शेतकऱ्यांना चार पैसे मिळणारा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. भारतात मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन घेतले जाते. गाय आणि म्हशीचे दूध विकून चांगली कमाई होते. आता सरकारकडून देखील शेतकऱ्यांना मदत केली जाते.
यामध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड योजना देखील फायदेशीर आहे. अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाही. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या (Pashu Kisan Credit Card Yojana) माध्यमातून पशुपालकांच्या आर्थिक अडचणी दूर होतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना माफक दरात जनावरांच्या नावावर कर्ज (Loan) दिले जाते.
यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. तुम्ही बँकेतून त्याचा फॉर्म घेऊ शकता आणि सर्व आवश्यक कागदपत्रे भरल्यानंतर तुम्हाला ते येथे सबमिट करावे लागतील. यामध्ये जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, विमा उतरवलेल्या जनावरांवर कर्ज, जनावरांच्या खरेदीवर कर्ज, बँक क्रेडिट स्कोअर, अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
आता शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, जाणून घ्या..
यामध्ये कार्डवर 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय देण्याची तरतूद आहे. तसे, पशुधन मालक यावर 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. यावर केवळ 4 टक्के व्याजदर भरावा लागेल, तर सरकारकडून 3 टक्के प्रीमियम भरण्याची सूट आहे. यामुळे ही योजना फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या;
शरद पवार पंतप्रधान होणार? खुद्द पवार म्हणाले, पंतप्रधानपद...
आता कारखान्यावर चकरा मारणे होणार बंद! आता शेतात बसून होणार उसाची नोंदणी
'अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो, कॅनॉलचे अस्थिरीकरण 15 वर्ष सत्तेत असताना का केलं नाही?'
Share your comments