिडांची जीवनचक्र समजून घेणे आवश्यक आहे.
2- गोचीड जमिनीवर पडतो व जवळील भेगांमध्ये शिरतो आणि जवळपास तीन ते चार हजार अंडी घालतो.
3-
अंड्यांमधून निघणारे सूक्ष्म गोचीड जनावरांच्या अंगावर चिकटून रक्त पितातव खाली पडतात.खाली पडल्यानंतर ते कात टाकतात. अशाच प्रकारे दोन ते तीन वेळा होते व नंतर मादी गोचीड परत अंडी घालते.
गोठ्यातील गोचीड निर्मूलन
1-जनावरांचा नियमित खरारा करावा.
2- पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांच्या गोचीड निर्मूलन करावे.
3- वर्षातून कमीतकमी दोनदा गोठ्यातील भेगा फ्लेग गनच्या सहाय्याने जाळून घ्यावे.
Share your comments