शेळीपालन व्यवसाय (Goat rearing business) कमी जागेवर करता येणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी कमी मेहनतीतून चांगले उत्पादन मिळवू शकतात. पण यशस्वीरीत्या हा व्यवसाय करण्यासाठी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन देखील तितकेच गरजेचे असते.
आज आपण मांस उत्पादनासाठी (meat production) कोणत्या जातीच्या शेळीचे पालन केले पाहिजे, याविषयी माहिती घेणार आहोत. कोकणात शेतीसोबत पशुपालन (animal husbandry) जोडधंदा म्हणून पाहिला जातो. कोकणातील ठराविक जातीच्या शेळीचे पालन बरेच शेतकरी करतात.
शेतकरी कोकण कन्याळ शेळीचे पालन मोठ्या प्रमाणात करतात. या शेळी पालनातून शेतकऱ्यांच्या चांगला फायदा होतो. या शेळीचे पालन मुख्यता महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आणि जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात केले जाते.
ड्रोन बनवण्यात स्वदेशी नारा!! भारतात तयार होत आहेत मोठ्या प्रमाणावर ड्रोन, अनुदानही जास्त
विशेष म्हणजे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्थानिक शेळी कळपातून या शेळीचे सर्वेक्षण केले आहे. ही कोकण कन्याळ सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.
शेतकऱ्यांनो 'या' कारणाने दुधाची फॅट होते कमी; फॅट वाढविण्यासाठी वापरा हे तंत्र
कोकण कन्याळ शेळीची वैशिष्ट्ये
1) कोकण कन्याळ शेळयांचा रंग काळा असतो. शेळयांच्या तोंडावर व कानावर पांढऱ्या रंगाच्या पट्टया असतात.
2) चेहरा चपटा व लांबट असतो व पाय लांब असतात.कोकण कन्याळ जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे.
3) माहितीनुसार एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे २५ किलो आणि मादीचे २१ किलो वजन भरते.
4) करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो होते तर सहा महिने वाढीचे वजन १४ ते १५ किलो असते.
5) पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे जवळपास ५० किलो तर शेळीचे वजन ३२ किलोपर्यंत भरते.
6) ही शेळी ११ व्या महिन्यांत प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि १७ व्या महिन्यांत पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण ४० टक्के आहे.
7) दोन वेतातील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. या शेळीचा दुधाचा कालावधी ९७ दिवसांचा आहे.
महत्वाच्या बातम्या
निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला स्थगिती, शेतकऱ्यांना तात्पुरती मलमपट्टी?
सरकार म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतोय, फ्लॉवरची आली साडेनऊ रुपयांची पट्टी, शेती करायची तरी कशी?
शेतकरी मित्रांनो 'या' यंत्राने करा कमी खर्चात पीक फवारणी; पैशांची होईल मोठी बचत
Share your comments