पशुपालन हा शेतकऱ्यांचा एक मुख्य व्यवसाय आहे. यामध्ये अनेकदा चढउतार येतात. तसेच याबाबत माहिती नसल्याने देखील मोठे नुकसान होते. यामध्ये आपल्या देशात म्हैस पालन इतर पशुपालनाच्या तुलनेत सर्वात अधिक केले जाते. भारतात एकूण दुग्धोत्पादनापैकी 49 टक्के दूध फक्त म्हशींपासून मिळते. याचे योग्य व्यवस्थापन केले तर यामध्ये शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात.
म्हशीच्या सुधारित आणि अधिक दुग्धोत्पादन असलेल्या म्हशीच्या जातींची योग्य निवड केली, तर यामधून आपल्याला चांगले पैसे देखील मिळतील. यामध्ये मुऱ्हा म्हैस ही एक म्हशीची उत्कृष्ट जात आहे. म्हणुन या यादीत पहिला क्रमांक येतो तो मुर्राह जातीच्या म्हशीचा. या जातीच्या म्हशीचे दुग्ध उत्पादनासाठी अधिक पालन केले जाते.
मुऱ्हा म्हशीच्या दुधात सुमारे 9 टक्के फॅट आढळते. ही म्हैस एका वर्षात एक ते तीन हजार लिटर दूध देते. यामुळे याचे पालन फायदेशीर ठरते. तसेच पंढरपुरी म्है ही जात मूळची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातली यामुळे या जातीला पंढरपुरी म्हैस म्हणून संबोधले जाते. पंढरपुरी म्हशीच्या दुधात ८ टक्के फॅट आढळत असल्याचे सांगितले जाते. म्हशीची ही देशी जातं 1700 ते 1800 लिटर एका वेताला दुध देते.
म्हशीचे सर्वात जास्त पालन महाराष्ट्रातच बघायला मिळते. इतर राज्यात देखील या म्हशीचे पालन केले जाते. तसेच मेहसाणा म्हैस ही देखील म्हशीची एक प्रगत जात आहे. या जातीच्या म्हशी मुख्यतः गुजरात आणि आपल्या राज्यात अधिक प्रमाणात पाळल्या जातात. ही म्हस सरासरी 1200 ते 1500 लिटर दूध प्रति वर्ष देते. ही जात जास्त दूध देण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. यामुळे या जातीची निवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
सध्या दूधदरात काहीशी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक कुटूंबे ही दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत. तसेच भारताचा दुधाचे उत्पादन करण्यात जगात मोठा वाटा आहे. भारतात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. भारतात एकूण दुग्धोत्पादनापैकी 49 टक्के दूध फक्त म्हशींपासून मिळते.
महत्वाच्या बातम्या;
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितले महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे खरे कारण, म्हणाले शरद पवार..
सनीच्या वाढदिवसाची राज्यात चर्चा!! चांदीची गदा देऊन केला वाढदिवस केला साजरा..
पोस्ट ऑफिस बचत योजनेत 333 रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख मिळवा, जाणून घ्या होईल फायदा..
Share your comments