1. पशुधन

काय आहेत दुधातील फॅट कमी होण्याची कारणे

दुधातील फॅट हा प्रतवारी च्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधातील फॅटवर दुधाची चव, स्वाद ह्या गोष्टी अवलंबून असतात. दुधाची किंमत देखील या फॅट च्या आधारे ठरवली जाते. गाईच्या दुधाची किमान फॅट 3.8 आणि म्हशीच्या दुधाची फॅट 6 असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा अनेक कारणांमुळे दुधातील फॅट कमी लागण्याची प्रमाण वाढते व शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. त्याची कारणे आणि उपाययोजना याबद्दल या लेखात माहिती घेऊ. दुधातील फॅट कमी लागण्याची कारणे अनुवंशिकता किंवा जनावरांची जात 1- जनावरांची अनुवंशिकता किंवा जात ही फॅटच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. दूध उत्पादनक्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण एक गुणधर्म गुणसूत्र द्वारे नियंत्रित केले जाते. 2- गावरान गाईंमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण चार टक्यां पेक्षा अधिक आढळते. त्या तुलनेने जर्सी गाईच्या दुधात पाच टक्के, होल्स्टिन फ्रिजीयन गाईच्या दुधात तीन ते साडेतीन टक्के एवढ्या कमी प्रमाणात स्निग्धांश आढळतात. 3- दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण यांचा खूप जवळचा संबंध आहे. होल्स्टिन फ्रिजीयन गाई चे दूध उत्पादन जास्त असले तरी दुधातील फॅटचे प्रमाण कमी असते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
milk fat

milk fat

 दुधातील फॅट हा प्रतवारी च्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधातील फॅटवर दुधाची चव, स्वाद ह्या गोष्टी अवलंबून असतात. दुधाची किंमत देखील या फॅट च्या आधारे  ठरवली जाते. गाईच्या दुधाची किमान फॅट 3.8 आणि म्हशीच्या दुधाची फॅट 6 असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा अनेक कारणांमुळे दुधातील फॅट कमी लागण्याची प्रमाण वाढते व शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. त्याची कारणे आणि उपाययोजना याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 दुधातील फॅट कमी लागण्याची कारणे

 अनुवंशिकता किंवा जनावरांची जात

  • जनावरांची अनुवंशिकता किंवा जात ही फॅटच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. दूध उत्पादनक्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण एक गुणधर्म गुणसूत्र द्वारे नियंत्रित केले जाते.
  • गावरान गाईंमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण चार टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आढळते. त्या तुलनेने जर्सी गाईच्या दुधात पाच टक्के, होल्स्टिन फ्रिजीयन गाईच्या दुधात तीन ते साडेतीन टक्के एवढ्या कमी प्रमाणात स्निग्धांश आढळतात.
  • दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण यांचा खूप जवळचा संबंध आहे. होल्स्टिन फ्रिजीयन गाई चे दूध उत्पादन जास्त असले तरी दुधातील फॅटचे प्रमाण कमी असते.

जनावरांचा आहार

  • जनावरांना संतुलित आणि पोषक आहार देणे गरजेचे आहे.
  • वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न  घालता चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा.
  • दुधातील फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी ऍसिटिक आम्ल महत्त्वाचा घटक आहे. हे आंबलं तयार होण्यासाठी सुक्‍या चाऱ्यातील सेल्युलोज महत्त्वाचे आहे. त्यासाठी गाई म्हशींना हिरव्या चाऱ्याबरोबर सुका चारा देणे आवश्यक आहे.
  • जनावरांच्या आहारात उसाचा वापर जास्त टाळावा कारण जनावरांच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढले तर दुधातील फॅट च्या प्रमाणावर त्याचा परिणाम होतो.
  • काही पशुपालक गाई-म्हशींच्या आहारात खाद्याबरोबर तेलाचा वापर करतात. आहारात सरकीच्या तेलाचा अंश असल्यास फॅट मध्ये थोडी वाढ होते. परंतु खाद्यातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास  पचन क्षमतेवर  वाईट परिणाम होऊन दुधाचे प्रथिनांमध्ये घट येते.

 

 दूध काढण्याच्या वेळा

  • सर्वसाधारणपणे सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेस गाई व म्हशीचे दूध काढतात. या दोन्ही वेळेचा दूध उत्पादन व फॅट सी खूप जवळचा संबंध असतो.
  • दूध काढण्याच्या दोन वेळा मध्ये जास्तीत जास्त बारा तासाचे अंतर असावे. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

जनावरांचे वय व वेताची संख्या  

  • जनावरांचे वय जसजसे वाढते तसतसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी कमी होते.
  • पहिल्या वेतात फॅटचे प्रमाण जास्त मिळते. नंतर ते कमी कमी होत जाते.
  • साधारणपणे गाय व्याला पासून 31 दिवसांमध्ये तिचे दूध वाढते आणि 50 ते 60 दिवसांपर्यंत टिकून राहते परंतु दूध वाढीबरोबर या काळात फॅटचे प्रमाण कमी होत जाते. याउलट गाय जसजशी आटत जाते तसतसे दूध उत्पादन कमी होऊन दुधातील फॅटचे प्रमाण वाढत जाते.

 दुधाळ जनावरांतील आजार

 संकरित गाई मध्ये कासदाह हा कासेचा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. कासदाह झालेल्या गाईच्या दुधातील फॅटचे प्रमाण सरासरी पेक्षा जवळजवळ निम्म्याने कमी झाले असते.

 

 गाभण काळातील प्रकृती

 गायीच्या गाभण काळातील आरोग्याचेही दुधातील फॅटवर परिणाम होतात.

 

 ऋतुचक्र

 सर्वसाधारणपणे दूध वाटले की फॅटचे प्रमाण कमी होते.. तर दूध उत्पादन कमी झाले की दुधातील फॅट वाढते. पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने दूध उत्पादन वाढते परंतु फॅटचे प्रमाण कमी होते. याउलट उन्हाळ्यामध्ये कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील स्निग्धांश व वाढलेली दिसून येते. उन्हाळ्यामध्ये तापमानात जास्त वाढ झाल्यास जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात. अशा वेळी त्यांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते.

 

 दुधातील फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाय योजना

  • जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावे. उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा. भाताचा पेंढा, गव्हाचा काड इत्यादी प्रकार असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील फॅट कमी होतात.
  • गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मक्का, भरडा, तुर, हरभरा, मुगचुनी, गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
  • आपल्याकडे जर जास्त दूध देणाऱ्या व स्निग्धांश कमी असणारे गायी असतील व अधिक दूध उत्पादनामुळे आपण त्यांचा सांभाळ करत असल्यास त्यांच्या पुढील पिढ्या जर्शी जातीचे रेतन करून तयार करावे. त्यामुळे दूध उत्पादनात बरोबर दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढते.
  • दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवावी म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाणात देखील वाढ होईल व दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
  • दुधाळ जनावरांना होत नाहीत. कासदाह झाल्यास पशुतज्ज्ञांकडून त्वरित उपचार करावेत.
  • जास्त वयस्क जनावरे, सातव्या वेताच्या पुढील दुधाळ जनावरे गोठ्यातठेवू नयेत.
English Summary: fat in milk Published on: 19 June 2021, 12:15 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters