शेतकरी शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करीत असतात. दुग्धव्यवसाय (Dairying) हा यामधील प्रमुख व्यवसाय. मात्र या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना भरपूर काळजी घ्यावी लागते, ज्यामधून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.
जनावरांच्या आरोग्यात लोहाचे महत्व
जनावरांच्या आहारात लोहाचा वापर असणे गरजेचे असते. महत्वाचे म्हणजे जनावरांच्या शरीरातील लोहाची पातळी केवळ शोषणाद्वारे नियंत्रित केली जाते. जनावरांच्या शरीरातील लोह उत्सर्जनाची यंत्रणा ही एक अनियंत्रित प्रक्रिया आहे जी घाम येणे, केस आणि त्वचेच्या पेशी गळणे आणि एन्टरोसाइट्सचे जलद उलाढाल आणि उत्सर्जन याद्वारे होते.
लोह रक्तातील साखरेचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. लोह रोगप्रतिकारक शक्ती (Iron immunity) वाढवते. लोह निरोगी त्वचा, केस आणि नखांसाठी महत्त्वाचे आहे. लोह हे रक्तनिर्मितीसाठी आवश्यक घटक आहे.
जनावरांच्या शरीरातील सुमारे ७० टक्के लोह रक्तातील हिमोग्लोबीन नावाच्या लाल रक्तपेशींमध्ये आणि मायोग्लोबिन नावाच्या स्नायूंच्या पेशींमध्ये आढळते. रक्तातील ऑक्सिजन फुफ्फुसातून उतींमध्ये हस्तांतरित करण्यासाठी हिमोग्लोबीन आवश्यक आहे.
शेतीकामासाठी सर्वोत्तम भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
कमतरतेमुळे होणारी लक्षणे
१) रवंथ करणाऱ्या जनावरांच्यामध्ये अत्यंत थकवा येतो. अशक्तपणा येतो. त्वचा फिकट होते. छातीत दुखणे, जलद हृदयाचा ठोका होणे किंवा श्वास लागणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.
२) पाय थंड होणे, जिभेची जळजळ किंवा वेदना होणे. नखे ठिसूळ होणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.
३) वराह व त्यांच्या पिल्लांना पिगलेट ॲनिमिया आजार होतो.
दिलासादायक! जेष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकेने लाँच केली नवीन FD स्कीम; मिळणार तब्बल 8.40 % व्याज
यावर उपचार कोणता कराल?
१) जनावराला नियमित खाद्यातून लोह युक्त क्षार मिश्रणे द्या. मोठ्या जनावरांत ५० ते १०० ग्रॅम, तर लहान जनावरांत १५ ग्रॅम ते २० ग्रॅम हे प्रमाण ठेवा.
२) जनावराला पालेदार चार विशेषतः द्विदल चारा त्यांच्या वजनाप्रमाणे द्या.
3) आहारात लोह असलेले पदार्थ जास्त खायला द्या.
4) पशुआहारात जीवनसत्त्व 'क' असलेले अधिक अन्न पदार्थ समाविष्ट करा. कारण शरीरात लोह शोषण्यास मदत करते.
महत्वाच्या बातम्या
सातारा जिल्ह्यात सोलर पॅनलवर चालणाऱ्या तब्बल 202 योजना मंजूर; शेतकऱ्यांना होणार फायदा
दिलासादायक! सौर पंपासाठी तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर
वृषभ, कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मौज मजेचा; जाणून घ्या संपूर्ण राशींचे राशीभाविष्य
Share your comments