जनावरांच्या चांगल्या आहारासाठी आणि चांगल्या दुग्ध उत्पादनासाठी काही पोषक पशूखाद्याचा वापर करणे गरजेचे असते. फळे आणि भाजीपाला पशूखाद्य (Animal Feed) म्हणून वापरता येतात.
भाजीपाला पाने, फळांची साले, केळी आणि आंब्याची साले, कोबीची पाने (Cabbage leaves) ही पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे. याचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर केल्यास पशुखाद्याचा खर्च कमी होईल. मूल्यवर्धित उत्पादनांची श्रेणी निर्माण होईल. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यात मदत होईल.
बहुतेक परीक्षित फळांचा प्रक्रियेनंतरचा लगदा, केळीची पाने आणि साले, आंब्याची साल, लिंबूवर्गीय फळे, अननसच्या प्रक्रियेनंतर शिल्लक राहणारा चोथा, गाजर, मटार शेंगा, बेबी कॉर्न भुसा हे जनावरांच्या खाद्यामध्ये पोषक तत्त्वांचे उत्कृष्ट स्रोत म्हणून वापर शक्य आहे.
'या' शेतीची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर; 25 लाखांपर्यंत होतोय नफा
केळी
बाजारपेठेत विक्रीस योग्य नसलेली केळी, कच्ची केळी, प्रक्रियेनंतरचा चोथा, केळीची साले, पाने, कोवळ्या देठांचा वापर पशुखाद्यात करता येतो. केळीच्या सालीमध्ये विविध पोषक घटक असतात.
हिरव्या सालीमध्ये अंदाजे १५ टक्के स्टार्च असते, जे फळ पिकल्यावर साखरेमध्ये रूपांतरित होते आणि पिकलेल्या सालीमध्ये अंदाजे ३० टक्के मुक्त शर्करा (Sugar) असते.
जनावरांच्या आहारात १५ ते ३० टक्के केळीच्या सालीचा समावेश केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण न होता किंवा रुचकरपणावर परिणाम न होता वजन लक्षणीयरित्या वाढते.
सावधान! तुमचा होऊ शकतो आर्थिक तोटा, वेळीच घ्या दक्षता; वाचा आजचे राशीभविष्य
कोबी
कोबीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने कॅलरी (calories) कमी आहेत. तंतूमय घटक, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व सी आणि बी ९ आणि कॅल्शिअमचा चांगला स्रोत आहे. कोबीमध्ये इंडोल,आयसोथियोसायनेट्स आणि डायथिओलथिओन्स हे घटक कर्करोगविरोधी आहेत. पानामधील लोह सहज पचण्याजोगे आहे.
फ्लॉवर
फ्लॉवरमध्ये तंतूमय घटक चांगल्या प्रकारे आहेत तसेच प्रथिने, थायामिन, रिबोफ्लेविन (Riboflavin), फॉस्फरस, पोटॅशियम, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व के, जीवनसत्त्व बी ६, फोलेट, पॅन्टोथेनिक ॲसिड आणि मॅंगेनीजचा चांगला स्रोत आहे. फ्लॉवर आणि त्याचे टाकाऊ पदार्थ जनावरांसाठी पर्यायी खाद्य स्रोत आहे.
महत्वाच्या बातम्या
सावधान! शरीरात वारंवार वेदना होत असतील तर आजारांची लक्षणे असू शकतात
शेतकऱ्यांनो मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती
फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा 15 हजार रुपयांपर्यंत महिना पेन्शन
Share your comments