जनावरांचे दूध देण्याची क्षमता ही प्रमुख्याने जनावरांच्या जाती, त्यांचे अनुवंशिकता, वय आणि वेळेत यावर अवलंबून असते. तसेच ते काही अंशी नैसर्गिक ऋतू चक्रावर देखील अवलंबून असते. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये चढ-उतार होत असतो.
परंतु समतोल आहार, आरोग्य व योग्य व्यवस्थापन तसेच पालन-पोषण त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास दुधउत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते. या लेखात आपण दुधाळ जनावरांसाठी कोणता आहार द्यावा याबद्दल जाणून घेऊ.
दुधाळ जनावरांसाठी आहार
- जनावर व्यायल्यानंतर पहिले चार दिवस जवळपास दोन किलो गव्हाडा दीड किलो गूळ, दोन चमचे मीठ व क्षारयुक्त मिश्रण द्यावे.
- पहिले तीन महिन्यांपर्यंत दिवसातील संपूर्ण 28 ते 30 किलो आहार तीन वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादनातचांगल्या प्रकारे वाढ होते.
- रोजच्या शरीर पोषणासाठी जवळपास एक ते दीड किलो देशी गाईंसाठी, दोन किलो खुराक संकरित गाय आणि म्हशी साठी द्यायला हवा.
- दुधात जनावराला वजनाच्या दोन ते साडेतीन टक्के सुका चारा द्यावा. त्यापैकी 2/3 भाग वैरण आणि1/3 भाग आंबोण देणे फायद्याचे ठरते.
- प्रती तीन लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी एक ते दीड किलो अतिरिक्त खुराक द्यावा.
- दुधाळ गायी व म्हशी ला प्रति दिन 15 ते 20 किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून तसेच चार ते आठ किलो सुका चारा दिल्यास दूध उत्पादनात फायदा मिळू शकतो.
- दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये प्रथिने,खनिज मिश्रण असलेले खाद्य द्यावे.
- शेवग्याच्या झाडाचा पाला खनिज गुणधर्मासाठी उत्तम आहे.
- दुधाळ जनावरांना दररोज वीस ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिल्यास दूध उत्पादनात चांगली वाढ होते.
- स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात प्यायला द्यावे.
इतर व्यवस्थापन
- दूध हे एकाच माणसाच्या हाताने ठराविक वेळेच व समान अंतराने काढावे.
- शेवटची धार पूर्णपणे काढावी त्यात स्निग्धांशाचे प्रमाण वाढते.
- जनावरांची स्वच्छता ठेवावी व आरोग्याची काळजी घ्यावी.
- जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या पुढील पिढीचे संगोपन करावे.
Share your comments