म्हैस आणि गायीच्या दुधाच्या डेअरीविषयी आपण नेहमी ऐकत असतो. या व्यवसायातून आपल्याला चांगली कमाई होते. साधरण ५० रुपये लिटर प्रमाणे आपण दूध विकत घेत असतो. परंतु २ हजार रुपये लिटर प्रमाणे दुधाची विक्री होते याची आपणांस कल्पना आहे का? हो आणि तुम्ही समजत असलेले हे ते दूध नाही, हे दूध आहे गाढविणीचे. या दुधाला म्हैस अन् गायीच्या दुधापेक्षा अधिक भाव आहे. दरम्यान देशात गाढविणीच्या दुधाची पहिली डेअरीही सुरू होत आहे.
देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरियाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढविणीच्या दुधाची डेरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवले असून त्यांचे ब्रीडिंग केले जाणार आहे. आतापर्यंत आपण गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधाचे सेवन केले असेल पण कधी गाढविणीचे दूध सेवन केल्याचे ऐकले आहे का? पण आता देशात चक्क हे दूध डेअरीत मिळणार आहे.
त्यासाठी स्पेशल डेअरी सुरू केली जाणार आहे. असा दावा केला जात आहे की गाढविणीचे दूध आपली इम्यून सिस्टम ठीक करण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हिसारमध्ये गाढविणीच्या एक प्रजाती असलेल्या हलारी जातीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहेत.
एक लिटर दुधाची किंमत
ब्रीडिंगनंतर लवकरात लवकर डेअरीचे काम सुरू केले जाणार आहे. हलारी प्रजातीच्या गाढविणीचे दूध औषधाचा खजिना मानला जातो. हे दूध बाजारात २ हजार ते ७ हजार रुपये लिटर विकले जाते. या दुधामुळे कॅन्सर, लठ्ठपणा, एलर्जी यासारख्या आजाराने सोबत लढण्याची ताकद विकसित होते. उल्लेखनिय म्हणजे या दुधापासून महागडे ब्युटी प्रॉडक्ट ही तयार केले जातात.
गाढविणीच्या दुधाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत
या प्रोजेक्टवर काम करणारे एनआरसीइतील डॉक्टर अनुराधा भारद्वाज त्यांनी सांगितले की, अनेकदा गाय किंवा म्हशीच्या दुधाने मुलांना अलर्जी होते. परंतु हलारी प्रजातीच्या गाढविणीच्या दुधाने कधीही एलर्जी होत नाही. हे दूध म्हणजे एंटीऑक्सीडेंट, अँटी एजंट तत्वांचे भांडार आहे, त्यामुळे शरीरात अनेक गंभीर आजाराच्या विरोधात लढण्याची क्षमता विकसित होते. डॉक्टर अनुराधा यांनी या दुधापासून ब्युटी प्रॉडक्ट तयार केले होते, तसेच या दुधापासून साबण, लीप बाम, बोडी लोशन तयार केले जात आहे.
Share your comments