1. पशुसंवर्धन

दुधातील अधिक फॅटसाठी पाळा भदावरी म्हैस, कोणत्याही परिस्थीत देईल मोठा नफा

KJ Staff
KJ Staff


पशुपालनात आपण दूध आणि खतांपासून पैसा मिळवत असतो. दुधाच्या उत्पादनात म्हैशींचं मोठं योगदान असतं. म्हैशी गायीपेक्षा अधिक दूध देतात. भारतात २३ प्रजातीच्या म्हैशी आढळल्या जातात. या प्रजातींमध्ये भदावरी जात  सर्वात सरस आहे.  या जाती अधिक दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या म्हैशींच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट असते.  जानकारांच्या मते या म्हैशींच्या दुधात ८ टक्के फॅट असते.  ही आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या म्हैशींच्या दुधापासून बनविण्यात आलेल्या तुपाची मोठी मागणी असते.  या जातीच्या म्हैशी ह्या आकाराने मध्यम असतात, आणि त्यांच्या शरिरावरील केस कमी प्रमाणात असतात.  या म्हैशींचे पाय पण लहान असतात पण मजबूत असतात.  अशी भदावरी म्हैस आपल्यासाठी कशी फायदेशीर आहे याची माहिती घेऊ....

वजनदार असतात म्हैशी...

या जातीच्या म्हैशींचं वजन अधिक होत असते.  साधरण या म्हैशींचे वजन ४०० किलोग्रॅम असते. याची आणखी एक विशेषता आहे ती म्हणजे इतके वजन असतानाही या म्हैशींचा आहार मात्र साधारण असतो.  यामुळे या म्हैशी पाळण्यासाठी अधिक खर्च येत नसतो.

कठिण परिस्थीतीमध्येही जुळून घेतात

याच्यासाठी कोणताही ऋतू हा सामान्य असतो.  त्या कोणत्याही परिस्थीतीत जुळवून घेत असतात.  या जातीच्या म्हैशीचे पालन  भऱपूर जमीन असलेले शेतकऱी ही करु शकतात तर जमीन नसलेले शेतकरी पण या म्हैशींचे पालन करु शकतात.   या म्हैशी अत्यंत उष्ण किंवा दमट हवामानात राहण्यासही सक्षम असतात.  या इतर म्हशींपेक्षा कमी आजारी पडत असतात, कारण त्यांची तब्येत चांगली असते.  म्हैशींपासून उत्पादित होणाऱ्या पारडूचा मृत्यूदर इतर म्हैशींच्या पारडूच्या तुलनेत कमी असतो, असा विश्वास तज्ञांचा आहे.  आजच्या घडीला या जातीच्या म्हैशी आग्रा, इटावा, मध्ये आढळून येतात. देशभरातील म्हैशींचे पालन करणारे लोक या म्हैस खरेदी करण्यासाठी  इटावा, आग्रा येथे जात असतात.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters