सध्या पशुपालकांचा कल छोट्या जनावरांच्या पालनाकडे जास्त वळताना दिसत आहे. कारण छोट्या पशूंना पाळण्यासाठी खर्च कमी येतो परंतु नफा जास्त होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर देशात शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जातींच्या पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो.
शेळीपालनातून दुध आणि मांस असे दुहेरी उत्पादन मिळते. त्यामुळे भारतात शेळीपालन (GoatFarming) व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेळीपालनासाठी फायदेशिर शेळ्यांची निवड करणे गरजेचे असते.यामध्ये अनेक जातींचा समावेश आहे. यामुळे तुम्ही कमी दिवसांमध्ये चांगले उत्पादन घेतले जाते.
तसेच आहाराविषयी जागरुक असलेल्या लोकांमध्ये सध्या शेळीच्या दूध आणि मांसाची (Goat Milk And Meat) लोकप्रियता वाढत आहे. शेळीच्या अनेक जाती आहेत. यामध्ये शेळ्यांच्या प्रगत जातींच्या यादीत नाव आहे सोजत शेळीचे. सोजत शेळी नागौर, जैसलमेर, पाली आणि जोधपूर जिल्ह्यांची ओळख मानली जाते. सोजत शेळ्या दिसायला खूप सुंदर असतात. दूध उत्पादन जास्त होत नसले तरी त्याच्या मांसाला बाजारात चांगला भाव मिळतो.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल
तसेच करौली ही जात राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील मंद्रेल, हिंडौन, सापोत्रा इ. ठिकाणी आढळते. करौली जातीच्या शेळ्या दूध आणि मांसाचा चांगला स्रोत मानल्या जातात. करौली जातीच्या शेळ्यांचे संगोपन राजस्थानातील मीना समाजात जास्त दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. तसेच राजस्थानातील अजमेर, टोंक, जयपूर, सीकर आणि नागौर जिल्ह्यातील काही भागात गूजरी शेळीचे संगोपन केले जाते.
गूजरी बकऱ्याचा आकार इतर शेळ्यांपेक्षा मोठा असतो. या जातीच्या शेळ्यांचे दूध उच्च प्रतीचे असून दूध उत्पादनही जास्त आहे. तसेच या जातीच्या शेळ्यांपासून मांसही जास्त प्रमाणात मिळते. तसेच याची वाढ देखील जास्त आहे.
शेळीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. शेळीचे दूध हृदय आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे. शेळीचे दूध आहारात घेतल्यामुळे हाडे मजबूत राहतात, पचन सुधारते, म्हणूनच बाजारात शेळीच्या दुधाची मागणीही खूप जास्त असते.
मदर डेअरीकडून दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ
आपल्या राज्यात उस्मानाबादी, बेरारी, बोअर, संगमनेरी या शेळ्यांच्या जाती लोकप्रिय आहेत. याशिवाय देशपातळीवर शेळ्यांच्या विविध जाती आहेत. गुरांसोबत शेळीपालन देखील चांगला व्यवसाय म्हणून ओळखला जातो.
महत्वाच्या बातम्या;
गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांच्या नावे सातबारा करा, गायरान हक्क परिषदेत मागणी
India Post Recruitment 2023: तरुणांनो लागा कामाला! टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांची भरती..
इलेक्ट्रिक कारच्या किमती नवीन वर्षात वाढणार, जाणून घ्या कारण..
Share your comments