शेळीपालन व्यवसाय हा कमी खर्चिक व कमी वेळात चांगला नफा देणारा व्यवसाय आहे. शेतकरी बंधू शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात.आपल्या भारतात शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जाती आहेत.त्यांची पुरेशी माहिती घेतली तर शेळी पालन व्यवसाय हा यशस्वी करता येऊ शकतो.अशीच एक शेळी ची जात जी शेळीपालनाच्या दृष्टीने योग्य ठरेल,त्या जाती विषयी या लेखात माहितीघेऊ.
फायदेशीर शेळीची जात संगमनेरी शेळी
ही शेळी पांढरीशुभ्र असून अर्ध बंदिस्त शेळीपालनासाठी शिफारस केलेली जात आहे. या शेळीपालन दूध आणि मांस या दोन्ही उद्देशासाठी केले जाते. या शेळ्या दर दिवशी दीड ते दोन लिटर दूध देतात.
संगमनेरी शेळी चे शारीरिक वैशिष्ट्ये
- संगमनेरी शेळ्यांमध्ये जास्त शेळ्या पांढऱ्या रंगाचे असतात. जवळ जवळ 66% शाळा पांढऱ्या रंगाचे असून 16 टक्के शेळ्या तांबड्या रंगात व उर्वरित शेळ्या पांढरट तांबड्या रंगात दिसून येतात.
- संगमनेरी शेळ्यांचे नाका चमकदार काळे किंवा तांबड्या रंगाचे असते.
- या शेळीचे पाय / खूर काळाच्या तांबड्या रंगाचे असतात.
- यामधील जवळजवळ आठ टक्के ते 12 टक्के शेळ्या या बिन शिंगे असतात. सर्वच काही शेळ्यांना शिंगे आढळतात. यांच्या शेंगांचा आकार हा सरळ व मागे वळलेला असतो.
- काही संगमनेरी शेळ्या मध्ये तुरळक प्रमाणात दाढी दिसून येते.
- या शेळ्यांची शेपटी ही बाकदार असते. शेपटीची लांबी साधारणतः 18 ते 25 सेंटिमीटर लांबीचे असते.
- या शेळ्यांचे कान प्रमुखाने खाली लोंबकळलेले असून बहुतेकदा होऊ दे किंवा समांतर रहित दिसून येतात.
संगमनेर शेळ्यांचे पैदाशीचे गुणवैशिष्ट्ये
- संगमनेरी शेळ्यांचे वयात येण्याचं वय आठ ते नऊ महिने म्हणजेच 245 दिवस असते.
- प्रथम माजावर येण्याचे वय हे आठ ते नऊ महिने आहे.
- संगमनेरी शेळ्या या प्रथम गाभण प्राण्याचे वय 287 दिवस म्हणजेच नऊ महिने 26 दिवस इतकेआहे.
- संगमनेरी शेळ्यांचे प्रथमत विण्याचे वय 430 दिवस अंदाजे आहे.
- या शेळ्यांचा माजाचा कालावधी 41 तासाचा असतो.
- या शेळ्यातीलदोन माजामधील अंतर 22 ते 23 दिवस आहे.
- जर संगमनेरी शेळ्या मधील करडांची टक्केवारी पाहिली तर एक करडे 42 टक्के आहे, जुळे देण्याचे प्रमाण 54% आणि तिळेकरडे देण्याचे प्रमाण तीनटक्के आहे.
- संगमनेरी शेळी ही तिच्या दूध उत्पादन कालावधी म्हणजे 90 दिवसांमध्ये सरासरी 80 लिटर दूध सहज देते.
Share your comments